Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ६९ ] श्री. ६ जून १७१३.
राराजश्री सोनजी घोरपडे नामजाद व कारकून कोट कोल्हापूर गोसावी यासी: -अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री रामचंद्र नाळकंठ हुकमतपन्हा आशीर्वाद व अनुक्रमे नमस्कार सु।। अर्बा अशर मया अलफ राजश्री यादवराव शिवदेऊ नाडगौडा हवेली कोलापूर याणीं विनंति केली कीं, हम गांवगन्ना मोईनप्रमाणें चालत आहे. परंतु गांवगन्ना इनाम व विश्वा जकातीचा धामधुमेकरितां चालत नाहीं. तरी चालविला पाहिजे ह्मणोन विनंति केली. त्यावरून मनास आणून न पेशजी चालत होतें त्याप्रमाणें करार करून दिलें असे. बितपशील -
जकातीस विश्वा दरबैली गांगन्ना दर चावरी
रुका एक १ बिघा एक
१
एकूण दर बैली रुका एक व चावरी बिघा एकप्रमाणें मोईन करून दिल्ही असे सदरहूप्रमाणें कळवीत जाणे. हक पेशजी पावत आहे त्याप्रमाणें पावणें सालदरसाल ताजा सनदेचा उजूर न करणें तालिक लिहून घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतून देणें. जाणिजे छ २४ जमादिलावल. निदेश समक्ष.
बार सुरु सुत बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३०
१७२४ माघ.
++ विलें आहेत. ते सरंजाम सुध्धां मौजे विंचूर परगणें उत्राण येथें येऊन पोहचलें. सरंजाम थोडा ह्मणून स्यांणी हिंमत घरून आणखी स्वार व पाव लोक जदीद ठेविले आहेत. त्यासुद्धां त्यांचा सरंजाम दीड हजार स्वार व दीड हजार गाडदी यो। तीन चार हजारांचा भरणा त्यांचा आहे. लौकरच येऊन पोंहोंचतील. यानंतर राजश्री गोपाळराव राजेबाहादर मालेगांवास येऊन महिनादीड महिना जाला, राहिले आहेत. म्हणोन त्याजकडे सरसुभाहून पत्रें पाठविलीं कीं, पठाण वगैरे यांचे पारपत्याविषयीं सरकारांतून आज्ञा जाली आहे, तरी सरंजाम सुध्धां येऊन पोंहोंचवावें व राजश्री नरसिंहराव यांणींहि सदरहूअन्वयें पत्रें पाठविलीं. त्याचें उत्तर चैत्र शुद्धांत येतों, ऐसें आलें. परंतु अद्याप आले नाहीत. त्यास सरकारांतून आज्ञापत्र सादर जालें पाहिजे. ह्मणजे सरंजामसुद्धां येतील. सारांश पठाण व पेंढारी वगैरे यांणीं प्रांतांत जागाजागा धामधूम मनश्वी केली आहे व हाल्लींहि बारा तेरा हजार फौजेनसीं आपले जागा मजबुदीनें आहेत. यास्तव त्यांचे मुकाबल्यास आपलेकडील फौजेचा जमाव जाला ह्मणजे स्वामीचे प्रतापेंकरून त्यांचें पारपत्य लौकर होऊन येईल. वर्तमान कळावें, ह्मणून सेवेसीं विनंति लिहिली असे. कृपा करून, ध्यानास आणून आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२९
श्री.
१७२४ माघ वद्य १२
राजश्री नारायेणराव दादा गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। गुजाबा गुजर दंडवत विनंती येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावोन लिहिला मजकूर सविस्तर कळला. त्यास, त्याचप्रमाणें वरचेवरीं पत्र पाठऊन कुशल वृत्त लेहून पाठवीत जावें. येणेंकरून संतोष असे. जीं पत्रें तुमचेकडून येतील त्यांचींहि उत्तरें येथून पाठवण्याचें घडत जाईल. वरचेवरी तुह्मांकडून पत्रें येत असावीं. प्रेम व लोभार्थं आहे तो दिवस वृद्धी पावावा, हाच येथील संतोष. त्याविसी ल्याहावें ऐसें नाही. रा छ २६ माहे शवाल, बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२८
श्री.
१७२४ माघ वद्य ५ राजश्री माधवराव गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। चत्रसिंग राजे भोंसले दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष, बाबाजी शिवराम येथून जाऊन का वाईंत राहिला आहे. त्यास घेऊन येण्याविशई राजश्री व्यासराव हंबीर यांस लिहिलें आहे. त्याप्रमाणें बंदोबस्त करून घेऊन येतील. त्यास, का मजकुरीं हर कोण्ही दिकत घेऊन अडथळा केल्यास, आपण ताकीद करावी. रा छ १८ सवाल बहुत काय लिहिणें ? हे विनंति. लेखन सीमा.
