[ ८९ ] श्री. ८ सप्टेंबर १७२४.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५१ क्रोधी नाम संवत्सरे आश्विन शु ।। प्रतिपदा इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपती स्वामी याणीं कमाविसदारान व लोकान दिगत पंचोत्रा यासी आज्ञा केली ऐसी जेः-
° श्री ˜ ˜ °
राजाशंभुछत्रपति श्रीआईआदि
हर्षनिदान । रघुना पुरुषश्रीराजा
थसुततिमाजीपडि शिवछत्रपतीस्वामि
तमुख्यप्रधान कृपानिधी।तस्य
परशुरामत्र्यंबक
प्रतिनिधि
मौजे सोलकूर ता। तारले हा गांव राजश्री रामगव दादाजी यासी स्वामीनी इनाम दिल्हा आहे. पंचोत्राही देऊन तुह्मांस हें आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मीं हें जाणून मौजे मजकुरास पंचोत्र्याचा तगादा न लावणें. निदेश समक्ष.
मर्यादेयं
विराजते.
सुरसुदबार.