पत्रांक ४०१
श्री १७१८ आषाढ वद्य २
वेदशास्त्रसंपन्न राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-
विद्यार्थी चिमणाजी माधवराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. सरकारांतून पालखी पाठविली आहे. तरी श्रावणमासाचे उत्साहाचे समारंभास आपण सत्वर यावें. रा।। छ १६ मोहरम, सु।। सबा तीसैन मया व अल्लफ बहुत काय लिहीणें? हे विनंति.