[ ९० ] जलसेन श्री. ७ सप्टेंबर १७२५.
° श्री ˜
राजाशिवसेवेसीतत्पर
संताजीसुतपिराजी
घोरपडे निरंतर
आज्ञापत्र समस्तसेनाधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री पिराजी घोरपडे ता। मोकदमानी, मौजे बहिरेश्वर, हवेली कोल्हापूर, सु।। सन सित् अशैन मया अलफ - मौजे मजकुरी श्री थोर देवस्थान आहे. तेथील पूर्वी उत्साह नंदादीप नैवेद्य पूजा पुरस्कार चालत होती.
अलीकडे धामधुमीमुळें राहिली होती. ऐशियास, तुज राजश्री रामचंद्र पंडित हुकुमतपन्हा यांहीं इनाम जमीन सनदा करून दिल्या आहेत.
श्री देवास जमीन शंकरगीर परंपरा दुर्गानाथगीर
चावर ०ll० गोसावी ते मठ बाधून राहतील.
यास भंडा-याकारणें जमीन ०ll०
येकूण एक चावर जमीन दिली आहे त्याप्रों। बिलाकुसूर चालवणें कोणीं हिला हरकत करील त्यास ताकीद होईल श्रीचा देवद्रोह लागेल थोर देवस्थान आहे यास खलेल कोण्हीं करावयास गरज नाहीं. सुरळीत चालवणें जाणिजे छ १९ रबिलाखर.
बार लेखन
सीमा.