पत्रांक ३४५
श्री १७१० पौष वद्य १२
तीर्थस्वरूप मातुश्री ताई वडिलांचे सेवेसीं:-
अपत्यें माधवरावाचे साष्टांग नमस्कार विनंती. येथील पौष बहुल द्वादशी पर्यंत वडिलांचे आशीर्वादें करून यथास्थित असे, विशेष. आपणाकारणें मकर संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत. स्वीकारून उत्तर पाठविलें पाहिजे. बहुतकाय लिहिणें ? हे विनंती.
पौ छ ३ जोवल उर्फ माघ शु।। ४ शुक्रवार शके १७१०