[ ८० ] अलीफ. २२ सप्टेंबर १७१९.
राजे शाहू याणीं बादशाही कृपेस आपला सत्कार समजोन जाणावें कीं, सांप्रत थोरले बादशाह यांस तापाचा आजार होऊन कैलासवासी जाले आणि ईश्वरकृपेनें आह्मीं राज्याधिकारी जालो. सा। तुह्मास फर्मान लिहिला आहे. तरी तुह्मीही येविशीचा सतोष मानून पेशजी प्रो। इकडील लक्षात वागवण्यात आपले बढतीचे कारण समजोन अलीखान वजीर व त्याजकडील उमराव यांसी सख्य राखून सुभेदार व ठाणेदार यास मदत देत जावी आणि असा बंदोबस्त राखावा कीं, कोणीही मुफसद बादशाही मुलखात बंड न करूं शके. छ १९ जिलकाद, सन १ जुलूस.