Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १ रविवार शके १७९५.
विनंती विज्ञापना. दौला अह्मांसीं बोलले कीं “बाबुराव यांची रवानगी होत आहे. तुमचे समक्ष यांसीं बोलावयाचें. तेव्हां आम्हीं त्यांस पुशीलें कीं “बाबुराव यांस काये सांगोन.पाठवण्याचें मुकरर केलें हें समजावें"याजवर दौलांनीं बोलण्यास आरंभ केला कीं “ तफैंन सरकारचे जाबसाल वाजबी प्रा परस्परें फैसल्यांत यावें. आणि मदारुल मावला यांनीं व भी बे किलाफ असावें हे स्वाहेर्ष फार दिवसांपासोन चित्तांत. परंतु, तसा प्रकार घडून येतच नाहीं यास काये करावे ? हें सर्व दरेनें तुम्हांसीं हमेष बोलण्यांत आलें. त्याजवर पटणची मोहीम करून येतें समई हरी पंडतजी यांसी बोलण्यांत कोणतींहि बाकी राहिली नाहीं. त्यांचें ह्मणणें कीं पुणियास गेल्यानंतर याचें उत्तर पाठवितो. .... .... (यापुढें १५ पृष्ठें कसरीचे सपाटयांत सांपडलीं. पुष्ठांक १३१ ते १४५ सं. ) .... इष्टवटाकडे मांलिटानें पाठविला. तेंव्हां संशय कोणता? महिनाभर याद न येण्याचें कारण काय ? हें मसलतीचें काम. यास असी देरकषी होणें खुषर्नुमा दिसण्यांत येते कीं काये ? याचा विच्यार पाहावा. लाडबाहादुर यास विलायेतीहून पत्रें जलद येण्याची व निकड कशी ? तथापि, टिपुचे मसलहत प्रकर्णी काम आपले विद्यमानचे. याची पुढिल ही दुरुस्ती आपले हातें हमेपणें व्हावी; यांत तीन सस्कारास ही उपयोग व चांगलें. यैसें समजोन आज पर्येंत लाडास त्याचे खाविंदांचा हुकुम जलद येण्याचाही असतां, या कामा करितां राहून, दोंहीं सरकारांत वकील आहेत त्यांस पैहाम लिहितात कीं साता दफेचा करार होऊन लौकर पोंहचाव्या. यैसें असतां साता दफेस सात महिने गुजरुन गेले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १ रविवार शके १७१५.
श्रीमंत राजश्री----------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं---------
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना ता छ. माहे रावल पर्यत मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचे वर्तेमान येथास्थित असें विशेष. इकडील वर्तमान छ. १० माहे मारी डांकेवर तपशीलवार विनंती लिहिल्यावरून ध्यानास आलें असेल. सांप्रत येथील वर्तमानाची विनंती अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिली आहे. अवलोकनें भार ध्यानांत येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञाकरणार स्वामी समर्थ, सोळावें मोहरम पासून आज पारियेंन दाहा रवानग्य (1) पत्राच्या जाल्या. येकाचेंही उत्तरें लिहावयास आज्ञा न जाली, याजकरितां विनंती लिहिली असे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. दस-याचे दिवशीं मी रात्रीं नवाबाकडे गेलों होतों, दौला व राज्याजी आदिकरून सर्व मंडळ जमा जालें होतें. नजरा जाल्यानंतर नवाबांनी मला पानदान देऊन रुकसत केलें. मागाहून दस-याची वस्त्रें ताषकार चोबी, पोषाग मजकडे पाठविला. रा छ. १० माहे रावल हे विज्ञापना.
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, चेनापटणाहून व्यंकटराम दिला याजकडून प्रस्तुत दोन अखबारा आल्या त्या रा केल्या आहेत. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेंसी प्रविष्ट करतील. यावरून मार ध्यानात येईल रा॥ छ. १० माहे रावल हे विज्ञापना,
श्री.
