पत्रांक ४१६
श्रीगजानन प्रा।. १७१८ मार्गशीर्ष शुद्ध ७
कृष्णगडवाले यांसी पत्र कीं, पो सामर येथील कमाविसदार याजकडील कारकून माणसें तुमचे गावीं राहून, सामरेखेरीज मारवांडवाल्यांची नाव पंचभद्रा वगैरे मिठाचीं बंदरें आहेत. तेथून मिठाची भरती करून, बेपारी तुमचे प्रांतांतून जातो. त्याजपासून फौजदारीचा हासील घेतात. दरम्यान तुह्माकडोन दिकत होते. व तुह्माकडील वकीलांनीं गैरवाका समजाऊन फौजदारी बाब पदरचे का।दारास नेली. ऐसियासि, सरकार-अमलापासून चालत आलें, त्यांत दिकत केल्यास ठीक नाहीं. सरकारनुकसानीचा जाब तुह्मांस करणें लागेल. तरी फौजदारीचा सरकार-अंमल सुरळीत चालेल, फिरोन बोभाट न ये, तें करणें ह्मणोन, व सदरहू-अन्वयें यशवंतराव सिवाजी, यासी, अंभेरीस पत्र.
* सदरहूअन्वयें पत्र निक्षुन द्यावें. छ ६ जमादिलाखर सबा तिसैन.