पत्रांक ६५३
श्रीलक्ष्मीकांत प्रा.
१७२५ माघ शुद्ध १
वेदमूर्ती राजश्री अनंत भटजी दाजी व केसोपंत स्वामीचे सेवेसी:--
पो बाजी विठ्ठल सा नमस्कार विनंति येथील कुशल ताा माघ शुद्ध १ मा देऊळगांव, पो लोहगांव, नजीक गंगातीर, जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. सांप्रत तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर ल्याहावे. ऐशियासि, आपण येथून कूच करून म जलदरमजल फौजेसमागमें श्रीमंत पंतप्रधान यांजकडे जात असो. दुसरे राजश्री नरहरपंत सुभेदार यांणी पत्रे सरकारची ताकीदी वगैरे वैद्याचे वकिलाची वगैरे दिल्ही आहेत. ते पावतील. परंतु, यांतहि जीव नाहीं. असो. तुह्मी आपले मालमतीचा गुंता जैसा जाणाल तैसा उगऊन घेणे. बहुत काय लिहिणे १ लोभ असों दीजे. हे विनंति.