Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना, अलफखान करनुळकर यांजकडुन रणदुलाखान नवाबांकडें आले. त्यांचे बोलणें मध्यास्तासीं होऊन अलफखान यांजकडे कुल तालुका बाहाल जाला. “ टिपुकडील पेषकसीचे यैवजाची निकड करनुलकरास लागली. याचा बंदोबस्त व्हावा " म्हणोन रणदुलाखानाचें बोलणें, मध्यस्ताचे म्ह ( ण ) णें कीं “ लाड बाहादुर यांसलेहून बंदोबस्त होईल तेथवर करितो, परंतु रणमस्तखान यांचा मोहरी दस्त यैवज टिपुपासीं असल्यास पेषकसीचा यैवज सालाबाद देणे प्राप्त करार. च असा आहे, त्यापक्षीं दस्त यैवजः निघाल्यास बोलण्यास जागा नाहीं. परंतु दस्त यैवज मोहरी त्याजपासीं नाहीं. जर दस्त यैवज असता तर आजपर्यंत कैद करून कशास ठेवते ? तथापि निघाल्यास दोन लाख रु. पेषकसीचा दस्त यैवज असला तरी लाख रु. तीन सरकारचे व लाख टिपुचे याचा निर्णय पुढें पाहता येईल. त्यास तुम्हीं बंदगान अली यांचे नांवें अर्जी ल्याहावीं कीं, टिपुकडील पेषकसीचा तगादा होतो. त्यास रणमस्तखान यांचे मोहरी दस्त यैवज त्यापासीं निघाल्यास मंजूर." याप्रा रणदुलाखान यांसी मध्यस्तांनी बोलून रणदुलाखान यांची अर्जी सदरहुप्रा नबाबास देण्याचा मसविदा मध्यस्तांनीं रणदुलाखान यांस आमचे समक्ष करून दिल्हा, रा छ ६ माहे सफर हे विज्ञापना.

श्री.
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. मध्यस्तांनीं बोलण्यांत आणलें की “ लाडबाहादुरकलकत्याहून मोहरमी जाहजांत सवार जाल्याचें वर्तमान आलें. चेनापटणास येणार, छ, २२ मोहरमचीं पत्रें चेना पटणाकडून अखबार वगैरे आलीं . तोंपावेतों लाडसाहेब चेनापटनास दाखल जाले नाहींत. कलकत्याहून स्वार जाले त्यापक्षीं लौकर येतील” याप्रा बोलले. रा छ. ६ सफर हे विज्ञापना.

श्री.
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. मध्यस्ताचे बोलण्यांत आले कीं “ इंग्रज व फरासीस यांचा बिगाड विलायतेंत जाल्यानंतर त्यांच्या त्यांच्यातीन लडाया मातबर जाल्या. त्यांत तर्फेंनचीं मनुष्यें बहुत खपली गेलीं. फरासीसाकडील जमाव भारी. इंग्रज 14724
वगैरे तीन च्यार टोपीवाले येकत्र होऊन लडाया जाल्या, परंतु फरासीस गालब. तेव्हां इंग्रजांनीं रूसवाले टोपीकर याजकडे राजकारण करून त्यास षामील करून घेतलें, रूसवाल्याचा जमाव हमेषा भारी. ज्याजकडील जंगी जाहा. जांत तीस लाख लडाक माणसें समवाल्यासी ज्यांची लडाई पैहाम होत असती त्यांस इंग्रजांनीं मेळऊन घेतल्यानंतर रूसवाले व इंग्रज येकत्र होऊन फरासीसासी लडाई मातबर जाली. फरासीसाची सिकस्त जाल्याचें वर्तमान आलें. खुष्कींत फुलचेरी बंदरही इंग्रजांनी घेतलें, " याप्रा बोलले. “तीन दिवसपर्यंत फरासीस इंग्रजासी फुलचेरीवर लडले. सेवटीं ताबा इंग्रजांकडील फौज सरंजामाचा सोसेना, सबब किला इंग्रजांचे स्वाधीन केला.” याप्रा बोलले, रा। छ. ६ माहे सफर हे विज्ञापना.

