Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३९
श्री.
१७२५ आषाढ वद्य ४
अज दिवाण किल्ले सातारा ता मोकदमाजी, मौजे माहागांव व सा निंब प्रांत वाई. सुा अब मयातैन व अलफ. तुम्ही बैद्याचे उपद्रवामुळें तजावजा जाहाला, म्हणोन विदित जालें. त्यावरून हें पत्र सादर केलें असे. तरी, मौजे-मारीं येऊन किर्दमाहामुरी करणें. हर कोणाचा साहूकरी वगैरे उपद्रव जाहल्यास समजोन घेऊन ताकीद केली जाईल. जाणिजे. छ १८ रबिलावल. मोर्तब सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३८
श्रीलक्ष्मीकांत.
१७२५ आषाढ वद्य २
राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्यी एकदोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिहिला मजकूर कळला व राजश्री सदाशिव बापूजी यांचे लिहिल्यावरून व राघो धोंडदेव यांचे विनंतीवरूनहि सविस्तर समजण्यांत आलें. त्यास, येथील प्रकार वरचेवरी राजश्री सदाशिव बापूजी यांसी लिहिण्यांत येत आहे. त्याजवरून तुम्हांस समजतच आहे. व हालीही कित्तेक प्रकार मशारनिलेस लिहिण्यास बाकी ठेविली नाहीं. तेहि तुम्हीं समजोन घ्यावेत. व राघो धोंडदेव यांसीहि सर्व प्रकार सांगण्यात येत असेत. ते लिहीत असतील व लिहितील, त्याजवरून समजण्यांत येईल. तुम्हीहि चांगलें मनन करून व तेथेंहि बोलावयाचें तें बोलून, जी सलाह असेल ती लेहून पाठविणें. तुम्हांसी येथील दुसरा प्रकार आहे, ऐसें नाहीं. तेव्हां हाच भरंवसा आहे कीं, जे घडणें तें समजोन घडेल व चांगलेंच समजण्यांत येईल. व तुम्हीं सुचविण्यास कमी कराल ऐसें नाहीं. पुढील विचार तुमचे ध्यानांत नाहींत, ऐसें नाहींत. तेव्हां बरें वाईट चांगलें पाहून, जी सलाह तेंच ल्याहावें. येथील लक्ष तो एकच आहे, ही खातरजमा पुर्ती असावी व आहेच, तेव्हां तपशील ल्याहावा, ऐसें नाहीं. पत्राचीं उत्तरें अति सत्वर यावींत. व त्याजवर येथील लक्ष राहावें, हेंच चित्तांत लागून आहे. आपले कडूनहि सुचतें तें लिहिण्यांत कमी करीत नाहीं व पुढेंहि होणार नाहीं. हे सर्व प्रकार लिहिल्यावरूनच लक्षात येतील. वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहित असावें. रा छ १६ माहे रबिलावल. बहुत काय लिहिणे ? हें विनंती. मोर्तबसुद. शिक्का.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३७
श्री.
१७२५ चैत्र वद्य ६
रायाविराजित राजमान्य रा गगाधरपंत तात्या यांप्रति शुभचिंतक परशराम बापू धर्माधिकारी आशीर्वाद उपरी. तुह्मांकारणें खरबुजें दिलीं मण, व धडे, शेवद वे डांगेर, ऐसीं तरकारी गाडा एक भरून पाठविली आहे. ते घेऊन पावलियाचें उत्तर पाठवावें, बेलापुरीहून यशवंतराव होळकर यांचे कूच होऊन पुणतांब्यास गेले, ह्मणून वाटसरांनी सांगितले. खचीत बातमी आलियावर मुजरद लिहून पाठऊं. गांवचे वर्तमान आज ता यथास्थित कडवल लोकसुद्धां. असें बाजारवदंता ऐकितों कीं, माने वगैरेंस फिरंगियानें अडविलें, सबब होळकर माघारा जाणार, ह्मणून ऐकिली वार्ता लिहिली. सत्यमिथ्या देव जाणे, खरबुज वगैरे तुह्मीं आपले घरींहि कांहीं द्यावी. वरकड सरकारांत द्यावीं. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. चैत्र वा ६
सेवेसी राणूजी हवालदार याचे रामराम, लिा परिसोन कृपा निरंतर असों द्यावी. हे विनंति.
