[ ७७ ] अलीफ. २० फेब्रुवारी १७१९.
सांप्रत अर्ज जाला कीं राजश्रेष्ठ राजे शाहू इकडील लक्षात वागोन पधरा हजार स्वारांनसी दक्षिणेचे सुभ्याची कुमक राखितील. त्याजवरून सहा सुभे दक्षिणेचे, त्यांची चौथाई सदरहू स्वारांचे खर्चाबद्दल घेत जावी असें ठरले ऐसियास, किल्लेदार, मामलतदार, जहागीरदार व करोडे वगैरे वर्तमान व भावी याणीं सुभेमजकूरची चौथाई त्यांस देत जावी ताकीद छ २२ रबिलाखर, सन १ जुलूस, सुll सन ११३१ हिजरी.