Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. पागेवाल्याकडील कारभाराची चौकसी दौला करूं लागले. अजमखान घासीमियां रोज दौलाकडे जाऊन प्रहर रात्रपर्येंत हिसेबाचे जलसे होत गेले. परंतु नित्य येक प्रकार वेगळाच. यावरून अजमखान व घासीमिया यांस दौलाकडील भरंवसा वाटेना. तेव्हां दोघे येकत्र होऊन दोन दिवस आड धरून दौलाकडे गेले नाहींत दौलानीं राज्याजी यांस त्याजकडे पाठविलें त्यांनीं राज्याजीसी बोलण्यांत आलें कीं या जाबसालापासोन आम्हीं हात उचलला. आपले विच्यारास येईल तसा बंदोबस्त करावा; हे गोष्ट नबाबास व दौलास समजल्यानंतर या प्रसंगीं पागेवाले यांस अजुरदा होऊं न देतां समाधानीनें कारभार उलगडावा हें प्राप्त जालें, अजमखान व घासीमिया यांस खातरजमा करून दौलांनी बोलाविलें. तुमचा कारभार तुम्ही मुखत्यारीनें पूर्ववतप्रा करावा. सरकारांत तेरा लाख रु० द्यावे. पागेचे नेमणुकेचा अदमास बतीस लाख त्यांप्रा जिकडील तिकडे माहावा-या पोंहोंचल्या होऊन बंदोबस्त राखावा. स्वराज्याचे मामलतीची बाकी राहिली असेल त्याचा हिसाबाचे रुइनें इनफिसाल करावा. माहाल मजकुर खर्च व देणी सारासार पाहून तडजोड करणें. याणा सांगोन पागेचे कारभाराची मुखत्यारी अजमखान व घांसीमियांकडे सांगितली. व्यंकटराव यांनीं इजाफ्याची रकम चढविली. त्यासुद्धां येकंदर बेरीज बासष्ट लाखास आलीं होती. तें। सर्व राहून तेरा लाख रु० मात्र सरकारांत दाखल करावें. वरकड कामांस त्यांचे त्यासच मुखत्यार केलें. तेरा लाखाचा पर्याय पाहातां पेशजी पागेकडील हिसेब नवाबांनीं मनास आणावयाची आज्ञा राज्याजीस केली होतीं. त्या हिसेबा अन्वयें दाहा लक्ष पागेवाल्याकडून येणें व चितापुर वगैरे कांहीं तालुका पागेचे सरंजामासिवाय अमानीचा, त्याजबाबत यैवज याचे हप्तेबंदी बाबत साहा लाख जातां बाकी सात लाख रु० दरसाल यैन पांच व दरबार खर्च दोन येकूण सात लाख सालाबादी बसेल, यांतही पांच लाखास यैवज पा कलबर्गे बगैरे कितेक माहालीं जमीदा-या सरकारांत जप्त, त्याचे हक, रुसुमसे-याचा यैवजही याचे पोटीं. दोन लाख रु० मात्र ज्याजती दरसाल पडतात. वास्तव्य पाहातां याप्रो। सारांश. पागेकडील कारभाराचा येक महिना कमकसर मोठा मझेला पडला होता. सांप्रत अशा त-हेनें बंदोबस्त जाला, अजम खान व घांसीमियां यांची जुट येक जाल्यामुळें या कारभाराची भटी सेवटास चांगली उतरली. पागेवाल्याचे पुठ्यांतून सरबुलंदजंग व दिलदारखान हे फुटल्यामुळें इतका बखेडा पडला. सांप्रत, सरबुलंदजंगाचेही समाधान अजमखान घासीमियां यांनीं करुन कामकाजाचा क्रम पूर्ववतप्रा ज्यारी केला. दिलदार खानाकडे लोहारे व अलूर यैकेहली कसबा हे जागिरींत दिल्हे. व्यंकटराव याजकडे अलंद, गुंजोटी, हसनाबाद, कोळूर, हे च्यार तालुके राहिले. करेमुंगीस राज्याजी यांचे विद्यमानेचा अमील जाम नारायणखेड फतुदुलाखानाकडे दिल्हें. वरंकड कुल तालुकियाची अमीली सिदी इमाम यांजकडे ठरली. सर्वांची देखरेख जुजरसी अजमखान यांनीं करीत जावी. याप्रा पागेकडील कारभार ठरण्यात आला. तेरा लाख रु० सरकारांत देणें ठरलें. ते आदा करून देण्याचा जिमा आजमखान यांनीं केला. रा छ. २ माहे रावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.