पत्रांक ६५२
श्रीलक्ष्मकांत.
१७२५ पौष शुद्ध १४
राजश्री नारायेण बाबूराव गोसावी यांसी:-- दंडवत विनंती उपरी. तुह्मी चिठी पाठविली ती पावली. लिहिला मजर कळला. त्यास, आंग्रजांसीं तह दोरमदार करून जाला. त्यांजकडून आ. तां अगलीक व्हावी, ऐसे राहिले नाही. पलटणे चाकर होतील, हा संशय तुझांस होता. त्यास, श्रीदयेने तो प्रकार जाला नाही व आझी केला नाही. तहाचा तपशालहि, तुह्मांकडील ग्रहस्थ येथे आहेत, त्यांचे लिहिल्यावरून कळेल, मसलतीचे प्रकर्मी तुह्मीं व राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव ऐसे त्रिवर्ग. त्यांत कृश्णराव माधव याचा प्रकार श्रीजीने तैसा केला ! आतां राहतांना तुह्मीं उभयतां आहां. तुमचे मनांत जो जो अंदेश होता, तो कोणताहि एक नाहीं. पुढे धैर्य धरून चालणें आहे. ज्या स्थळीं तुह्मी जाण्याचे योजिले होते, त्याप्रों जाणे तों जालें असेल. परंतु, तुमची भेट जालियानंतर हे सर्व प्रकार बोलण्यात येतील, तेव्हां सविस्तर समजण्यांत येईल. धैर्य व विचार तुह्मांसारखियांनी सोडू नये. जैसे लिहून पाठविले तैसे मनांत तुह्मींही ठेऊन असावें. राा छ १२ माहे रमजान * नारायण रावजी ! तुह्मांस माझे लिहिनें हेच की, जें कर्ने ते काळावर नजर देऊन केले. त्यास, आतां सर्व माझे तुह्मी. जे जे सोबती आहां त्यांहींनीं धैर्य व मसलत चुकू नये. हे तुमची व माझी व उभयतांची बोलीं जाहलीच होती. याप्रमार्ने उद्दोग असावा. तिघांतून एकाचा प्रकार तैसा जाहला. यास श्रीसत्ता प्रमान ! परंतु तुह्मी उभयेत आहां. तेव्हां धैर्य व मसलतीस न चुकतां वरचेवर इतला देत जावा. व भैटहि एखादे त-हेने सत्वर होईलच फार काय लिहूं ? बहुत काय लिहिणे १ हे विनंती. मोर्तबसुद.