आश्विन शु. २ सोमवर शके १७१५. ते आश्विन शु.११ में. आश्विन शु.१२. अखबार ई छ. १ रावल ता छ, ९ माहे मारि. राछ. १० रावल. छ. १४ रोज रवाना टपा. रावल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. मलंगुर येथें जमीदार मुफसदाचा आठा जमा होऊन पांच साहा हाजार जमियत मिळाली. किला मुफसदांनीं घेऊन तालुक्यांत हांगामा माजविला. त्यांचे तंबी करितां महंमद अजम बीडवाला याची जमियत दोन हजार सवार व तैनाती यक हजार. येकुण तीन हजार स्वार व च्यार हजार पयदलची जमियत मुसारेहमु व अबदुल करिम पैकीं. व हैदराबादेहून पांच तोफा समागमें बारूदचा सरंजाम घेऊन जाण्याची परवानगी होऊन अजमखान बीडवाला यास रुखसन मलंगुरास जाऊन जमीदाराची तंबी कर करण्याची जाली. छ. ८ रावलीं अजमखान बीडवाला आपले मेळा सुधां येथुन तीन कोसांवर कुच करून गेला. मलंगुर मागती किलेदारानें घेतलें, यैसेंही वर्तमान आज याचें सरकारांत आलें, तेव्हां जामियत त्या कामाकरितां रा। जाली तेही माघारी येईल यैसें दिसतें, होईल त्याप्रा ता लिहीन. या छं. १० माहे रावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, राजश्री बाबाराव गोविंद येथून छ, २ माहे रावली कुच करून मैलारास गेले. दोन तीन दिवस तेथेंच मुक्काम करून होते. छ. ५ माहे मारी मैलाराहून निघोन पुढें गेले. याप्रा वर्तमान आलें. मशार निलें दरमजल येऊन पोंहचतील. या छ, १० माहे रावल हे विझापना.
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शकें १७२५.
श्री.विनंती विज्ञापन'. रणदुलाखान करनुलकर यांची रुखसत नवाबाकडील व दौलाचा निरोप जाल्याची विनंती पेशजी लिताच आहे. रवान मार २ रावली कुच करून दरमजल नारायेण पेंठचे मार्गे करनुलास गेले. रा। छ, १० माहे रावल हे विज्ञापना,
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. गाजी खान वसमतवाला पेशजी हषमजंग यांजपासीं होता. त्यानंतर राजश्री बलवंतराव लक्ष्मण सेलुकर यांजपासीही नौकर सें दोनसे लोकानसी होता. त्यांचा व गाजीखानाचा बेबनाव जाल्यामुळें त्याजपासून बरतरफ जाला, हल्लीं नवाबाचे सरकारांत नोकरीचे उमेदवारीनें दोनसें स्वार व शंभर पैदल सहित येथें छ, ३ रावली आला. स्वार फार करून करोल आहेत. रा छ. १० माहे रावल हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग यांजकडे वातनीस दौलानीं आपला खिजमतगार सेखु पाठविला. त्यानें दौलांस लिहिलें कीं शंकरराव येथून निघोन भोसले यांजकडे जाणार. शंकराई पेठ व आरमुर या दोन ठाण्यांचा बंदोबस्त केला. चीजवस्तसुद्धां जाणार. यैसी बातमी लिहिल्यावरून दौलानीं भारमल यांस फौजसुद्धां येथून रवाना करण्याची तजवीज केली. नबाबाची रुखसत दस-याचे दिवशीं देविली. बाहेर डेरेही दिल्हे. दौलाचा मात्र निरोप घेणें बाकीस तो घेऊन कुच करणार, त्यास आज दुसरें पत्र सेखुचें दौलास आलें कीं। “ पहिलें मीं शंकरराव यांची चाल लिहिली होती. परंतु तें पाउल यांचें नाहीं. शंकरराव येथेंच आहे. कोठें गेला नाहीं; व परागंदा होण्याचा मनसबाही याचा दिसत नाहीं. हाजूरचे पत्र खातर जेमेनें येणें यैसें आल्यास हाजूर येतो." या अन्वयें पत्र आल्यावरून काल भारामलचे रवानगीची गडबड भारी होती, तसी जलदी आज दिसत नाहीं. शंकर रावा कडील विठलराव वकील येथें आहे. त्यासी व व्यंकटराव यासी गांठही घालून दिल्ही. शंकरराव यांस हाजूर येण्या विषयीं पत्रें रा