विनंती विज्ञापना. राजश्री बाबाराव गोविंद यास पुणियास जाण्याची रुखसत नवाबानीं दिल्ही, येविषईची विनंती पेशजी डांकेवर लिहिण्यात आलीच आहे. सरकार जाबसालप्रकर्णीं मारनिलेसी बोलावयाचे प्रकार दौलानीं आमचे समक्षही बोलण्यात आणिलें. छ २२ सफरी दौलानीं बाबाराव यांस आपल्याकडील निरोप दिल्हा. येक कंठी मोत्याची व पानदान दिल्हें. तेंच दिवसीं रात्रीं अकरावें घटिकेस बाहेर जाऊन राहण्याचा मुहुर्त दौलानीं बाबाराव यांस सांगितल्यावरून अकरा घटिका रात्रीं मशारनिले निघोन बाहेर डेरा देऊन राहिले. रा छ. २ माहें रौवल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०३ १५८० मार्गशीर्ष शुध्द ९
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवद खाने अलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल वा इस्तकबाल वा देसमुखान पा। वाई बिदानंद सु॥सन तिसा खमसैन अलफ दरीविले आउभट बिन नारायणभट जुनारदार सो। कसबे पा। मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणासी इनाम धर्मआदाऊ सादिलवारपटीपैकी ठाणा होउनु होनु ५पाच देताती बरहुकुम खुर्दखत मोकासाइयानी व खुर्दखत साबीका दुंबाला होउनु चालत आहे हाली कुल इनाम अमानत फर्माविले आहे ह्मणुनु कारकुनानि इस्कील करून दुंबाला करीत नाही नजर इनायत फर्माऊन सदरहू इस्कील दूर करून दुंबाला फर्मावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत साबिका प्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत साल गुदस्ता जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुंबाला करून चालवीजे अमानत केलेचे उजुर न कीजे उचापती केले असेल तरी परतुनु दीजे दर हर साला खुर्दखतचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल परतुनु दीजे पा। हुजरु रा। मुलाअली
रुजु सुरु -
निवीस
तेरीख ७
रबिलोवल सुरु सूद
अफजलखान अपदेभट नारायणभट
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु.३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, बाबाराव यांस दौलाचा निरोप होऊन बाहेर जिनसीपासी जाऊन राहिले. मारनिलेस सांगावयाचें तें दौलानीं सर्व सांगितलें. छ, २२ सफरी दौलाचा निरोप जाला त्यापक्षी मारनिलेनें येका दो दिवसांत निघोन जावें. परंतु सरकारांतून जाबसालापैकीं आठ फर्दा ठरुन आल्या, त्याचे जबाब ठराऊन देण्याचे राज्याजी यांस दौलानीं सांगितलें. जबाब ठरण्या करितां इतके दिवस मारिनिलेचा गुंता जाला. याउपरी आठ फर्दाचे जबाब मारिनिलेपास ठराऊन देणार. ते दिल्हे ह्मणजे येथुन निघोन तिकडे येतील. रा छ २ माहे रावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
विनंती विज्ञापना. व्यंकटराम दिला याजकडून चेनापटणाहून अखबार आली ती रा केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसी प्रविष्ट करितील. त्यावरून अवलोकनांत येइल. रा छ, २१ माहे सफर हे विज्ञापना.
श्री
भाद्रपद व. ४ सोमवार ते व. ७ शनिवार शके १७१५.
अखबार ई छ. १६ ता छ. १९ सफर पर्यंत रा छ, २१ सफर
श्री
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
माहे रावल ऊर्फ आश्विन मास. छ. २ रोज रावसाहेबास पत्रें.
