[ १३२ ] श्री. १७३१.
रा। रघुनाथ देवास उपर. उद्धवसुत येथें आले. तुमचें वर्तमान सांगितलें तें परिसून समाधान जालें याउपर सत्वर तुमची व आमची भेट लवकर होय ते करन. जे ठायीं राहातां तो ठाव आनीक येक दोन ठाव हाताखाली घालण. दुसरा विचार न करण. केल कार्य सिद्धीस पावन. तुमचा अभिमान आमास असे. तुमचे उत्तर यताच दीक्षितास करविरास पाठवितो. चकारपूर्वक मातु.श्रीच्या दरसनास येतो. तर तुह्मीं बुद्धीस धक्का न खान. बहुत काय लिहिन. आपन सुदन असा.*