स्नो रामचंद्र रावजी सां नमस्कार विज्ञापना ऐसिजे: लष्करची गडबड अमळशी स्वस्थ जाली ह्मणजे, चिरंजीव शेवेसीं येतील. पुणतांब्याहून कूच जाहलें, ह्मणजे घोर वारेल, तों पावेतों तिरस्थळीचे लोक भयामितच आहेत. श्रीकृपेनें सर्व उत्तमच घडेल. कळावें हे विनंति. ता। कलम, कागद कोरा अगदी येथें मिळत नाहीं. अर्धा दस्ता तरी अगत्य पाठवावा. हे विनंती.
श्रीमंत मातुश्रीस सां नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३६
श्री.
१७२४
राजश्री येशवंतराव होळकर यांस पत्र कीं, प्रो देवासे निा राजश्री तुकोजी पवार व आनंदराव पवार यांजकडे सरंजामास सरकारांतून आहे. त्यास, तुह्मांकडील पठाण यांणीं माहालीं मोठा प्रळय करून लाखो रुपये खंडणी, खेरीज खर्च, मनस्वी घेतला. त्याखेरीज माहालची तसनस बहुत केली. महालचे रयतीची कांहीं स्थित राहिली नाहीं. दोन सालांचा वसूल रुो अनर्थ करून नेला. तुह्मांस राजश्री खंडेराव होळकर यांचीं पत्रेंहि गेलीं असतां, मनाई जाली नाहीं, तुह्मी श्रीमंतांचे घरचे असतां सरकारचे सरदार यांचे माहालास उपद्रव द्यावा, सरदार यांणी चाकरी कशावर करावी, हा अर्थ ध्यानांत न आणितां, ऐसा अर्थ घडला. या उपरी देवासें माहालावर तुह्मांकडोन कोणेविशीं उपद्रव होऊ नये. येविशीं आपले सरदारांस निक्षूण ताकीद करून, बंदोबस्त करून, पत्राचें उत्तर पाठविणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३५
श्री.
१७२४
यादी गुलाम बदीयुदीखान किल्ले पेमगिरी. आमचे सरंजामाचे गांव च्यार गुदस्तां सरकारांत घेतले. याजमुळें खर्चाची वोढ जाहाली, किल्ले दोन स्वाधीन आहेत. होळकराकडील फौज किल्वानजीक आली. कोणे समईं कसा प्रसंग येतो, याचा भरवसा नाहीं. खर्चावांचून किल्यांतील लोक हवालदील. खर्चाची तारांबळ. याजकरितां सेवेसी विनंतीपत्र पाठविलें. त्याजवरून, गांवाविशींचा मजकूर राजश्री चिंतापंत यांजपाशीं बोलावा, म्हणून आज्ञा जाली. नंतर देशमुख यांणीं राजश्री भाऊ सरंजामी यांस बलावून आणून, सरंजाम पौ किल्याकडे नेमणूक काय व जातीकडे किती, याची चवकशी केली. जातीस व किल्यास मिळोन वरात सरंजाम गांव मोघम आहे. आमचे वडिलांकडे मोंगलाईंतून सदरहू सरंजाम व किल्ले होते. ते अल्लीबाहादूर यांचे मातोश्रीचें लग्न जाहालें, तेव्हां सदरहू सरंजाम व किल्ले सरकारांत दिल्हे. नंतर सरकारांतून किल्ले पेमगिरी व सोनगड दोन किल्ले व सरंजाम गांव व इतलाख वरात मोघम आमचे वडिलांस दिल्हेत. आजपर्यंत सरकारांतून कृपा करून चालविलें. त्याप्रों साहेबांनी कृपा करून गांव आमचे आह्मांकडे देववावयाची आज्ञा होऊन पूर्ववतप्रों चालविलें पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३४
श्री.
