Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ५ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, राजश्री बाबाराव गोविंद यांस पुणियास जाण्याची रुखसत नवाबांनीं दिल्ही, त्या समंई मारनिलेसी कितेक बोलण्याचे मरातब सांगणे तें आमचे समक्ष दौलांनीं त्यांसी बोलण्यांत आणून मग निरोप द्यावा यैसा बेत ठरला. छ. १७ माहे सफरी दौलांनीं आह्मांकडे सांगोन पाठविल्यावरून गेलों. बाबारावही आले. साहा सात घटिकापर्यंत येकांतीं बोलणें जालें. याचा ता अलाहिदा पुरवणीपत्रीं विनंती लि आहे, त्यावरून सविस्तर ध्यानांत येईल, बाबाराव यांसी दौलाचें बोलणें जालें, त्यास मार निले आह्मांकडे येणार आहेत. त्यांत आह्मांवेगळे दौला त्यांसी काय बोलले आहेत.. यांतीलबी खुलासा समजेल, त्यासारखी मागाहून ता वार लिहितो, रा छ. २१ सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०२ १५८० मार्गशीर्ष शुध्द ९
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवंद खाने अलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानंद सु॥सन तिसा खमसैन अलफ दरीविले नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ जुनारदार सो। का। मजकूर हुजरु येउनु मालूम केले जे अपणासी इनाम जमीन बतीस बिघे ।२ दर सवाद मौजे एकसर सा। मुर्हे पा। मजकूर देखील माहसूल नकदयाती वा बाजे उजुहाती बा। खुर्दखत मोकासाइयानी माजी वा खुर्दखत साबिकाप्रमाणे दुंबाला होउनु चालत आहे हाली हुजरून कुल इनाम अमानत फर्माविले आहे ह्मणुनु कारकुनानि इस्कील करून दुंबाला करीत नाही साहेबी नजर इनायती फर्माउनु सदरहू इस्कील करून दुंबाला फर्मावया रजा होय ह्मणुनु ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत साबिका प्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत साल गुदस्ता जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुंबाला करून चालवीजे अमानत केलेचे उजूर न कीजे उचापती केले असेल ते परतुनु दीजे दर हर साला खुर्दखतचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल परतुनु दीजे पा। हुजरु रा। मुलाअली
रुजु सुरु -
निवीस
तेरीख ७
रेबिलोवल सुरु सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व ९ शनिवार शके १७१५
श्रीमंत राजश्री-------------------- रावसाहेब-------
स्वामीचे सेवेसीं-------------
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार. विनंती विज्ञापना. ता छ, २१ माहे सफरपर्यंत मु बदेर येथें स्वामीचे कृपावलोकनें करून सैवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान छ. १७ माहे मारीं लेखन करुन पत्राची खानगी सेवेसीं केली त्यावरुन ध्यानास आलें असेल. सांप्रत येथील वर्तमानाची विनंती अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहीली आहे. अवलोकनें ध्यानांत येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ, सेवेसीं श्रत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३३ ] श्री. १७३२.
राजश्री उदाजीराव चव्हाण हिंमतबहादूर गोसावी यासीः -
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित केशव त्र्यंबक रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. गोसावी यांनी पत्र पाठविलें तें पावलें. तेथें लिहिलें कीं, उत्तरेकडील तहपैकीं राजश्री पंतअमात्य यांकडील खासगत खेडीं व गगनगडच्या तनखियाच्या खेड्यावरी काय पट्टी घातली तें लिहून पाठवणें. पैकियाचा निशा आह्मांकडे झाला. पट्टी लेहून पाठवणें. पैका पाठवून देऊन, राशिवडे, सांगरूळ खेरीज करून वरातदार पाठविले असतील ते आणवणें. ह्मणोन लिहिलें. त्यावरून वरातदार पाठविले होते ते उठवून आणविले. मनारोखे पाठविले आहेत. आपल्या लिहिल्यापेक्षां अधिक काय आहे ? गांवगन्नांची पट्टी पाठवणें तरी राजश्री दामाजीपंत गोसावी याकडे चौथाईच्या तहाकरितां पाठविले आहेत. ते तह करून आल्यानंतर त्याप्रों। पट्टी करून गांवगन्ना आपणाकडे लेहून पाठवून राशिवड्याचे व सांगरूळचे रोखे गोसावी याकडे दिल्हेच आहेत. बहुत काय लिहिणें. कृपा असो दिल्ही पाहिजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३२ ] श्री. १७३१.
