पत्रांक ४३८
श्री. १७१८ माघ शु।। ६
यादी आन्याबा जाधव यास पत्र रघुनाथराव नेरलेकर साळोंखे याचे कामाविसीं.
मौजे नेरले प्रां। कराड हा गांव सदहू रघुनाथराव --------------------------------
याचे पाटीलकीचा आहे. तेथें श्रीमंत पंतप्रधान याचा अंमल बाबती वगैरे.
१२०० देशमुखी व सरदेशमुखी.
५०० इनाम जमिनीबाबत.
-------
१७००
येकूण सत्रासे रुपये सालीना अंमल आहे. तो ऐवज सरकारांतून आपल्या बेहडियांत वजा घेऊन, मशार्निले यांच्या कुटुंबास नेमणूक करून द्यावयाचा करार कैलासवासी श्रीमंत पाटीलबावा यांचा आहे. त्यास श्रीमंत नाना यांच्या कानावर घालून सरकारांतून सनद करून रघोजी साळोंखे याचें नांवें घ्यावी आणि ठाणें क-हाड येथें आमलदार यांस पत्र देऊन ऐवज दरसाल मा।रनिलेकडे चालवणें, म्हणोन पत्र. येकूण सनद व कमाविसदार यास एक पत्र, म्हणोन या कामाविसी आन्याबा जाधव यास पत्र.
पा। खासा रसानगी बुगाजी जामदार की,
रा। नानांच्या कानावरी घालुन, गांव सरकार अंमल असेल तो आपलेकडे करऊन देवणेंविसी चिठी द्यावी.
छ ५ साबान, सबासितैन.