१७२४
यादी निा बाळोजी कुंजीर, सु। सलास मयातैन.
१ तो सुवर्णदुर्ग.
१ तो रायगड.
१ किल्लेल सातारा.
१ किल्ले घनगड,
१ किल्ले चंदन
१ किल्ले वंदन,
१ पो सुपें.
१ पौ बाहादुरपुरा.
१ किल्ले पुरंधर.
१ किल्ले वडना गड.
१ पो एकाडी ता धारवाड.
१ पो कोकुसा सामली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३३
श्री.
१७२४
यादी गारदी दिंमतहाय निा आपाजी बहिरट व आपाजी कौडे सुा सलास मयातैन व अलफ, दोनी पलटणें लष्करांत जावयाविशीं आज्ञा जाहली. त्यामध्यें बंदोबस्ताचीं कलमेः-
१ लष्करांत जावयाचें त्यास, चाकरी घेऊन पैकी कोणी द्यावा ? त्यास पत्रकीं, यांची हजीरी घेऊन पेस्तर माहापैकी खर्चास द्यावें.
१ दारू, गोळी, बाण, व बाणदार देवावयाची आज्ञा.
१ तोफा तीन द्यावयाच्या त्या कोणीकडून घ्याव्या ? त्याचे दरोग्याचे कारकून ज्याचे ते बरोबर असावे किंवा कसे ? ते आज्ञा.
१ आमचें बोलणें हरएकविशीं गोविंदराव बोलतात. हालीं लष्करांत जावयाची आज्ञा. त्यास, येथें बोलणें त्याजवळच बोलावें किंवा कसे ? ते आज्ञा असावी.
१ रबिलाखरपौ च्यार हजार रुपये देविले ते अद्यावत् पटत नाहीं.
आठां-चौहों दिवसांचे मुदतीनें वरात देविल्यास मोबदला करावयासीं येईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३२
श्री
१७२४
यादी साहेबराम कुंमदान, सुा। सलास मयातैन व अल्लफ, सरकारांतून मनोहरगीरबावा गोसावी यांस एक पलटणची भरती करावयासी सांगितली. त्यास, आह्मीं बावांचे पलटणची भरती बाराशें लोकांची केली. पलटण जमऊन च्यार वर्श पावेतों सरकारचाकरी केली. तेव्हां गोसावीबावांची व आमची कांहीं जिकीर जाहली. मग, आह्मी निघून वेगळे जाहलों. घरास गेलों. घरीं एक वर्श राहून येथें आलों. नंतर राजश्री आबा काळे यांणीं आह्मांस श्रीमंतांपाशीं नेऊन भेटविलें. मग, सरकारांतून आह्मांस दोनसें लोक जेजाल. बारदार ठेवावयासीं आज्ञा जाहली. आह्मीं पंनास लोकांची हजीरी दिल्ही. आजपो सरकारचाकरी केली. खर्चास एक पैसा सरकारांतून पावला नाहीं. पदरचे हजार रुपये खर्चून खराब जाहले. त्यास, हालीं जितकी नवी भरती करावयाची आज्ञा करतील तितकी भरती करीन. याप्रों माझा बंदोबस्त सरकारांतून करून दिल्हा पाहिजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३१
श्री.
१७२४
यादी टप्पे डांकेचे पुणियापासून नामपूरमोराव्यापर्यंत बसवावयाचे सु। सलास मयातैनः-
१ मु। पुणें.