रा। रघुनाथ देवास उपर. उद्धवसुत येथें आले. तुमचें वर्तमान सांगितलें तें परिसून समाधान जालें याउपर सत्वर तुमची व आमची भेट लवकर होय ते करन. जे ठायीं राहातां तो ठाव आनीक येक दोन ठाव हाताखाली घालण. दुसरा विचार न करण. केल कार्य सिद्धीस पावन. तुमचा अभिमान आमास असे. तुमचे उत्तर यताच दीक्षितास करविरास पाठवितो. चकारपूर्वक मातु.श्रीच्या दरसनास येतो. तर तुह्मीं बुद्धीस धक्का न खान. बहुत काय लिहिन. आपन सुदन असा.*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०१ १५८० मार्गशीर्ष शुध्द ९
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवंद खान आलीशान खा। अफजलखान महमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल वा इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानंद सु॥ सन तिसा खमसैन अलफ दरीविले गिरमाजी त्रियंबक जुनारदार सेकीना कसबे पा। मजकूर देखील माहसूल नकदयाती वा खा। गला व तूप बेठबेगार वा फर्माइसी कुलबाब बा। खुर्दखत मोकासाइयानी वा। खुर्दखत साबीका दुबाला होउनु चालत आहे हाली कुल इनाम अमानत फर्माउनु खुर्दखत सादीर केले असे ह्मणुनु कारकुनानि इस्कील करून दुंबाला करीत नाही नजर इनायत फर्माउनु सदरहू इस्कील दूर करून दुबाला फर्मावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत साबिका प्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत साल गुदस्ता जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुंबाला करून चालवीजे अमानत केलेचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल परतूनु दीजे पा। हुजरू मुलाअली
रुजु सुरु -
निवीस
तेरीख ७
रबिलोवल सुरु सूद
गिरमाजी त्रिंबकु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. पूर्वा नक्षत्र अखेरपर्यंत इकडील तमाम प्रांतीं पर्जन्याची वृष्टी फार जाली. कितेक ठिकाणीं मूग उडीद वगैरे जिनसांस पाणी लागुन खराब जाले. पाऊस उघडावा यैसें सर्वत्रांस जालें, उत्तरा नक्षत्र सगळें कोरडें गेलें. वापसे जाले, कितेक जागा रबीच्या पेरण्या जाल्या. खरीफ चांगलें आलें. सांप्रत तेरा चौदा सेर जौरी येथें धारण १ तालुकियांत सतरा आठरा शेर याप्रों आहे. सारांष, साल मारि हंगामसीर धारण जसी व्हावी तसी होईल असें चिन्ह दिसतें. पर्जन्य चांगले जाले. रा छ. १७ माहे सफर हे विज्ञापना.
श्री.
अखबार झा छ. १० ता छ, १६ माहे सफर रवानाजीला असे. रा। छ. १७ माहे मजकुर सन १२०३ फसली, हे विज्ञापना. छ २१ सफरी पुण्यास डांकेवर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३१ ] श्री. १७३१.
आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें पावलें. अक्षरश: वृत्त विदित होऊन स्वामी संतोषी जाले. तुह्मीं यादी पाठविली ती चित्तारूढ करून करार केली आहे. राजश्री गोंदजी गायकवाड आले. तुह्मीं लिहिल्याप्रमाणें त्यांचें समाधान करून पुन: तुह्मांकडे पाठविले आहे. कितेक वृत शपथपुर. सर कार्यकर्तव्यतेचा अर्थ यांसी आज्ञा केली आहे हे व विठ्ठल कृष्ण व तुकोजी खांडे ऐसे तुह्मांपाशी पाठविले आहेत. हे आज्ञेप्रमाणें सांगतील तें मनाशीं आणून अविलंबें कार्य सिद्ध करून महद्यश घेतलें पाहिजे अत. पर सर्व प्रकारें तुमच्या भरोशावरी स्वामी निश्चित आहेत सविस्तर वृत्त राजश्री गोंदजी गायकवाड व उभयतां सांगतील त्यावरून कळों येईल. रा। रामाजीपत व रा। गोंदजी गायकवाड व तुकोजी खांडे व विठ्ठल कृष्ण जे सांगतील ते आमचीं वचनें जाणोन कार्य सिद्धीस पावणें. विलंबावर न घालणें हे पत्र लक्षपत्रांचें जागा मानून सिद्धीस पावणें दुसरिया पत्राचा मार्ग न पाहणे बहुत काय लिहीन सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.
.......इंग्रज कलकत्त्यास ........ ( गलबतां .... ) त सवार होऊन चेनापटणास छ, माहे सफरी दाखल जाला. याचें वर्तमान नबाबांचे सरकारांत छ. १४ माहे मारीं चेनापटणचे अखबारींत आलें. रा छ, १७ माहे सफर हे विज्ञापना.
श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. व्यंकटराम दिला याजकडून चेनापटणाहून अखवार आली, ती येथून रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करतील, त्याजवरून वर्तमान ध्यानांत येईल, रा छ. १७ माहे सफर हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. ........ जी येथें येके ठिकाणीं अशी आहे कीं .... समंई आपल्यासीं बिगाड करतील ........ पुरत नाहीं. ज्या समंई नमुद होतील. तेव्हां मुष्कीले पडेल हें समजोन, टिपु बहुत सावधपणें आतां पासोन बंदोबस्तास लागला. पाहाडी दरोबस्त किले येथील यजबुती ज्याबज्या करावयास लाविली. पाहाडी किले जातील सरंजाम पोक्त ठेऊन बंदोबस्त करविला. व, जमीदोन किले इंग्रजाचें लढाईंत परिच्छिन्न राहावयाचै नाहींत. हें जाणून जितका जमीदोन किला कोयते पाडून साफ करावा यैसा विध्यार केला आहे. पटणचे पूर्वेकडे किला मजबूत करावयास आरंभ केला आहे. जातीनें रोज तेथें जाऊन किल्याची दुरुस्ती होत असती. नित्याचा दरबारही त्याच जागीं होतो. याप्रो वर्तमान शोध लागला, त्याची विनंती लिहिली असे. रा छ, १७ सफर हे विज्ञापना.