पत्रांक ४४०
श्रीशंकर. १७१८ माघ वद्य ११
यादी येणेंप्रो पत्रें द्यावीं.
१ हवेली उज्यन येथील कमावीसदार यांसि पत्र द्यावें कीं मौजे आजनोडी हा गांव राजेश्री राघो नीळकंठ याजकडे आहे. त्यास, तुह्मी घासलकडीविसी वगैरे उपद्रव देतां, ह्मणोन कळलें. त्यास, याचे गांवास घासलकडीविसी वगैरे उपद्रव न देणें. याचा हरयेकविसी मौर करीत जाणें. येणेंप्रों पत्र.
१ राजेश्री आंबाजी इंगले यांसि पत्र द्यावें की, प्रे।। मुराबाद येथील फडनिसीची आसामी राजेश्री सदासीव आपाजी याची आहे. त्यासि, सालमारीम दीकत करितां, ह्मणोन कळलें. त्यास, याचे आसामीविसी दिकत न करणें, पेशजीप्रें।। चालत आली आहे त्याजप्रों चालवणें. येणेंप्रों पत्र द्यावें.
------
२
( * सदरहू अन्वयें दोन ताकीदपत्रें द्यावीं. छ २४ साबान, सबा तिसैन.)