श्री.
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. “पागेकडील पस्तीस माहालचा बंदोबस्त नबाबांनीं महमद अजीमखा यांचे विच्यारें सिदी इमाम यास सर अमीली देऊन केला” इत्यादिक तपसिलाची विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानास आलें असेल. सिदी इनाम यांनीं तमाम पागेकडील तालुक्यांत आपल्या नफ्त्या पाठविल्या. सर बुलंदजंग घासीमियां वगैरेकडील अमील होते ते तगीर जाले. त्यास हें सर्व करणें महंमद अजीमखा यांचे विच्याराचें, त्यांनीं घासीमियां यांजकडील संमत कांहीं घेऊन केलें. सर बुलंदजंग वगैरे अलाहिदा राहिले. ते आपले ठिकाणीं नाखुष, कीं झाडून तालुकियाचा सरसुभा सिदी इमाम जाला. तो माहावारी उचले हातें देईल तें घेऊन खाऊन पडावें. तालुक्यांत सर्व हुकुम अहकाम त्यांजकडील. यांत राहिलें काय ? याप्रा मनांत येऊन, त्यांनीं तीन च्यार इसमांनीं येक होऊन अटा बांधिला. व्यंकटराव सरसुभेदार सुरापुरकर यांजकडे सर बुलंदजंगाकडील तीन तालुके. पा हसनाबाद व अलंद गुंजोटी अमीलीनें होते, त्या तालुक्यास सिदीची जप्ती गेली. व्यंकटराव यांची व सिदाची पहिली ही अदावत. त्यांचे तालुके सिदानें व सिदीचे व्यंकटराव यांनीं इजाफे कबूल करून केले, याप्रा चुरुस होतीच. हल्लीं सिदीचा पगडा कुल पागा तालुकियांतपडला, हे गोष्ट व्यंकटराव यांस आहद होऊन सरबुलदजंग यास हेही अनुकुल जाले. सरबुलदजंग आदिकरून व्यंकटराव यांचा येक विचार जाला कीं कोणेंही प्रकारें सिदीनें काम केलें हें उलटावें. इजाफा वरता बोलावा, परंतु जाले कामाची पायमली करून आपटी द्यावी. याप्रा नक्षा बांधुन राज्याजी यांचे विद्यमानें जाबसाल शुरु केला. पागा तालुकयाचा येकंदर सरकारी अकार शिवाये खर्च बावीस लाख, याजवर दहा लक्ष व्याजती आकार करून देण्याचें बोलणें सिदीइमाम यांचें, अजमखान यांचें विचारें नवाबापासीं होऊन, बेचाळीस लक्षाचा अंदाजा ठरला. हलीं व्यंकटराव यांणीं दहा लक्ष इजाफा बोलण्यांत आणिला. बावन लक्षावर गोष्ट आली. मध्यस्ता पासीं राज्याजीचे मारफत बोलणें पडलें, पागा तालुकियांत हरयेक त-हेनें आपला कदम सिरावा याची हाउस मध्यस्तास होतीच. इतके दिवस उद्योग केला परंतु साध्य न जाला. सांप्रत घरांतील फुट पडून अनायासें करून सरबुलदजंग वगैरे कडील पैगाम लागला. यांत संतोष मध्यस्तास होऊन नवाबाकडे मध्यस्त गेले. पागा तालुकियावर इजाफा असा इत्यादिक बयान करून अर्ज केला. सरबुलदजंग घासीमियां गुलामइमाम वगैरे आले. बोलणें च्यारसाहा घटिका पर्येंत यांचे त्यांचे जालें. व्यंकटराव यांची पाठ थापटून मध्यस्तांनी आधींच सिद्ध केलें. बावन लक्षाचे आकाराचें बोलणें पडलें. शिवाय माहाल मार खर्च सिबंदी वगैरे आठ लक्ष यैसें बोलण्यांत होतें. त्याजवर ही मध्यस्नांनीं मात्रा चढवून बोलले कीं आठ लक्ष सिबंदी खर्च बाबत देणें व यैन बावन लाख. येकून साठ लाख रुपयांचा जिमा करून जो उचलील त्यानें पागा तालुकियाचे दरोबस्त काम करावें. याप्रा साठ लाखावर रकम येऊन पोहंचली. हलीं सिदी इमाम यांस म्हणतात कीं तुम्ही साठ लाख कबूल करून काम करावें. नाहीं तर सदरहुप्रा व्यंकटराव यांजकडे करार करून देतों. याचा विच्यार करून अर्ज करितों. याप्रा अजमखां व सिदी इमाम यांचे बोलणें. याजवर कोणाकडे ठरतें ते पाहावें. सारांश पागा तालुकयाचा बंदोबस्त आजपर्यंत नवाबांनीं जातीनें राखिला होता. सांप्रत घरांतील फुट पडल्यामुळे या थरास नौबत पोंहचली. रा छ. ६ सफर हे विनंती.

