लेखांक १९ १५९१ ज्येष्ठ वद्य १३
श्रीसके १५९१ सोम नाम सवछरे जेस्ट वदि त्रोदसी वार मंगळवार तदिवसी धनको नाम असकर्णजी साहूकार यास रिणको नाम तिमाजी मल्हार व त्रिंबक गोमदेऊ देसपाडिये प॥ सुपे सु॥ सबैन अलफ आत्मसुखे परवतसमधे घेतले रु॥ ५० पनास यास कलतर दर माहे दर सदे रु॥ ६ सा प्रमाणे मुदल व कलतर साहा देसी परदेसी देउनु हे लिहिले सही छ २४ मोहरम