श्री श्रीराजाशाहूछत्रपती चरणकमलबिनत चतरसिंह राजे भोंसले अविरत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२७
श्री लक्ष्मीकांत.
१७२४ माघ वद्य १
राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. यापूर्वी तुम्हांकडील पत्रांची उत्तरें वरचेवरी व रांगडे माणसासमागमें जीं पाठवावयाचीं ती पाठविलीं आहेत. पोहोंचून सविस्तर समजण्यांत येईल. राजश्री सदाशिव बापूजी याणीं तेथील ऐकिलें जें वर्तमान तें लिहिलें होतें. हें समजोन त्याचेंहि पत्राचें उत्तर पाठविलें आहे. व प्रसंगीचें वर्तमान राघोधोंडदेव लिहितां कळेल, वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहित जावें. रा छ १४ माहे शवाल, बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
रायाजी मल्हार याचे मनात पश्चात्ताप येऊन सांप्रत त्याचें अनुसंधान आलें कीं, आपणावरी मातुश्री साहेब दया करितील, पूर्ववत् आपल्या हातें सेवा घेतील, तरी आपण सुभानजी आचेले यासहवर्तमान निघोन त्या प्रांतें जातों, आपल्याकडे दिवाणची हमी आहे ते माफ करावी, व वरातदाराचे गैरादे आहेत त्याचें त्वष्ट न लावावें, पुढें मन पूर्वक दया करून सेवा घ्यावी, ये गोष्टीचा निर्वाह जालिया लिहिल्याप्रमाणे कार्य करितों ह्मणून त्यावरून त्याच्या मुद्याप्रमाणें मात्र करून समाधानपत्रें त्याकडे पाठविलीं आहेत. परंतु जाले वर्तमान साहेबास विदित व्हावें ह्मणून लिहिलें आहे, ह्मणून लिहिलें तें विदित जालें. राजश्री रायाजी मल्हार यास समाधान पत्रें पाठविलीं, उत्तम केलें ते आचेले देखील निघोन जाऊन निष्ठेनें सेवा करूं लागले, तरी सर्व प्रकारें त्याचें चालविले जाईल. परंतु आतां येवढ्या आठ चौ दिवसांत गेल्यानें कार्याचें. पुढे छावणीस लष्कर जाईल ते समयीं जातों ऐसे ह्मटलियानें लटिकें अनुसंधान ऐसें दिसोन येतें याकरितां ज्यांणी राजकारणें लाविलीं आहेत त्यांणीं, जोवरी तुह्मीं शाहूराजा रांगणेयाखाले गोऊन पाडिला आहे या संधीमध्ये ज्याणीं निष्ठा धरिली आहे, त्याणीं कार्ये करून द्यावीं, ह्मणजे तुमच्या प्रयोजनाचीं आहेत. पुढे तुह्मीं शाहूस पराभवाते पाविलियावरी कोण येक शरण येईना. याकरितां तुह्मीं ये गोष्टीची चौकशी करून, ज्यास जें सांगून पाठविणें तें पाठवून त्वरा होय तें करणें. परकी माणूस राजकारणास येईल ते गडावरी घेत नच जाणें कोणाचे हुनर कैसे असतात हें कळत नाहीं. याकरितां वरचेवरी गडाखालेच जाबसाल देऊन वजा करीत जाणें वरकड तुह्मी आपल्याविषयीचा अर्थ कितेक राजश्री बाळाजी महादेव यासी लिहिला तो सविस्तर विदित जाला घोड्याकरितां मातुश्रीची दया निदर्शनास आली, ह्मणून लिहिले, तरी आमची दया अगर लोभ तुमचे ठायी आहे तो घोड्यावरून अगर वस्त्रपात्रावरून तुमचे निदर्शनास यावा ऐसी गोष्ट नाहीं. तुह्मापेक्षां घोडी अगर आणखी प्रसंग विशेष आहे ऐसे नाहीं. ऐसें असतां तुह्मी घडी घडी मनांत सदेह करावा, हे गोष्टी उचित नाहीं. येविषयीं साहेबीं उदंड सांगितलें अगर लिहिलें तें तुह्मांस प्रमाण वाटतें ऐसें नाहीं. जे गोष्टी निदर्शनास येईल ते करणें. याउपरि त-ही नि.सदेह होऊन राज्याभिवृद्धीस प्रवर्तले आहा, त्याप्रमाणें प्रवर्तोन संतोष पावणें. आह्मांस तुह्मापेक्षा दुसरें वश्यक आहे ऐसें नाहीं. सर्व राज्यभार तुह्मांवरी टाकिला आहे. श्रीदयेनें तुह्मांस यश येतच आहे जाणिजे छ १९ मोहरम. बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा.
लेखन
शुध.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२६.
श्री. ( नकल.)
१७२४ पौष.
