Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ६२२

श्री.
१७२४ पौष वद्य २

राजश्री रस्तुमजी देसाई को नवसरी गोसावी यांसीः-

श्नो। निंबाजी भास्कर रामराम विनंति उपरी मुा वसई येथें यथास्थित असों. विशेष. आह्मी श्रीमंतासमागमें मुा मारीं आहें. हें वृत्त परस्परें तुह्यांस कळलेंच असेल. यानंतर, राजश्री नारायण बाबूराव यांची सरकारांतून रवानगी जाली आहे. त्यास, हे नवसर येथें मुकामास राहतील. तर यांचा हरएकविसीं समाच्यार घ्यावा आणि मार्गाची भूमीये मनुष्यें द्यावीं. रा। छ १४ रमजान हे विनंती.

पत्रांक ६२१

श्री.
१७२४ पौष वद्य २

राजश्री नारायेणजी देसाई, घनदेवी, गोः-

सेवक निंबाजी भास्कर नमस्कार विनंति उपरी मु। वसई जाणून स्वकीये कुशल लिा जाणें. विशेष. राजश्री नारायेण बाबूराव यांची रवानगी सरकारांतून जाली आहे. त्यास, हे घनदेवीस मुकामास राहतील. तर, यांचा समाचार हरएकविसीं घ्यावा आणि भूमिये मनुष्यें मार्गाचीं देऊन पावतें करावें. रा। छ १४ रमजान, हे विनंति.

पत्रांक ६२०

श्रीलक्ष्मीकांत.
१७२४ पौष शुद्ध २

राजश्री नारायण वैद्य गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. तुमचीं पत्रें सरकारांत जीं आलीं, त्यांचीं उत्तरें यापूर्वीच पाठविण्यांत आली. त्यांत जें ल्यहावयाचे तें लिहिलेंच आहे. त्याजवरून समजलेंच असेल, सांप्रत राजश्री सदाशीव बापूजी याजकडून पत्रें आलीं त्याचीं उत्तरें मशारनिल्हेस लिहून पाठविलीं आहेत. त्याजवरून मजकूर तुमचेहि समजण्यांत येईल. तुमचे मुलांमाणसांसमागमें सरंजाम जो द्यावयाचा तो देऊन, त्याची रवानगी करून दिली. त्याजला जाऊन सात आठ दिवस जाले. हा मजकूर तुह्मांकडील मंडळी लिहून पाठवितील, त्याजवरून कळेल. वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहीत जावें. रा छ ३० माहे रमजान, बहुत काय लिहिणे ? हे विनंती. मोर्तबसुद.

पत्रांक ६१९

श्री.
१७२४ कार्तिक

श्रीमंत राजश्री नाना दीक्षित साहेबाचे सेवेसी:-
आज्ञाधारक त्र्यिंबकजी डेंघळे सां। दंडवत विज्ञापना ऐसीजे. आपण पत्र पाठविलें, तें पावोन मार समजला. राजश्री नरसोपंत तात्या, दोनतीन रोज जाहाले, टोक्यास गेलेत. दुसरें, श्रीमंत अण्णासाहेब यांची पागा नेवासियास होती. त्यासी फत्तेसिंग मान्याचे स्वार येऊन, धामधूम करून, काशिनाथ हरी व आपली पागा ऐसे लष्करांत नेले, व पठाण कोल्हारावर आला, म्हणोन वर्तमान ऐकिलें. त्यांसी पठाण कोल्हारावर कांहीं आला नाहीं. उगीच बाजारआफवा आहे. कलमीं वर्तमान नाहीं. नेवासें माहालचा खंडपणास हाजार जाला, म्हणोन ऐकिलें. साहेबास कळावें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ करीत जावा हे विज्ञापना. खंड होऊन पागा सुटावी, ऐसें आहे. इतक्यावर ईश्वर इच्छा.

पत्रांक ६१८

श्रीलक्ष्मीकांत.
१७२४ कार्तिक वद्य १४

राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नौ। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहीत जावें. विशेष. यापूर्वी तुह्मांकडेस पत्राची रवानगी छ ६ माहे रजबची तारखेस दस-याचे पोशाखाचे डबाबराबर केली आहे व राजश्री सदाशिव बापूजी यांसीही लिहिले. तीं पत्रें पोंचून सविस्तर समजलें असेल. त्यास सरकारचें लक्ष सारें तुह्मांकडेस आहे. प्रसंगोपात जसें तुह्मीं सुचवीत जावें, त्याच पायांनीं चाल धारणा आपली ठेवावी, हेंच मनांत वागत आहे व ...... स्तवी वारंवार लिहूनही पाठविले आहेत. ही तुमची तुह्मांस खातरजमा आहेच. येविशींचा तपशील फार काये ल्याहावयाचा आहे ? सांप्रत, राजश्री मदाशीव बापूजी यांसी लिहिलें व राजश्री राघो धोंडदेव लिहितील त्याजवरून कळेल. वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहीत जावें. रा। छ २७ माहे रजब, बहुत काय लिहिणे ? हे विनंती.

