[ १३१ ] श्री. १७३१.
आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें पावलें. अक्षरश: वृत्त विदित होऊन स्वामी संतोषी जाले. तुह्मीं यादी पाठविली ती चित्तारूढ करून करार केली आहे. राजश्री गोंदजी गायकवाड आले. तुह्मीं लिहिल्याप्रमाणें त्यांचें समाधान करून पुन: तुह्मांकडे पाठविले आहे. कितेक वृत शपथपुर. सर कार्यकर्तव्यतेचा अर्थ यांसी आज्ञा केली आहे हे व विठ्ठल कृष्ण व तुकोजी खांडे ऐसे तुह्मांपाशी पाठविले आहेत. हे आज्ञेप्रमाणें सांगतील तें मनाशीं आणून अविलंबें कार्य सिद्ध करून महद्यश घेतलें पाहिजे अत. पर सर्व प्रकारें तुमच्या भरोशावरी स्वामी निश्चित आहेत सविस्तर वृत्त राजश्री गोंदजी गायकवाड व उभयतां सांगतील त्यावरून कळों येईल. रा। रामाजीपत व रा। गोंदजी गायकवाड व तुकोजी खांडे व विठ्ठल कृष्ण जे सांगतील ते आमचीं वचनें जाणोन कार्य सिद्धीस पावणें. विलंबावर न घालणें हे पत्र लक्षपत्रांचें जागा मानून सिद्धीस पावणें दुसरिया पत्राचा मार्ग न पाहणे बहुत काय लिहीन सुज्ञ असा.