[ ७८ ] अलीफ. १५ मार्च १७१९.
सर्व शूरात श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर, इस्लामाचे रक्षक, शाहू राजे यांणीं बादशाही कृपेस आपला सत्कार समजोन जाणावे की -- सांप्रत अमीरुलउमराव याणी अर्ज केल्यावरून तुमचे कदीम राज्यांतून दहा लक्ष रुपये पेषकषी द्यावयाचें मुकरर करून हा फर्मान तुह्मास लिहून दिल्हा असे. तरी पेषकषीचा ऐवज, चौथाई रोख घेऊन, बाकी किस्तीप्रमाणे द्यावा आणि सदोदित इकडील लक्षात वागोन मुलकाची आबादी व मुफसरांस तबी पोहोचवीत जावी व इकडील दौलतीची किफायत करण्यांत आपलें कल्याणाचे कारण जाणावे छ ४ जमादिलोवल, सन १ जुलूस, सु।। सन ११३१ हिजरी.
अलीफ.
यादी महाराज यांजकडे महालेराजेकदीम पेशजीप्रमाणें राजे शाहूकडे दिल्हे. त्याची पेषकष दहा लक्ष रुपये ठरविली. त्याप्रमाणें चौथाई हस्तगत जाल्यावर द्यावी, आणि बाकी ऐवज किस्ती बाकीप्रमाणें. त्याप्रमाणे सरकार आज्ञा जाहाली ते महाल सदतीस.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)