Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व ५ मंगळवार शके १७१५.
विज्ञापना राजश्री बाबाराव गोविंद यांस पुणीयास जाण्याची रुखसत नवाबाची आलो याची विनंती पूर्वी लिहिलीच आहे. दौलाचा निरोप व्हावयाचा. त्यास. दौलाचे हवेलीस नबाब येक दिवस आले होते. आणि पागेवाल्याकडील कारभारही दौलाचेथें नित्य दीड प्रहर रात्रपर्यंत दोन तीन दिवस सतत होत आहे, त्याजमुळें बाबाजीराव यांचें निरोपाचें अद्याप जालें नाहीं. इतक्यावर जसें ठरेल त्याची विनंती मागाहून लिहितों. रा छ १७ सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १३ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. “पागेवाल्याकडील तालुकियाचा कारभार महमद अजीमखान यांजकडे नवाबांनीं सांगोन दौलाची त्यांची सफाई केली. " इत्यादिक तपसीलें. विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. व्यंकटराव याजकडे आलंद, गुंजोटी, हासनाबाद तीन तालुके दिल्हे. वरकड तालुकियाची अमीली सिदी इमाम याजकडे सांगितली. अद्याप अमील रवाना जाले नाहींत. या उपरी होणार, अजमखान व घांसीमियां दौलाकडे रोज येतात जातात. मागील हिसेबाचाही मागती घोळ पडला आहे. व्यंकटराव यांचे मानस सिदीकडे तालुके असो नये. तथा आदावतीमुळें इजाफ्याच्या फर्दा वरचेवर देतच आहे. तालु ( कि ?) यावर इजाफ्याचे यैवजा ....... राद निंर्वेध बंदो...... ही नाहीं. याप्रो। तुर्त पागा प्र ........ खाने पडलें आहे पुढें काये रंगावर येतें पहावें. पागेवाले याजवर हात फिरला नवता. अमानत होते. त्याजवरही कारभारी यानीं युक्तीनें हात घातला, तेव्हां पागेचे कारभारास कीड लागली, तेव्हां परिणाम समजलाच आहे. रा छ, १७ सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०० १५८० मार्गशीर्ष ८
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवंद याने अलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल वा देसमुखान पा। वाई बिदानंद सु।सन तिसा खमसैन अलफ दरीविले नरसीव्हभट बिन रंगभट वा एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ सेकिन का। पा। मजकूर हुजरु येउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर दीढ १॥ दर सवाद देहाय २ बितपसील
मौजे बोरखल जमीन चावर मौजे किणई जमीन चावर
१ .॥.
दे॥ माहसूल नकदयाती बिमोजीब खुर्दखत मोकासाइयानि माजी व खुर्दखत साबिका दुंबाला होउनु चालत आहे हाली कुल इनाम हुजरून अमानत फर्माविले आहे ह्मणुनु कारकुनानि इस्कील करून दुंबाला करीत नाही नजर इनायत फर्माउनु सदरहू इस्कील दूर करून दुंबाला करावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत साबीकाप्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ चालिलेप्रमाणे दुंबाला कीजे अमानत केलेचे उजूर न कीजे उचापती केले असेल तरी परतुनु दीजे दर हर साल खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल परतुनु दीजे पा। हुजरु रा। मुलाअर्ला
रुजु सुरु निवीस
तेरीख ६
रबिलोवल सुरु सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १३ बुधवार शके १७१५
अखबार ई। छ. ६ ता छ. १० सफर पावेतों रा॥ छ, ११ माहे सफर रा. छ. १७ माहे सफर पत्रें पुण्यास रवानगी टप्यावर.
श्री.
भाद्रपद शु. ३० बुधवार शके १७१५.