१ मौजे घाणोरे पुण्यापासून कोस ३
१ मौजे चरोळी नदी इंद्रायणी कोस २।।
१ मौजे पिंपळगांव नदी भीमा कोस ३
१ कसबे केंदूर कोस ३
१ मौजे लोणी कोस ४
१ मौजे सिंगवे, पारगांव घोडनदी कोस ३
१ मौजे गांजेवाडी कोस ३
१ मौजे बोरी, सिरोळी, नदी कुकडी कोस ३
१ का आळें कोस २॥
१ मौजे बेटे कोस ३
१ मौजे आंबे घारगांव नदी मुलखडी ३
१ मौजे करजुलें कोस ३
१ मौजे पाझोली चमापूर हणमंतबारी ३
१ का संगमनेर नदी प्रवरा कोस ३
१ मौजे मलदास कोस ३
१ मौजे जिमेन कोस ४
१ का देपूर कौस ४॥
१ मौजे खंडागली व डांगली कोस ३॥
१ मौजे साडले ताराचें कोस ३ ।
१ मौजे नांदूर मधमेश्वराचे नदी गंगा कोस ।
१ मौजे सोनेवाडी कोस ३
१ मौजे सिरसाले कोस ४॥
१ मौजे शेलू कोस ३।।
१ मौजे रामेश्वर कोस ३ ।
१ का लाहोनेरटे गोडे कोस ४
१ मौजे पिंपरी कोस ४
१ मौजे अजमेर सवधाणे कोस ३
१ मौजे खोडे कोस ३
१ का नामपूर कोस ३
----- ------
३० ९३
यासीं जासूद आा.
६० डांकेस टप्पे ३० यो।
२ कोतल.
३ कारकुनाजवळ,
१ कारकून २ जासूद.
------
६५
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लिबासी दस्तूरखानाच्या वडीलपणाच्या तहाचा कागद
महजराची नकल दोमोहरी रामाजी बावाजीच्या नावे लेहून
एका नावाची कागद १ दिल्हा आहे की वडील तुह्मी व
धाकटे आपण त्या कागदाचा
मसुदा कागद १
सदरहू कागद दिधलियावर सभानाइकानी पूसिले की तुमचे कागद आणीक काही आहेत की जाले त्यावर बोलिले की आमच्या सनदा इतक्या च याउपर कागद नाहीत त्याउपर पुरसीस केली की दस्तूरखानाच्या महजराची नकल दाखविली आहे हे नकल काही मंजूर करीत नाहीं याची असल दाखविणे असल मोहरेनसी दाखवाल तरी मंजूर आहे नाही तर हे नकल लिबासी आहे तुह्मीं नस्ता तोतिया केला आहे त्यावर अग्रवादे मजकूर बोलिले कीं असल आपणाजवळ नाहीं नकल च आहे त्याउपर सभानाइकानी फर्माविले कीं असल नाही तेव्हां हे नकल खोटी आहे नामंजूर केली व वडीलपणाच्या कागदाचा मसुदा पाहातां च कलम की मसूदा होए जागां जागां अक्षरें चित्त केलीं असेत त्यावरून तो हि कागद रद जाला याउपर पश्चमवादी बाबूराव रामाजी याणीं परावा वादिया बोकील खोटा केला त्याच्या वादाच्या वेळाच्या वगैरे सनदा मातबर असल दाखविल्या बिता।
अमल निजामशाही ते वेळेच्या
सनदा
परवाना बमोहर खुर्द खत बमोहर
खान अजम फरबाद- मलिक अजमत मुलूक
खान उमराव निजामशाही मलिक अंबर
त्यास परगणेमजकूर बनाम लखमो जनार्दन
जागीर होता त्याचा सनद १
परवाना सनद १
अमल अलमगीर अवरंगजेब
पातशाहा
नवाब अमीरलउमराऊ शास्ता-
खानाचे वेळच्या सनदा
बिता।
परवाना फारसी परवाना दीगर
बमोहर नवाब बमोहर नवाब
सनद १ अज रूए शाहि-
