लेखांक ६४ १५२३ आषाढ शुध्द ९
+ + + + प्लव संवत्सरे आषाढ शुध्द ९ नवमी बुधे तद्दिनी नरशिंभट्टास नरा + + + टी लेहून दिल्हे की अमचा बाप एकनाथभट्टे तुमचा बाप रंगभट्टयास पसर्णीच्या इनामपैकी बिघे १५ पंधरा दिल्हे आहेत ते आपणही दिल्हे मनापासून अर्थाअर्थी तुह्मास अह्मास कलहास संबंध नाही याचा साक्षी हे सत्य
लेखांक ६५ १५२६ श्रावण वद्य १४
हईबतखान
अज रखतखाने खोदायवंद खान अलीशान दामदवलतहू
ता। अता मलीक नेबगैदार वा कारकुनानि पा। वाई बिदानद की हर्ची सु॥ खमस अलफ जमीन नीच चावर .॥. दर सवाद मौजे मालगाऊ ब॥ इनाम बो। अबदुल चस्मकोर बिन बाद ऊ औलियाद आआद ऊ बमोजीब भोगवटा खु॥ रा। इजानेब दर साल अर्बा मुर्तन रवा अस्त बायेद की एशा बजो की जाबाती सन तल मजकुरासी दिल्हे अस भोगवटा तसरुफती पाहून दुबाला कीजे तालीक लिहून घेउनु असली परतौनु दीजे
तेरीख २७ माहे रबिलोवल