यादी नाना फडणवीस यांरा मंडल्याबद्दल भोंसले यांजकडून दरबारखर्चाचा करार, विा उभयतां कारभारी व नारायण बाबूराव, रु। ५००००० पौ वजा ऐवज वसूल यावा. करितां रु। १०१००० बाकी का ३९९०००
तपशील.
८४००० गंगथडी प्रकरण दरबारखर्च कबूल केला, बा याद. पौ।
दागिने पावले २ त्या बा काम गंगथडी प्रकरणीं जालें नाहीं.
३१५००० मा केशवदास मारवाडी यांजकडून वसूल आले.
---------
३९९००० याचा भरणा.
८४००० नाना फडणवीस असतां पावले दागिन्याबा.
१६५००० श्रीमंताच्या खासगीकडे नानांनी देविले, बा हुंड्या ७५०००,
७५०००, १५०००,
---------
२४९०००
बाकी रु।। १५००००
पैकीं वसूल सा
२५५००० हस्तें खंडो मुकुंद जवाहीर.
१०००० आंगठी हि-याची.
२५०० बाळ्या हिन्याच्या.
------------------
१२५००
१३००० हत्ती नग २
८००० यात्रा सुंदर.
५००० खुदाबक्ष.
------
२५५००
१५०० हत्तीचा सरंजाम गाषे व चरिंदा वगैरे यांस खर्च बा याद.
३००० दुकान खर्च दरसेंहें रु। २ प्रौ.
३०००० हुंडी गु। द्वारकादास नामें हरदास याजबा रवाना केली ते ऐवज आला नाही.
२५००० कित्ता हुंडी नारायण बाबूराव याणीं आणिली. ती हस्तें
विठोजी गायकवाड सासवडास जातां.
१००० हुंडणावळ खर्च सरासरी पंचवीस हजार वगैरे.
११००० भागटीक हीरे याचा लोलकास मोत्ये व हिरे व पाचेच लोलक.
५००० धर्मदाव बापूभट लेले.
५९
४५००० नाणें अजमासें हिशेब जवळ नाहीं. सबब चूकभूल मजुरा द्यावी.
------
१४७०००
बाकी का ३०००
नारायण बाबूराव यांस बक्षीस रु। तीन हजार करून, सदरहु ऐवजाचा जमाखर्च समजाविल्याप्रों मजुरा असे. छ ६ रमजाने सलास मयातैन, पौषमास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२५
श्री.
१७२४ पौष वद्य ७
राजश्री आनंदराव गायकवाड गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो बाजीराव रघुनाथ प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. खासा स्वारी माहाडास आली. तुम्हांकडून सरकारचे जाबसाल उगवावयाचे. याजकरितां राजश्री खंडो मुकुंद याची रवानगी केली आहे. सविस्तर बोलतील, ह्या अन्वयें उलगडा होऊन मारनिलेची रवानगी लौकर करणें. जाणिजे. छ १९ रजब, सु। सलास मया तैन व अलफ. बहुत काय * लिहिणे ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२४
श्री.
१७२४ पौष वद्य ७
दस्तक सरकार राजश्री पंत प्रधान ता। कमावीसदारान व चौकीदारान व रहदारान व बाजेलोकान व मोकदमानी देहाय. सुा। सलास मयातैन व अलफ, राजश्री खंडो मुकुंद सरकारांतून बडोद्यांस जात आहेत. बराबर घोडीं रास सात व म्याना एक व माणसें असामी च्याळीस असेत. तरी मार्गी कोणेविशीं मुजाहीम न होतां जाऊ देणें. ज्या गांवीं वस्तीस राहतील, तेथें चौकी पाहारा करून आपलाली हद्दपार करणें. जाणिजे, छ १९ रजब. आज्ञाप्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२३
श्री.
१७२४ पौष शुद्ध ७
राजश्री नारायणराव गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो बाबुराव आंगरे वजारतमाब सवाई सरखेल रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. राजश्री राऊ पंडित पंतप्रधान यांची स्वारी रेवदंडीयाहून वसईस गेल्या तागाईत, अलिकडे तुम्हांकडून पत्र येऊन तिकडील कांहीं समजत नाहीं. रेवदंडेचे मुकामीं भेट जाहली. तें समईं कित्येक बोलणीं चालणीं जालीं होतीं. त्यांतून तेथें गेल्यावर कोणकोणते बंदोबस्त कोणे त-हेचे कसे जाहले ते सविस्तर तपशील लेहुन कळवावें. त्यासारखें येथें विचार केले पाहिजेत. राजश्री राऊपंडित यांस पत्र लिहिलें आहे. त्याचेंही उत्तर घेऊन सत्वर पाठवावें. रा। छ ५ माहे रमजान, बहुत काय लिहिणें ? लाभ किजे. हे विनंति. मोर्तबसुद. शिका.