लेखांक ५६ १६१५
पा। सिरवळ
दस्त कर्यात
गाव गना
रकमाला
१
---
७
मौजे खंडाले अज जमीनजुमला जिराती चावर २६ बाद बजा वाजट चावर ८ सबब मौजे मजकूर जमीन वाजट वाढत होती त्यासि पेसजी कारकीर्दीस हजरत मिया रहीम महमद इदलशाही किलेदार पा। मा।र यानी मौजे मजकुरीची जमीन मोजून वाजट बाद दिल्ही बा। कौल बिनाव मोकदम मौजे मजकूर छ २२ रजबू सन तिसा अर्बैन अलफ व कारकीर्दी माहाराज राजश्री सीवाजी राजे साहेब याचे वेळेस राजश्री मोरो त्रिमल प्रधान यानी पा। मजकुरास एऊन कीर्दी परगणीची मोजून धारा बाधोन दिल्हा ते समई सारा गाव मोजून मसाती केली वाजट जमीन बाद पडिली ते खरी जाली त्यावरून मशारनुले पत स्वामीने मोकदमास कौल देऊन वाजट जमीन बाद दिल्ही चावर ८ बाकी जमीन चावर १८
खालीसाती चावर इनामती चावर
१५।- १। मोकदम
.।- कुलकर्णी
१ पाडेवार
-।. निगा विहीर
---------
* २lll