पत्रांक ४०४
पो छ ११ रा।वल सबा तिसैन. श्री. १७१८ श्रावण वद्य ५
अजम व अकरम सिद्धेश्वररावसाहेब साहेब सलाम हुताला:--
साहेब म्हेरबान मुशफक कदरदां फौज जाक्ष फौरसां अजिंदील एकलास सेख हिमतअल्ली अरब जमादार किल्ले बेळगांव सलाम बाजत सलाम मौवल करून आंकी: येथील खैर ता। छ १९ सफर साहेबांचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. दरिआयाम, अलीकडे साहेबांकडून आज्ञापत्र येऊन सेवकांचा सांभाळ होत नाहीं. तर, साहेबीं वरचेवर आज्ञापत्र लेहून दिलआराम होई तें करणार आपण धणी असां. चरणांजवळ यावयाचें मानस. गुदस्तापासून विनंती लिहितच आहें. परंतु येणेंविशीं आज्ञा आली नाहीं. तर, वर्षास साहेबाच्या चरणाजवळ एकदोन वेळां येऊन, चरण पाहिलेवर चित्त संतोष असतें, त्यास, विनंती लिहिण्यास आज्ञा येतच नाहीं. नाहींपेक्षां गणेश चतुर्थी होतांच शेवेसीं येतो. शेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना. *
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)