पत्रांक ४७१
श्रीह्माळसाकांत. ( नकल ) १७१९ भाद्रपद वद्य १४
राजश्री माहितराव मैराळ कादार प्रांत आंबड यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। काशीराव होळकर. सु।। समान तिसैन मया व अल्लफ, मौजे आंतरवाळी सराठी हा गांव राजश्री नागो जिवाजी यांजकडे सरकारांतून आहे. तेथील वस्तभाव घोडीं वगैरे चिरंजीव मल्हारराव होळकर यांजकडील सदाशीव भाईजी यांणी नेलीं असतील, त्यांची ठिकाण लागून यांची यांसीं माघारी पावलीं पाहिजेत. याजकरितां हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं मा।।रनिलेकडील गांवची वस्तभाव घोडीं वगैरे जेथें ठिकाणीं लागेल तेथून आणून यांचीं यांसीं पावतीं करणें. जाणिजे. छ २७ रो।वल, बहुत काय लिहिणें मार्तब.