श्री
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.


श्रीमंत राजश्री----- रावसाहेब स्वामीचे
सेवेसीं----

विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतामेक सा नमस्कार विनंति, विज्ञापना. ता छ २६ माहे सफरपर्यत मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी डांकेवर ता बार विनंति लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान अलाहिदा पुरवणी पत्रीं सेवेसीं विनंति लेहून पत्राची रवानगी केली असे, त्यावरून अवलोकनांत येईल. उत्तरें रवाना करावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

लेखांक ९८                                                                                                                                    १५७९ कार्तिक वद्य १०
                                                                                                               
                                                63                      63     

                                                                                          (फारसी मजकूर)

अज रखतखाने खोदायवंद खाने अलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल वा इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानंद सु॥सन समान खमसैन अलफ दरीविले नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ सो। कसबे वाई हुजूर मालूम केले जे अपणासी इनाम जमीन चावर नीम दर सवाद मौजे उझरडे पा। मजकूर बिमोजीब खुर्दखत मोकासाइयानि माजी व खुर्दखत साबिका प्रमाणे दुबाला होउनु चालत आहे हाली कुल इनाम हुजरून अमानत फर्माउनु हुजरु रसद पाठवणे ह्मणुनु वा मुलाहिजाबदल इनामदारसी खुर्दखत दिल्हेया दुबाला न कीजे ह्मणुनु माहला खुर्दखत सादीर आहे ह्मणुनु माहलीचे कारकुनानि इस्कील करून दुबाला करीत नाही साहेबी नजर इनायत फर्माउनु इस्कील दूर करून दुबाला फर्मावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत साबीकाप्रमाणे प्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत सालगुदस्त जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुबाला कीजे सालगु॥ जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुबाला करून चालवीजे सदरहू प्रमाणे इनाम अमानत जाहले असे त्याचे उजूर न कीजे बऔलाद व अहफवाद ऊ चालवीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लिहून घेउनु असल परतुनु दीजे पा। हुजूर रा। शहमलीक गोरी मोर्तब सूद

                                                                                                  86                      रुजु सुरु निवीस

 

तेरीख २३
सफर          रुजु                                                                                                    सुरु सूद
                                                                          पौ। छ १३ रबिलोवल

[ १२६ ]                                          श्रीरघुवीर.                                         १७३१.

राजश्री रघुनाथ देव यांसी आज्ञा केली ऐसी जेः-
शिवराम नामकासमागमें येथून रकारनामक व मकारनामक पाठविलें आहे याबरोबर कितेक लग्ननिश्चयाचा निर्वाह सागोन पाठविला आहे. तो चित्तांत ऐकोन त्याप्रमाणें तुह्मीं निर्वाहरूप याबराबरी सांगोन पाठविणें. रकार व मकारनामक येथें येऊन सांगतील ह्मणजे आह्मांस शरीरसंबध जाला ऐसें कळेल. मकारनामकाबरोबर बिल्वपत्र पाठविलें आहे तें घेणें. माणूस पाठविलें आहे हें सागतां कळेल. बहुत काय लिहिणें. आपण सुज्ञ असत १११११.

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

विनंति विज्ञापना. चेनापटणाहून व्यंकटराम दीला याजकडील अखबार आली, ती सांप्रत रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव सेवेसीं प्रविष्ट करतील. अवलोकनें सविस्तर मार घ्यानांत येईल. र॥ छ. २८ मोहरम हे। विज्ञापना.