पत्रांक ६१७

श्री.
१७२४ कार्तिक वद्य ९

राजश्री नारायणराव गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नौ। बाबूराव आंगरे वजारतमाब व सवाईसरखेल रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. तुह्मी छ १६ रजबचें पत्र पाठविलें तें छ २० मिनहूस पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. त्यास, इकडील राजश्री दिनकर नारायण तेथें आहेत. बोलतील. त्याप्रों जाबसाल होऊन वर्तमान वरचेवर लिहून पाठवीत जावें. या प्रसंगीं अधिकआगळें ल्याहावें, तर सर्व ध्यानांतच आहे. सारांश, बंदोबस्त होऊन येई तीच मसलत करावी. विस्तार ल्याहावें असें नाहीं. रा छ २१ रजब. बहुत काय लिहिणें! हे विनंती. श्री मोतंबसुद.

[ ६८ ]                                          श्रीरमाकांत                                २७ फेब्रुवारी १७११.

राजश्री रामचंद्र पडित अमात्य यांसी-
प्रति श्रीमंत मातुश्री ताराबाई. उपरि. तुह्मीं पत्रें पुरविण्या ३ तीन पाठविल्या त्या प्रविष्ट झाल्या. त्यामध्यें लिहिलें कीं, सातारियास राजश्री केसो त्रिमल आहेत, त्यांकडे राजकारण करून खल करून पहावा. याकरितां राजश्री हिंदुराव व राजश्री गिरजाजी यादव यांचे विद्यमानें पत्र पाठविलें आहे , कीं तुह्मीं मातुश्री साहेबांचे पायांसी निष्ठा धरून ज्या स्थळीं आहां तें स्थळ हस्तवश करून देणें, आणि आपला मजुरा करून घेणें. येवढें कार्य संपादिलियावर तुमचे नातू, निळोपंताचे स्त्रीचे पदरी घातले आहेत, त्यास पेशवाई द्यावी. तुह्मी सर्वस्वें कारभार करावा येविषयीं आह्मी धण्याजवळी विनंती करून अभीष्ट सिद्धीस पावितों ह्मणून विशदर्थे पत्र पाठविलें आहे. त्यांचे पुत्र राजश्री बाबूराव केशव याकरवीं लेहविलें आहे. जरी साहेबाचे पुण्येंकरून तिहीं हात दिल्हा तरी मातबर स्थळ हस्तगत होतें, फिरोन मनसचाच उभा राहतो, याकरितां पत्रें पाठविली आहेत. ह्मणून लिहिलें तें अक्षरशा विदित जाले. तुह्मीं जो खल अगर श्रम कराल तो आमच्या स्वहिताचाच कराल, यदर्थी सर्वविषयीं भरोसा तुमचा मानिला आहे. याकरितां तु्ह्मीं जीं पत्रें पाठविलीं तीं उत्तम पाठविलीं. त्याणीं निष्ठा धरून कार्यसिद्धि केली. यावरी त्याचे अभीष्ट तुमचें वचनाप्रमाणें सिद्धीस पाविलें जाईल. राजश्री त्र्यंबक शिवदेऊ मुतालीक दिमत सचीव याचें अनुसंघान राजश्री केसो महादेव व रामचंद्र महादेव यांणीं सांगोन पाठविलें, कीं त्र्यंबकपंतीं स्वामीच्या पायासी निष्ठा धरिली आहे, कीं सांप्रत सैन्यांत आहेत, तेथून आपल्या जिल्हेस जावें आणि स्वामीचे पदरी पडावें, गड किल्ले आदिकरून हस्तवश करून घ्यावे. ये गोष्टीस गड किल्ले तूर्त नातवान पडिले आहेत त्यांचे बेगमीस दहा हजार रुपये द्यावे, आणि आपणास सरकारकुनीचा हुद्दा दबीरी अगर वाकेनिसी द्यावी म्हणून व येविषयी खासा त्याचें पत्र संकलितार्थे आलें त्यावरून राजश्री हिंदुराव व राजश्री गिरजाजी यादव ऐसे बसोन ये गोष्टीचा विचार करून त्र्यबक शिवदेऊ यासी समाधानाचें पत्र पाठविलें द्रव्य द्यावें, त्यास चार सहस्त्र रुपयांची हुडी महादाजी कृष्ण याजकडे करून पाठविली राहिलें द्रव्य कार्य सिद्ध होतांच द्यावे ऐसा निर्वा शफतपूर्वक करून दिला. सरकारकुनीचा हुद्दा साहेबाचे आज्ञेवेगळा मात्र करिता नये याकरितां उभयतानी आग्रह केला की, हातीचे राजकारण जाऊ देऊ नये याकरितां तुह्मी वाकेनिसी देतो ऐसें पत्र शफतपूर्वक तुळसी ऐसें पाठवणें हुद्याविषयी मातुश्री साहेबास आह्मी उभयता अर्ज करवून देऊं ह्मणून त्यावरून याप्रमाणें पत्रें पाठविली. जरी साहेबाचे पुण्येंकरून हे गोष्टी संपादिली ह्मणजे थोर कार्य जालें शाहूराजेयाची कमरच मोडोन हतप्रभ होऊन जाताती. ह्मणून विशदर्थे लिहिले, कीं हुद्याविषयी व द्रव्याविषयीं वचन गुंतलें आहे, खरें करावें लागेल ह्मणून. तरी, जी गोष्टी तुह्मीं योजिली, ते उत्तम आहे. आमचें राज्य सुरक्षित जालें. ज्याणीं या समयांत सेवा केली त्याचें गोमटें न करावें तरी कोणाचे करावें ? त्यामध्यें तुम्हासारिखे लोक मध्यस्त असतां तुमचें वचन गुंतले तेंच आमचें वचन. ये गोष्टीस अन्यथा होतें ऐसे नाहीं. त्र्यंबक शिवदेऊ याणे लिहिल्याप्रमाणें कार्यसिद्धि अविलबे केली, गडकिल्ले हस्तवश करून दिले, ह्मणजे तुमच्या वचनाप्रमाणें वाकेनिसीचा हुद्दा सांगितला जाईल, व द्रव्याची अनुकूलता केली जाईल. परंतु करितां कार्य त्वरेनें करावें. जों लष्कर प्रसिद्धगडा खाले आहे तों कार्य जाल्यानें पायेबंद बसोन बाजू सावरते. याकारणें त्वरा होय ऐसी गोष्ट करणें.