दीनामा सनद १
महजर शाहिदीनामा
पा। मा।र सनद १
परवाना बमोहर मिर्जा राजा जयसिंगसाहेब सुभा सनद १
परवाना बमोहर वजारतपन्हा खानवालाशान मकरमतकान दिवाण दक्षण सनद १
साहेब अलाम ज्याहापन्हा बाहादूरशा अवरगाबादेस साहेबसुबा होते ते वेळेच्या सनदा
फर्मान पेस अज जलूस बमोहर हजरत बाहादूरशाहा ज्यामध्ये दस्तूरखानाच्या महजराचा दाखला आहे वूतमाम परगणाच्या शाहिदीच्या महजराचा दाखला आहे सनद १
महजर कचेरी दिवाणी वादिया खोटा केलियावर तमाम उमराव व मुतसदी व मातबर जमीदाराचे शाहिदीनसी सनद १
अर्जदास्त शाहिदीची तमाम परगणाच्या मोकदमाचे नावानागरानसी सनद १
एजितखत वादिया खोटा केलियावर त्याचे बाराचे घेतले सनद १
कित्ता सनद
बारामतीचा कारभार वगैरे हकइनाम बराबर वाटून घेऊन देवाजी त्रिबक व समस्त निमे भाऊ याणी वाटणीचा कागद लेहून दिल्हा आहे सनद १
वडीलपणाच्या तहाचा कागद तिमाजी मल्हार याणी वडीलपणाचा कजिया केला होता ते वेळेस बापाजी विनायक व देवाजी त्रिंबक व रखमाजी यादव वगैरे निमे भाऊ याणी रामाजीपत बाबूरायाचे बाप याच्या नावे लेहून दिल्हा आहे की वडील तुह्मी धाकटे घर आपले याप्रमाणे सुरळित चालावे ऐसा कागद सनद १
राजीनामा मोकदमानि देहाय पा। सुपे बनाम रामाजी बावाजी बाबत कजिया माहादाजी यमाजी बोकील खोटा केला सनद १
सदरहू सनदा दाखविल्या त्या पाहाताच मजूर केल्या याउपर अग्रवादीयास पूसिले की तुह्मी कजिया कोण्हे गोष्टीचा करिता त्यावर अग्रवादेमजकूर बोलिले की देशपाडेपण दरोबस्त आपले च आहे नारो केशव व बाबूराव देशपाडे नव्हेत याजला देशपाडेपणासी समध नाही याचा व आपला मूळपुरुष एक नव्हे ऐसी तकरीर केलियावरी सभानाइकी मुचलका मागितला कीं जरी हे तकरीर खरी न करू तरी आपले निमे वतन बाबूरायास देणे व व आपण मुलेमाणसानसी देशनिकाल होऊन जाऊन ऐसा कतबा देणे मग पुढे मनास आणून त्यावरी देवाजी त्रिबक करून मुचलका लेहून देऊ लागला तेव्हा राजश्री श्रीनिवास पडित प्रतिनिधी याणी इस्वरपरायण माकुल केले की बाह्मणा आपले घर काय निमित्य बुडऊन घेतोस वृध्द जाला आहेस परतु तुजमध्ये ज्ञान काही च नाही ऐसे दिसोन येते आता खोटा होसील आणि सारे च वतन गमाऊन देशावर जासील तुझा जाणता मातबर भाऊ वकूबदार असेल त्यासी विचार करून मग ऐसा मुचलका लेहोन देणे ऐसा परनिष्ठ बुदधिवाद सागितलीयावर शाहाणा भाऊ गोपाळराऊ आऊजी मज्यालसीमध्ये बैसला होता त्यास बोलाऊन बरोबर घेऊन मुचलका द्यावयाचा विचार करावयास सभेतून उठोन गेले नफर बिता।
बापाजी विनायक १
देवाजी त्रिंबक १
यादो रखमाजी १
गोपाळराऊ आऊजी १
गंगाजी सामराज १
गोविंद वेंकटेश १
लिंगो नरहर १