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

अखबार ई॥ छ ९ मोहरम त॥ छ, २५ माहे मार पर्येंत र॥ छ, २८
मोहरम.
विनंति विज्ञापना, राजेश्री रघोजी भोंसले सेनासाहेबंसुभा यांचें पत्र आह्मांस आलें कीं, पुण्यास राजश्री श्रीधरपंत व कुशाबा चिटणीस यांची रवानगी राजश्री बाबूराव यांजसहित केली ह्मणोन; व सदरहु अन्वयें नवाबासही सेनासाहेबसुभा यांचे खरीता पत्र आलें तें त्यांजकडील माधवराव रामचंद्र यांनीं गुजराणिलें. र॥ छ, २८ मोहरम हे विज्ञापना.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति विज्ञापना. छ. २८ मोहरमी प्रथम प्रहरीं मिस्तर इष्टावरट फिरंगी । मिस्तर ज्यान कनवी कडील आला होता. नवाबही बाहेर आले. दरबार जाला, फिरंगी मार यानें अर्ज केला कीं छ. १४ मोहरमी फुलकचेरीत इंग्रजाकडील ठाणें कायेम जालें................त्याजवरून खुषीच्या तोफा सोडावयास हुकुम केला. एकवीस बार जाले. कसी घेतली याचा तपसील मागाहून समजून घेऊन लिहून पाठवीन, र॥ छ, २९ मोहरम हे विज्ञापना.
छ ६ सफरी टप्यावर पुण्यास.

श्री.
श्रावण व० ३० गुरुवार शके १७१५.

विनंति विज्ञापना. पुनर्वसु नक्षत्रापासोन आश्लेषा अखेर पावेतों तीन नक्षत्रें कोरडीं गेलीं. पाऊस नाहीं. वारा भयानक. खरीफाची पिकें व सर्व जिंनस धान्याचे गचो-यास येऊन पर्जन्य नाहीं यामुळें वालत चालली. धारण सस्त होती ते दररोज सेर आदसे (र) रोज माहाग होत चाली. पर्यन्या मुळें मनुष्यमात्राचे होष ठिकाणीं नव्हते. इतकियांत श्रावण शु॥ षष्ठी, मंगळवारीं मघा नक्षत्राची शुरुवात होतांच पर्जन्याचे वृष्टीस आरंभ जाला. सगळें नक्षत्र पाऊस इकडील तमाम प्रांतीं जाले. रात्रीं पर्जन्य पडावा, दिवसां उघडावा, याप्रा दररोज. त्यांत च्यार पांच पाऊस मातबर जसें कुणबी लोकांस अपेक्षित तसे जाले. चहुंकडे पाणी पाणी जालें, वोढ्यास व नद्यास तमाम पूर आले. मार्गी येणार जाणार वाटसरू वोढ्या नाल्याचे पुरानें कितेक अटकून तीन तीन च्यार च्यार दिवस राहिले. कितेक दग्यानें वाहून गेले. बैदर येथे किल्यांत व शहरांत व पेंठा येथील भिंतींस पाणी लागून ढांसळून पडल्या. त्यांत कित्येक माणसें मेलीं, वे जायाही जालीं. मघा नक्षत्राचा पाऊस इकडील प्रांतीं बहुत जाला, पूर्वा निघाल्यापासोन उघड पडली आहे. त्यांतही बारीक मोठा वरचेवर पडतच आहे. आह्मीं छपराची भिंत घालविली त्याजवर छपरें टाकावयाचा अवकाश पडला नाहीं; कारण कीं, तीन दिवस पर्जन्याची झड येकसारखी लागली. भिंत पडोन दोन माणसें प्यादे ठार जाले; व पांच सात जखमी जाली. तीं बरीं व्हावयास आणिक महिना दीड महिना पाहिजे, र॥ छ. २८ मोहरम हे विज्ञापना.

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

विनंति विज्ञापना. हरबाजी नाईक बिडवी याचे पुतण्यानें औरंगाबादी सुभ्यावर बलवा करावयाचे केलें. याची अखबार आल्यावरून दुकानाची जप्ती जाली. सांप्रत त्याजकडील त्रिंबक नाईक येथें आहे, त्याचें बोलणें मध्यस्तासी रोशनराये वहरी नारायेण यांचे मारफतीनें होऊन तूर्त साडेतीन लक्षाची निशा त्रिंबक नाईक यांनीं करावी यैसे मध्यस्तानीं ठरविलें. त्यावरून साडेतीन लाखाची फर्द घेतली. दुकानांतील नगदी यैवज व भरतीस लोकांकडे येणें तो लाऊन दिल्हा. दुकानावर पाहारे होते ते उठावयाची परवानगी मध्यस्तांनीं नवाबास अर्ज करून घेतली. रा छ २८ मोहरम हे विज्ञापना,