पत्रांक ६१६

श्री.
१७२४ कार्तिक वद्य ८
छ १९ रजब सन सलास मयातैन कार्तिक.

याद खंडो मुकुंद यांस बडोद्यास जावयाचे मार्गाचे विभागणीविसीं. सुा। सलास मयातैन व अलफ.
पत्रें.
१ बाबूराव आंगरे यास पंचवीस लोक देऊन कल्याणास पोंचवून द्यावें.
१ कल्याणचे मामलेदारांनीं पंचवीस लोक देऊन अर्जुनगडास पहोंचवायें.
१ अर्जुनगडवाल्यांनीं लिा अन्वयें माणसें देऊन मांडवीस पोंचवावें.
१ मांडवी.........स्वार बराबर देऊन बडोद्यास पोंचवून द्यावें,
१ रहदारीचें दस्तक.
------

सदरहू अन्वयें पत्रें देण्याविशीं आज्ञा. सदरहू अन्वयें पांच पत्रें देणें. छ १९ रजब सलास मयातैन, कार्तिकमास.
१ आनंदराव गायकवाड.
१ रावजी आपाजी.
------

सदरहू अन्वयें दोन पत्रें देणें.
छ २० रजब सलास मयातैन, कार्तिकमास.

पत्रांक ६१५

श्री.
१७२४ कार्तिक वद्य ७

छ १९ रजब सन सलास मयातैन, कार्तिक.

विशेष. खासा स्वारी माहाडास आली. तुह्मांकडून सरकारचें जाबसाल उगवावयाचे ह्मणून खंडो मुकुंद यांची रवानगी केली आहे. सविस्तर बोलतील, त्या अन्वयें उलगडा होऊन मारनिलेची रवानगी लौकर करावी.