श्रीमंत राजश्री-------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं------------
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सांष्टांग नमस्कार विनंती विज्ञापना ता छ. २ माहे । वल मु बेदर येथें स्वामीचें कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान येथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी डांकेवर पत्राची रवानगी केली त्यावरून ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमानाची तपसिलें विनंती आलाहिदा पुरवणीपत्री लिहिली आहे. अवलोकनें मजकुर ध्यानांत येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा करंणार स्वामी समर्थ. सेवसी श्रुत होय हेविज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ९ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. ईसामियां याजकडे नबाबाचे सरकारातून गुती सरकारपैकीं ताडकरी व ताडपत्री व सिंगणमला व येलानूर हे च्यार तालुके होते. त्यास ईसामियाकडे टिपूकडील पत्राचा सिलसिला लागल्याचें दौलास समजलें. त्यावरून त्याजला येथें बोलाऊन घेतलें. टिपुचीं व कमरुदीखान याचीं पत्रें ईसामियापासीं होती. ते त्यानें दौलाचे हवालीं केलीं. टिपुकडील या त-हेनें पैगाम, परंतु, आपण मिळालों नाहीं याप्रा इसामियानें दौलापासीं आपला निखालसपणा दाखविला. तथापि पुन्हां ईसामियास त्या तालुकियास रवाना केलें असतां काय त-हा पडेल याचा अंदेशा दौलास, याजकरितां त्या च्यार महालाचें काम ईसामियाकडुन तगीर करून दुस-याकडे सांगितलें. नलगुंडा व देवरकुंडा हैदराबाद सुभ्याचे महाल येथील काम ईसामियांस सांगोन सनदा पत्रें दिल्ही. याउपरी ईसामिया हरदो तालुकयाचे बंदोबस्तास रुखसत घेऊन जाणार. हें वर्तमान ईसामियाकडे टिपूकडील राजकारणाचे सिल सिल्याचे इंग्रजास समजल्यावरून त्यानीं नवाबाकडे लिहिलें कीं ईसामिया फितुरी: याजकरितां ताडपत्री वगैरे तालुके याजकडे सांगो नये. ततगीर करून दुस-याकडे सांगावें. ईसामियांस दुसरीकडील काम योजावें. याप्रा इंग्रजाचें मत; यावरून ईसामियाकडील तालुके पहिले दूर जाले. आसद अलीखानही टिपुकडील सिलसिल्यांत. यास्तव त्याची ही तिकडील तालुक्याची बरतरफी व्हावी. हे इंग्रजांचें ह्म ( ण ) णें, यप्रा। बारीक वर्तमान मीर आलम यांचे द्वारां व परभारां समजलें. रा छ. २१ सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ९ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. तमाम मुतसदी मंडळी यांस दौलांनीं तगादा लावला आहे कीं सिलेदार लोकांची हजरी गणती करार वालाह नाहीं. ज्याचे शंभर स्वार त्याचीं घोडी पन्नास साठ असतां शंभराची तलब रोजमुरे वगैरे सरकारातून घेतले. त्यांत सिलेदारास जितकीं घोडीं तितकाज यैवज दिल्हा. बाकी मुतसदी व हाजरीचे चोपदार यांनीं मिळोन तफावत केली याचा येकदोन पतालाऊन इ आपण कारभार करीत आल्या दिवसापासोन याचा हिसेब समजावणें, या प्रा तसदी केली. हिसेबास पाहातां कशास कांहीं मिळेना. लाखोंचाच पेंच. सबब याची नजर ठरऊन घ्यावी यैसें बोलणें मुतसदी मंडळीचें पडलें. त्यावरून साडेबावीस लाखाची तफरीक ठरली. राज्याजी व भारमल छटुलाल अदिकरून सर्वांवर हिसेरसीद प्रा वांटणी जाली आहे. परंतु याचाही निश्चय नाही. याजवर आणिक काय ठरतें ते समजल्यानंतर याची विनंती मागाहून लिहिण्यांत येईल, रा छ. २१ सफर हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ९ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. “ लार्डकारनवालीस इंग्रज याजकडून साता दफेची तहनाम्याची याद टिपुसुलतान यांचे मसलहत प्रकर्णी आली. त्या यादीचे कलमांत कांहीं कमबेष हर्फ करून साता दफेची याद श्रीमंताचे सरकारांतून गोविंदराव कृष्ण यांजकडे रवाना जाली, " या प्रा। मिस्तर मालिट यानें येथें मिस्तर इष्टवट इंग्रजाकडून आहे त्यास लिहिलें. त्यास याद आपल्यापाशीं येऊन पोहचली कीं काय ह्मणोन मीरआलम ह्मणत होते. त्यास अद्याप याद आली नाहीं. आली ह्मणजे प्रविष्ट होतील यैसें सांगण्यांत आलें. रा छ. २१ सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३४ ] श्री. १७३२.
° ˜
श्रीराजाशंभुछत्र-
पतिस्वामिचरणीं तत्पर ।
उदाजी चव्हाण हिंमतबहादर
ममलकतमदार निरंतर.
राजश्री देवराऊ गोसावी यासीः- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। उदाजीराव चवहाण हिंमतबहादर ममलकतमदार रामराम विनति उपरि राजश्री पंतअमात्य हुकमतपन्हा यांचा आमचा स्नेह जो आहे तो अद्वैतभावें आहे. त्यास त्याकडील महाल.
पंचगंगेअलीकडील महाल. पलीकडील महाल.
१ का। वडगांव १ का। जुगुळ
१ का। अळतें १ का। लाट.
१ का। रुकडी. १ का। सावगाऊं.
----- १ का। सदलगें.
३ १ का। एकसंबें
१ का। रायबाग.
१ का। नेज.
