पत्रांक ४७५
श्री १७१९ माघ वद्य ६
वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण दीक्षित स्वामीचे सेवेसी:--
विद्यार्थी बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहीत जावें. विशेष. तुह्मी सरकारचे लक्षांत पहिल्यापासून वागत आहां. सांप्रतचा प्रसंग अडचणीचा. याजकरितां येथून विनंति होत जाईल ती माहाराजांनी कृपा करून मान्य करीत असावी, हें करणें तुह्माकडे. येविसी राजश्री सिवराम नारायण सांगतील. रा। छ १९ साबान, सु।। समान तिसैन मया व अलफ. * बहूत काय लिहिणें ? हे विनंति.