लेखांक ४४                                                                    श्री                                                          १६४४ श्रावण वद्य १३                                                                                      

                                                                                                                                                                        नकलबरहुकूम असल                                                                      

                                                                                                                                                                    43 1

                                                                     
→इथला मजकूर वाचण्यासाठी इथे क्लीक करा

सुहुरसन ११३२ सन सलास अशरैन मया व अलफ कारणे नारो केशव व बाबूराव रामाजी देसपांडे पा। सुपे बारामती सरकार जुनर सुबे खुजस्तेबुनियाद यास जयपत्र करून दिल्हे ऐसे जे मशारनिलेसी यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक तुफान करून कजिया करू लागले की पा। मजकूरचे देशपांडेपण दरोबस्त आपले आहे यास वतनासी समंध नाही ऐसा कजिया दरपेश करून किले साताराचे मुकामी छ २५ माहे जिल्हेज सुहुरसन ११२९ सन इहिदे मध्ये हजूर फिर्याद जाले त्याउपर बाबूराव रामाजी हि हुजूर एऊन रुजू जाले दोन वर्षे कजियानिमित्य दरबारी हैरान जालियावरी माहाराज राजश्री स्वामी कृपाळु होऊन छ १५ माहे सवाल सन हजार ११३२ सुहुरसन सलास अशरीन मया व अलफ ते दिवसी दरबार करून कजियाचा इनसाफ करावया कारणे हरदोजन दाईमुदई बोलाऊन आणून अग्रवादे यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक यासि पूसिलें कीं तुह्मी माडतां त्यास तुह्माजवळ काही सनद मातबर आहे की काय त्यास मशारनिले बोलिले की परगणा जमा करून हुजूर आणावा आणि त्यास पूसावे ते सागतील त्यावरून कजिया निवाडावा त्याउपर पश्चमवादे बाबूराव व रामाजी यासि विचारिले याणी अर्ज केला की बिराना वादिया बोकील त्यासि आपले बाप रामाजी बावाजी याणी अवरगाबादेस वाद सागोन वादिया खोटा केला ते वेळेस फर्मान पेश अज जुलूस हासील केला आहे त्यामध्यें पेशजी दस्तूरखान निजामशाही होता त्याच्या महजराचा दाखला आहे तो फर्मान बमोहर हजरत ज्याहांपनाह आपणाजवह सनद मातबर आहे व त्या पूर्वी नवाब अमीरलउमराव शास्ताखानाचे वेळेस बिराना वादिया खोटा केला ते वेळेचा महजरर कुल परगणा व हमशाही देशकाचे शाहिदीचा आहे व आणीक हि सनदा मातबर आहेत त्यामधे आमचे व वादीमजकुराचे दाखले आहेत आणि वादेमजकूर तो आजितागाईत हे भाडण आपणासी हि भांडले च नाहीत पराव्या वादियाच्या भाडणामध्ये तमाम मोकदमानी व मातबर वतनदारानी शाईदी पूर्वी च दिल्ही आहे आणि आता त्याचे लेक व नातू आहेत त्या जमऐसे जीतर्‍हाचे घातेमध्ये गोळा केलिया त्याचा अपवड होईल तरी सनदा पाहून इनसाफ केला पाहिजे जरी सनदावरून इनसाफ करिता काही सदेह पडिला तरी मग परगणियास कष्टी करावे प्रतेक्ष दिवस असता दिवा कशास लावावा ऐसे बोलिले यावर अग्रवादियानी धाया घेतला की खामखाह परगणा आणिला च पाहिजे परगणा सागेल त्यास आपण कबूल असो ऐसा धाया घेतलियावर राजश्री स्वामीनी कुल परगणियाचे मोकदमास व हमशाही गावगनाचे पाटिलास तलब करून हुजरे व जासूद पाठऊन तमाम परगणाचे मोकदम बोलाविले होते ते बिहुजूर एऊन जमा जाले त्याउपर छ २२ माहे जिलकाद श्रावण बहुल नवमी गुरुवासर सन सलास अशरैन मया व अलफ सुहुरसन ११३२ ते दिवसी माहराज राजश्री स्वामीनी किले साताराचे मुकामी श्री कृष्णावेण्यासगम माहातीथाचे पचक्रोशीत धर्मसभा करून अष्टप्रधान व समस्तराजकार्यभागी व मातबर मातबर वतनदार बोलाऊन दरबार केला इनसाफ करावया बदल कुल देशक बोलाविला होता तो हि सभेमध्ये बैसविला आणि माहाराजसाहेबी स्वमुखे कुल धर्मसभेस लाहानथोरास बेताळीस पूर्वजाची व सत्याची व श्री ची शफत घातली की कोण्ही कोण्हाचा प्रतिपक्ष न करिता आपले सत्य स्मरोन रास्ती इनसाफ करणे ऐसी शफथ घालून इनसाफ धर्मसभेवर सोपिला त्यावरी सभानाइकानी हरदूजणास फर्माविले की आपल्या सनदा दाखविणे त्यावरी अग्रवादे यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक यानी आणोन कागद दाखविले बिता।