श्रीमंत राजश्री-------रावसाहेब
स्वामीचे सेवेंसीं
विनंती सेवक गोविंदाराव कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना ता छ. १७ माहे सफर मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें येथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी छ, ११ माहे मारीं लेखन करून पत्राची वानगी डांकेवर केली ........ असेल. सांप्रत येथील वर्तमानाची ........ पुरवणीपत्रीं लेखन केली आहे. अवलो ........ लं. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ सेवेसीं. श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १३ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. गंजीकोटा व कडपे तालुकियांत मुफसदाचा हंगाम भारी. कितेक ठाणीं जमीदार वगैरे मुफसद लोकांनीं नबाबाकडील व टिपुकडील घेतली. याजकारितां मुफसदाचे तंबीस टिपुकडीलही कांहीं जमियत व सरंजाम आला. यैसें वर्तमान आहे. यावरून नवाबांनीं आपले तालुक्याचे बंदोबस्ताकरितां येथून दिलावरुदौला किलेदार गंजीकोटा याजकडे मुसारेह मु ......... समागमें येक ........ व दे न तोफा व दाहा निशाणें गारद्याचीं व दाहा संदुखा बारुदचे याप्रा सरंजामानिसी रवानगी केली रा। छ, ११ माहे सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १३ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. राजश्री बाबाराव गोविंद यांची रवानगी पुण्यास होण्याविषयीं दौलांनीं नवाबास अर्ज केल्यावरून “ बाबाराव यांस रुखसतीस घेऊन येणें " ह्मणोन नबाबांनी दौलाकडे सांगोन पाठविलें. दौला भार निलेस घेऊन नवाबांकडे गेले. छ. १० सफरी बाबाराव गोविंद यांस नवाबांनी रुखसत दिल्ही. याउपरी दौलाचा निरोप घेऊन रवाना होणार नवाबांनीं ........ बाबाराव यांचे तुमचें बोलणें दो ........ मग बाबाराव यांनीं जावें. त्यास दोलासमवेत बाबाराव यांचे बोलणें या उपरी जें होईल त्याची विनंती मागाहून लिहितों, रा छ, ११ माहे सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु १३. बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, येथील तमाम मुतसदी व किरकोळी मनसबदार यांचे जागिरीवर पटी पांच लाख रुपयाची दौलांनीं ठराऊन सर्वांचे मागें चोपदार व सजावल राज्याजी भवानदास सेडमल आदिकरून देखील भारामल यांस लाऊन . निकड केली आहे कीं नजरेबाबत यैवज दाखल करणें, त्यांची रदबदल दौलासीं होत आहे. इतक्यावर यांचे काय ठरांवात येतें त्याप्रा मागाहून ता विनंती लिहिण्यांत येईल. दौलाचे कारकिर्दीपासोन मुतसदी यांनीं हजरी गणपतीचे कामांत तफावत ....... खो रुपयाचा....... मुतसदी मंडलीवर निघतो. या विषींचा तगादा लागल्यावरून कांहीं आलल हिसेबी नजरेचा ठराव व्हावा असें बोलणें लागलें आहे. कारण कीं, याची जुजरसी केली असतां कोठपावेतों करावी ? सबब नजरेवर ठरावें असें होत आहे. यावर जसें ठरेल त्याप्रा विनंती लिहीन. रा छ, ११ माहे संफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु १३. बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. नवाबांनीं आपले समक्ष दौलास व अजमखान यांस सरकार कामावर येक विचारें राहून कामाची वहिवाट करावयाचें सांगोन सफाई उभयताची करून दिल्ही. अजमखान यांस दौलाकडे जाण्याचें सांगितल्यावरून खान मार दौलाकडे गेले होते तेही अजमखान यांचे घरास जाणार. याप्रा तूर्त असा क्रम चालिला आहे. येकंदर पागेचे माहाला पौ दिलदारखान यांस जागीर साडेतीन लक्षांची नवाबांनीं लोहारें व आलुर हे दोन महाल नेमून दिल्हे. त्याप्रा या पुण्यांतून दोन माहाल त्याचे निसबतीस जाले. आलंद व गुंजोटी हें दोन माहाल व्यंकटराव यांजकडे अजमखान यांचे तर्फेनें देविले. बाकीचे सर्व तालुकियास अमील अजमखान यांनीं ठराऊन पाठवावें यैसा बेत ठरला ........ वगैरै अजमखान यांस व्यंकटराव ........ वा त्यांचे इस्तसवाबानें काम करावें यैसें ठरलें. या छ. ११ माहे सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १३ वुधशर शके १७१५.
