पत्रांक ४७६
श्रीह्माळसाकांत १७१९ माघ वद्य ११
राजश्री वामनाजी हरी का।दार पा। आंबड गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। काशीराव होळकर दंडवत. सु।।
समान तिसैन मया व अल्लफ. को व्याहामांडवें व मौजे गोंदी पो मजकूर हे दोन्ही गांव श्रीमंताकडून राजश्री यशवंतराव गंगाधर याजकडे आहेत. तेथें तुह्मी नगरपट्टी बा। तगादा करितां म्हणोन विदित जालें. त्यास, हरदू गांव श्रीमंताकडून मा।रनिलकडे दुमाला. तेपक्षीं तेथील नगरपट्टीचा ऐवज मागणें नीट नाहीं. यास्तव, हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं येविषई हरदू गांवांस मुजाहीम न होणें. जाणिजे. छ २४ साबान. बहुत काय लिहिणें ? मोर्तबसुद.