पत्रांक ४७०
श्री १७१९ भाद्रपद वद्य १४
दस्तर सरकार श्री दौलतराव शिंदे ता।
का।।दारान व ठाणेदारान वे चौकीदारान व रहदारान व बाजेलोकोन जकायत महालानिहाय. सु।। समान तिसैन मया व अलफ. रा। कृष्णराव महिपत साठे यांजकडील जासूद जोड्या दोन पुण्याहून पो देवास येथें जात आहेत. त्यांस मार्गी जातांना व येतांना मुजाहीम न होतां, नदीनाला व आपलाली हद्द पार करून देणें. जाणिजे. छ २७ सफर, मोर्तबसुद.