पत्रांक ३९९
श्री ( नकल ) १७१८ ज्येष्ठ वद्य ३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री सदाशिवपंत अभ्यंकर स्वामीचे शेवेसीः—
पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहित जाणें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेय यांजकडे सालाबाद सातारियाकडून नेमणूक पानसुपारी व दिवटीचें तेल व भाजी व मशालेचे पोत व शाई, येणेंप्रमाणें चालत आहे. त्यास, भाद्र. मासापासून अलीकडे चालत नाहीं. ह्मणून दीक्षितांनी लि।. ऐशास, किरकोळ कामाचा बोभाटा नसावा. सदर पानसुपारी शाकभाजी वगैरे सदरहूप्रमाणें सुदामत आल्याप्रमाणें यांजकडे देत जाणें. व सातारियाचे पोतापैकीं वर्षासन दीडशें रु।। पावतात ते सन अर्बापासून पावले नाहीत, म्हणून कळलें, ऐशास, त्यांच्या वर्शासनाचा ऐवज दीडशें रु।।प्रमाणें सन अर्बा व खमस व सीत तीनसालाऐवज यांचा वर्शासनाचा राहिला असेल तो देणें. रो छ १७, जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.