विनंती विज्ञापनाः पागेकडील तालुकियाचाकारभार आठ दहा दिवस पर्येंत घोळाखालें पडून रोज येक नक्षा ठरावा याप्रा होत गेलें. येकंदर पागा तालुकियाचे दोन टुकडे तीस तीस लक्ष इजाफ्यासहित येक सरबुलंदजंग यांचे निसबतीस साहेब जादे व शमषुल उमरासुधां व येकांत अजमखान व घासीमियां; याप्रा वांटणी दौलाचे संमतें राज्याजीनीं ठरविली. इत्यादिक ता जें होत आलें त्याची विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. दोन वाटण्या याप्रा जाल्याचा विच्यार नवाबांनीं पाहून या करण्यांत तालुक्याचा बंदोबस्त खातरखा नाहीं. पुढेंही बखेडाच. समजोन नबाबांनीं अजमखान यांजकडे सांगोन पाठविलें कीं, “पागेकडील कामाचा कुल बंदोबस्त तुम्हांकडे सांगून सर अमीली सिदी इमाम यास दिल्ही. दरमियान व्यंकटराव सुरापुरकर यांनी त्याजवर इजाफा कबुल केला, त्यास तुम्ही सरकार नुकसानीचे रवादार कांहीं नाहीं. त्यापक्षीं इजाफा व्यंकटराव यांनीं केल्याप्रा तुम्हीच कबूल करून आपले कामाचा बंदोबस्त राखावा. अजमुल उमरा बहादुर यांची तुमचीही सफाई करून देववितों. त्यांनी तुम्ही येक विच्यारें राहून ज्यांत सरकार काम व उपयोग तें अमलांत आणावे. यांत आमची खुषी. आणी तुमचेही नोकरीस हेच लाजम आहे. अजमुल उमरा यांस तुम्ही षमषुल उमरा प्रा पाहात जावें.''यैसें सांगोंन पाठविल्यावरून अजम खान यांनीं अर्ज केला की “ जशी हाजुरची ईर्षाद त्याप्रा गुलाम हाजर आहे.” याप्रा इकडील बंदोबस्त आंतुन करून दौलासही। नवाबांनी सांगितलें कीं “पागेचे कामांत महमद अजीमखा यांचीच वकफियत चांगली.........यांचे हातें पागा तालुकियाचा बंदोबस्त ज्यारी राहावा तुम्ही त्या ........काम चांगलें तें करावें. अजमखान........(शमशु)ल उमरा याची नजर होती तसी तुमची असावी; व खान मार ही तुम्हास त्यांचे ठिकाणीं समजोन वागतील.” यात-हेनें दोंही कडील साधन पकें केलें. तों पावेतों राज्याजी आदि करुन कोणा येकास हे कांहींच समजों दिल्हें नाही. दौलांनीं राज्याजीस सांगीतलें की तुम्ही तीन फर्दा तयार कराव्या. येक फर्द कुल तालुकियाचे काम व्यकटराव याचें नाबें, दुसरी फर्द निमै सरबुलंदजंग व निमे महमद अजीमखां घासीमिया, हानक्षा, तिसरी फर्द अजमखान यांचे नावें कुल तालुकियाची, या प्रा तीन फर्दा तयार करून समागमें घेऊन यावें. यातून हाजरती ........ कलेल या प्रा सां ........ फर्दा घेऊन दौला व राज्याजी नबाबाकडे गेले. पागेवालेही सरबुलंदजंग घासीमिया व अजमखान दिलदारखान हे सर्व आले. अमील व्यंकटराव सिदी इमाम हेही हाजर जाले. प्रथम नबाबाचें बोलणें दौलासी दोन घटिका होऊन, राज्याजी यांच्या फर्दा पाहिल्या. कुल तालुकयाचा बंदोबस्त अजमखान याजकडे सागांवा हें नवाबाचें विच्यारास आलें, याचा रुकार दौलाचाही पडून अजमखान यास बोलाऊन नबाबांनीं खातरजमा करून सांगितलें. दौलाची व त्याची सफाइ करून. दिल्ही. अजमखान याचें जिमे पागा तालुकियाचा कुल कारभार केला हें व्यंकटराव यांस समजतांच, मार निलेनीं ये तेथेंच आधीं बासष्ट लाखाची येकंदर फर्द दिल्ही होती, त्याजवर आणिक इजाफा पांचलक्ष ........ (गु) जराणली. नबाबांनीं पाहून दौलास ........ नवाब बोलले कीं, फर्द त्यांचें त्यास माघारी द्यावी. त्या प्रा फर्द फिरोज व्यंकटराव यांचे यांस दिल्ही. बासष्ट लक्ष रु. व्यंटरावांनीं इजाफ्यासुधा केले होते; त्यां पैकीं च्यारलक्ष महकुफ करून अठावन लाखाचा अदाजा महंमद अजीमखां यांस करार करून दिल्हा. याशिवाय व्यंकटराव यांनीं नबाबाचे तोषेखान्यांत चार लक्ष रु. देण्याचा करार कैला होता, तोही अजमखान यास नवाबांनीं । माफ केला. याप्रा। अजमखान यांचीं पास खातर ठेऊन दौलाचें व त्यांचे रहस्य करून देऊन कारभार याप्रा उलगडला. रा छ, ११ माहे. सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३० ] श्री. १७३१.
राजश्री रघुनाथ देव याप्रति आज्ञा जेः -
तुह्मीं उभयतांसमागमें प्रेषिलें तें प्रविष्ट जालें. सकल अर्थ चित्तांत आणून समाधान पावलों. तरी याउपरि अविलंबेच आगमनार्थ होय तें करणें, यदर्थी तुमच्या शारदानी व मातु:श्रीनें लिहिलें असेल. आह्मांपासून तुमचें चालवायास तिळतुल्य अंतर होणार नाहीं. येविशी नारो दीक्षित व धोंडोंपंतीं लिहिलें आहे त्याप्रमाणें कार्य सिद्धीस पावणें. उभयतां आचार्य सांगतां कळों येईल. सर्व धंदा तुमचा आहे. हें पत्र सहस्त्र पत्रांचे ठायीं मानून सत्वर कार्यसिद्धी करणें. पुन: मागती उत्तर प्रत्युत्तरांचें प्रयोजन नाहीं. अस्मादिकांकडील एकच वचन की, निर्वाह केला त्यास अंतर नाहीं. हें पूर्ण चित्तीं धरून कांहीं मीनमेष न करितां आगमन करणें. आपण प्रयाण सत्वर करणें. बहुत काय लिहिणें. सुज्ञ असा.