लेखांक ५३ १५६५
सु॥ अर्बा अर्बैन अलफ कारणे महजर (लेहोन दिला ऐसा जे)
तिमाजी पुरोशोतम देसकुलकणी पा। सिरवल हे दोघे आपणामधे आपण देशुलकणाबदल व गाउकुलकरणाबदल भाडत होते ह्मणउनु निवाडियाकारणे साहेबापासी आले साहेबी सदरेहून हजीर मजालसी या देखता दोघाजणाचे बोल मनास आणिता तिमाजी पुरोशेतम बोलिले जे आपला आजा लुखो विठल त्यासी दोग पुत्र वडिल रामाजीचा आजा कान्हो व धाकटा आपला बाप पुरखोवा ऐसे रामाजीचे व आपले एक घर आसोन रामाजी देसकुलकरणाचा निमे वाटा व गाउ कुलकरणाचा वाटा व इनामतीचा वाटा आपणासी देत नाही तरी साहेबी रामाजीस सागोन निमे देसकुलकरण व गाउकुलकरण निमे व सेते निमे ऐसी देविली पाहिजे ऐसे तिमाजी बोलिला हे बोल हजिर मजालसी खातिरेसी आणून हजीर मजालसी रामाजी विठलसी पुसिले जे तुझे व तिमाजीचे घर एक होउनु व्रीतीच वाटा तिमाजीस कायेबदल देत नाहीस ऐसे पुसिले त्यावरी रामाजी विठल बोलिला जे तिमाजी देसकुलकरणाचा व गावकुलकरणाचा निमे तकसीमदार होय ऐसे आसोन आपणच घेता तरि हा आपला आन्याये जाला आहे तरी साहेबी देसकुलकरण व गावकुलकरण व इनाम ऐसी निमे वाटोन आपणासी द्यावी व निमे तिमाजी पुरोशेतमास देणे ऐसे रामाजी बोलिला येणेप्रमाणे दर दो जणाचे बोल मनास आणोनु दोघाजणास देस कुलकरण व गावकुलकरण व इनाम सेत व मला व मानमाननुक याचा येणेप्रमाणे निवाडा केला बितपसिल देसकुलकरणी दोघे हि कागदपत्री दोन्ही नावे लिहीत जावे आधी रामाजी विठल त्याचे नाव लिहिणे मग तिमाजी पुरोशेतमाचे लिहिणे व दिवाणीतील तश्रीफ व पाने जे हरयेक ठाईची व टिला व हरयेक मानमाननुक आधी रामाजी विठल यासी यामधून तिमाजी पुरोशेतमास येणेप्रमाणे मानमाननुक घेणे देसकुलकरणाचा हकलाजिमा व बाजे व्रीतीते दो ठोइ दोघानी येणेप्रमाणे वाटून खाणे तपसिल
रामाजी विठल यासी वाटा दिल्हे
देखील बापभाऊ
→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
येणेप्रमाणे निवाडा केला आहे त्याप्रमारे हर दोजणी लेकुराचे लेकुरी खाऊनु दोघाजणी देसकुलकरण चालवणे हिलाहरकती न करावी हिलाहरकती करून निवडिलेप्रमाणे जो वर्तेना त्याणे दिवाणात होन पाचसे देणे हा महजर सही