[ ७२ ] श्री. १० जुलै १७१४.
श्रीरामचरण
नीलकंठ सोनदेव
शरण.
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचंद्र पडित हुकमतपन्हा ताहा कमाविसदार मौजे नांदवडे ता। खारा पाटण सुहर सन खमस अशर अलफ वेदमुर्ती राजश्री अनंतभट्ट बिन महादेवभट्ट उपनाम मुंडले, गोत्र नैधृत्य, सूत्र आश्वलायन, हे भले सत्पात्र आहेत. यांच्या कुटुंबाचा योगक्षेम चालिला पाहिजे. ह्मणून यांसी पूर्वी मजकूरपैकीं वृत्ती दाभोळी करी ६० साठची दिल्ही आहे. त्या खेरीज हालीं राजश्री छत्रपति स्वामीनीं राजश्री अनाजीपंतांच्या धारियानें दाभोळी करी २५ पंचवीसाची पड जमीन देविली आहे त्यावरून हें आज्ञापत्र सादर केले आहे. तरी सदर्हू पंचवीस करीची जमीन राजश्री अनाजीपंताच्या धारियानें पड जमीन अवल दूम, सीमा, तिन्ही प्रतीची मोजून देविली आहे. येविषयीं किल्ल्याच्या कारकुनास अलाहिदा पुत्र आहे त्याप्रमाणें ते पडी जमीन खेरीज हकदार करून मोजून देवितील. त्याप्रमाणें वतनदारांचें ठिकाण खेरीजकरून देऊन यास व यांचे पुत्र उत्तरोत्तर चालवणें नवीन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची तलीक लेहून घेवून असलपत्रं परतून वेदमूर्तीजवळ देणेंं. छ ४ जमादिलाखर. निदेश समक्ष.
लेखनसीमा.
समुल्लसति.
बार सुरुसुद बार.