पत्रांक ४७२
श्रीह्माळसाकांत. १७१९ आश्विन शुद्ध ७
राजश्री पागापथके वगैरे सरकारी लोक मु।। आंबड गोसावी यांसीं:-
श्रे।। काशीराव होळकर रामराम. सु।। समान तिसैन मया अल्लफ, राजश्री येशवंतराव गंगाधर यांजकडील मौजे व्याहा माडवें वेगोंदी परगणें मा।र येथें तुह्मांकडून उपद्रव लागतो ह्मणोन हुजुर विदित जालें. त्यावरून हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं मा।रनिलकडील गांवास काडीमात्र तोशीस न देणें. बोभाट आलिया ठीक पडणार नाहीं जाणिजे. छ ६ रा।खर. बहुत काय लिहिणें ?