लेखांक ६२ श्रीसकरप्रसन १६३४ वैशाख शुध्द ४
राजश्री यादोपंत देसकुलकर्णी पा। सिरवल
गोसावी यासी
॥ श्नेहकित बाजी बीन हसाजी अवारी पाटील मौजे अजणुज पा। मजकुर सु॥ सन ११२१ कारणे कागद ले(हो)न दिल्हा ऐसा जे आपली बिटिक सोनी हीस बाजी पा। असवलीकर यासी दिल्ही होती किमती रु। ८
आठ आणी जकाती त्याणे वारावी ऐसी करून दिल्ही एक महिना ठेविली आण जकातीचे निगाड रु।९ नव बनाजीपती आपणावरी रोखा केला त्याणे वारावे ते वारिले नाही आण बटीक माघारी दिल्हे ते आपण घेऊन सिरवलास आलो त्यास रा। रघुनाथपती बनाजीपंतास व पाणेसारे बोलाऊन जकातीचे ली॥ वारिले आण तुह्मास आपण बटीक ति सदरहू किमतीप्रमाणे तुह्मास दिल्ही असे यासी कोणी मुजाम होईल त्यास आपण वारून हे कागद ली। सही छ २ रबिलाखर हा। रत्नाजी बहीरव पानसा कुलकर्णी मौजे भादेली
गोही
र + + + +