पत्रांक ४३९
श्री १७१८ माघ वद्य ५
दत्तक सरकार राजश्री दौलतराव शिंदे ता। कमासदारान व ठाणेदारान व चौकीदारान व
रहदारान व बाजेलोकान व जमायेत मा सु।। सबातीसैन मया व अल्लफ, राजश्री रामजी पाटील सिंदे यांजकडील माणसें पो नेवासें येथून तेल तूप वगैरे सरंजाम, उंट नफर साहा भरून खेपा दोन लष्करत आणतील. त्यांस मार्गी हसिलांविसीं मुजाहीम न होतां, रात्रीं चौकी पहारा देऊन, आपलाली हद्दपार करून देत जाणें. जाणिजे. ४. साबान, मोर्तबसूद.