-------
७
येथील बाबती येणें. त्यास रयत हरामजादगी करून अंमल सुरळीत देत नाही. याजकरितां त्यांजकडून राजश्री रामभाऊ आह्माकडे आले. त्यास, त्यांची आमची बोली होऊन कारमदार झाला कीं, त्यांचा अंमल बसवावा ऐसें होऊन हें पत्र तह्मास लिहिलें आहे तरी त्यांजकडील एक कारकून ठाणे मजकूरी येवितील त्यास ठेवून घेऊन, रुकडी, अळते, वडगांव या तीन महालांचा अमल चिटीचपाटीनें होऊन जें उत्पन्न होईल त्यापैंकीं दोन तक्षिमा राजश्री पतअमात्य घेतील, एक तक्षिम तुह्मीं घेणे. स्वारी शिकारीमुळे जें उत्पन्न होईल त्यापैकीं निमे तुह्मीं घेणें. ऐवज त्यांस देणें. हुकेरीप्रांत व रायबाग कर्यातींत सात कर्याती आहेत. त्यास तुमचा जबरदस्तीने हात पावोन आणि जे उत्पन्न होईल ते निमे तुह्मीं घेणें व निमें ऐवज राजश्री पंतअमात्य याजकडे पावणें यास तफावत एक- जरा न करणें. येविशी राजश्री येसाजी शिदे यासीही लिहिले आहे तुमच्या त्याच्या विचारें जबरदस्तीनें साधतां साधेल त्यास अंतर न करणें बहुत काय लिहिणें हें विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ९ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना पागावाले यांजकडील तालुकियाची रोज येक प्रकार याची विनंती पेशजी लिहिण्यांत आल्यावरून ध्यानात आलें असेल. नवाबांनीं अजमखान यांस सांगितलेंकीं, तुह्मीं शमषुल उमरा यांजप्रा अजमुल उमरा यांस समजोन, त्यांजकडे जात जावें. त्याप्रा प्रथम दिवसीं अजमखान व घासीमियां दोलाकडे जाऊन त्यांसीं बहुत नम्रतेचें बोलणें बोलले कीं “आपण शमषुल उमरा आहेत. जसा बंदोबस्त खातरेस येईल तसा करावा” तेव्हां दौलांनीं सांगितलें कीं तुह्मांविषंई हजुरांत अर्ज करून पागेचा बंदोबस्त ज्यांत खातरखां असेंच करीन. तालुकियांसंबंधे मागील देणे घेणें कोणाचें किती हें समजावावें. त्यावरून अजमखान यानीं तालुकियाची बाकी व देणें व स्वराज्याचे मामलतीची बाकी इत्यादिक समजाऊन दिल्हें. कुलतालुकिचा आकार बासष्ट लक्ष रु. ठरला यापैकीं पागेचे बेगमीचा यैवज बत्तीस लक्ष जातां तीस लाख रुपयांत स्वराज्याचे मामलतीचा यैवज बाकी असेल त्याचा फडच्या करावा. व ज्याचें देणें त्यास वायदा ठरऊन द्यावें. सरकारचे कसरेबाबत बाकी यैवज याचे तालुके तोडून सरकारांत द्यावे. याप्रा दौलांनीं शकल काढून अजमखान व घासिमियां यांसी बोलण्यांत आणिलें, याचा विचार अजमखान यांनीं पाहतां कसरेबाबत यैवजाचे तालुके निवडून परभारा घेतल्यानंतर बाकी जें राहिलें त्यांत पागेचा कुल कारखाना व देणें व सिबंदी खर्च व स्वराज्याची मामलत येणे करून गोष्ट निभावयाची नाहीं. हें समजोन अजमखान यांचे बोलणें दौलासीं कीं हें कांही आह्मांस सांगो नये. आपण शमषुल उमरा आहेत. तेव्हां पागेचा बंदोबस्त करणें तसा आपणच करावा; आणि वरकड कामही केलेलें तसें व्हावें. याप्रा अंगानिराळें टाकून बोलतात. याजवर कोणे डौलास येतें पाहावें. सारांश दौलाचे मनांत फार दिवसांपासोन पागेकडील चौकसी आपण करावी यैसें होतें. ते अनायासें हस्तगत जालें. आतां घोळाखालीं घालून रोज येक शकल काढितात. पहिले दिवसीं अजमखान घासीमियां दौलाकडे गेले. ते समंई त्यासी दौलांनीं आणा शपथा वाहून असा बंदोबस्त करितो, याप्रा बहुत खातरजमेचे बोलले. दुसरे दिवसीं रंग वेगळाच. यावरून शपथ क्रियेची हे अवस्था. तेव्हां इतबाराची उमेद काय राहिली ? कोणेंही प्रकारें अजमखान यांजली दौलाचे बोलण्याचा करण्याचा भरंवसा वाटेना. यास्तव आंगानिराळी गोष्ट टाकून बोलतात यावर कोणे थरास येतें पाहावें. रा छ. २१ सफर हे विज्ञापना.