होणार, इतक्यावर भारमल यांचे रवानगीचें कसें ठरतें तें मागाहून विनंती लिहितो. शंकरराव यांचीही पत्रें आजच दौलास आलीं आहेत. रा। छ, १० माहे रावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. शंकरराव भोगं यांचे तालुकियास जप्ती अमीन व स्वार नबाबांकडून पेशजी गेले, त्यांनीं इंदुर, बोधन वगैरे ठाणीं कितेक दाखल केलीं. शंकरराव यांस वर्तमान समजल्यावरून त्यांने, आरमुर येथील गढी मातबर त्याची हमेषा राहण्याची जागा. तेथे पांच सात हजार पैदल वगैरे जमियत जमा करून आरमूरची गढी व शंकराई पेठ वगैरे मकानें बलाविलीं. याचा बोभाट आल्यावरून, येथून भारामन तेजवंत यांस रवाना करण्याची योजना दौलांनीं करून नबाबास अर्ज केला. छ. ८ रा॥ वल दस-याचे दिवसीं रात्रीं भारमल यांस रुखसतीचें पानदान दिल्हें. याउपरी भारामल दौलाचा निरोप घेऊन जाणार, भारामल यांचें समागमें जमियत दाहा हजार पर्यंत जाणार. दौलाकडील रिसाल्याचे लोक व जमातदार, व मुतफर्कात जागीरदार लोक चडचणकर सिंदे वगैरेस हुकुम जाला. भारमल कुच करून येथून रवाना जाले ह्मणजे ता विनंती लिहिण्यांत येईल. भारमल यांस रुखसत समंई नबाबानीं जिगा व कलगी दोन अहद दिल्हे. रा छ, १० माहे रा। वल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद व. ७ गुरुवार ते आश्वीन शु. २ सोमवार शके १७१५
अस्वबार छ १९ रोज सफर ता छ. १ रावलपर्यंत.
छ १० रावली डांकेवर.
श्री.
अश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
श्रीमंत राजश्री --------- रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं------- -
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा। नमस्कार विनंती विज्ञपना. ता। छ१० माहे रावल मु बेदर येथें स्वामीचें कृपावलो नें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी डांकेवर ता वार विनंती लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान अलाहिदा पुरवणी पत्रीं विनंती लि आहे त्यावरून अवलोकनांत येईल उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
विनंती विज्ञापना. शंकरराव जोग यांजकडे नवाबाकडून निर्मळ, इंदुर बोधन, वालकुंडा वगैरे माहाल नफुरुदौला मरहुम यांजबाबत होते. त्यास बाकीचा तोटा भारी. तालुके तमाम उज्याड. साल मारचे यैवजास देखील ठिकाण नाहीं. सबब दौलाची मर्जी शंकरराव यांजवर खपा होऊन तालुकियाचें जप्तीस स्वार व अमील यांची रवानगी पेशजीची झाली. सांप्रत, शंकरराव यांजकडील कुल तालुकियाचें काम मीरबदरुदीन हुसेंनखां पेशजी पागाबालें यांजकडील तालुकयाचे अमीलीस होते. त्याजकडे निभे तालुकियाचें काम व निमे तालुका व्यंकटराव सुरापुरकर यांजकडे. याप्रा आल हिदा दोनटुकड्यांकरून दोघांकडे सांगितल्या. शंकरराव यांचेकारकिर्दीची बाकीही तालुकियांत रुजु करून घेऊन वसूल करून सरकार दाखल करावी, व साल दरसाल नेमाप्रा यैवज पांवज्या करीत जावा. बेमुबलग बाकी राहूं न देतां कारस्तनींनें उगवा करून तालुक्याचा बंदोबस्त राखावा. सरकारकाम करावें. याप्रा उभयतांस ताकीद होऊन छ. ८ रावली दस-याचे दिवसीं रात्रीं मीरबदरुदीन व व्यंकटराव याचे पुत्र त्रिमलराव यांस बाहालीचें खिलत व खिताब व रुखसतीची पानदानें दौलांनीं नबाबांस अर्ज करून देवविलीं. या उपर बदरुदीन व व्यंकटराव यांचे पुत्र त्रिमलराव उभयतां तालुकियास दौलाचा निरोप घेऊन जाणार. येथुन रवाना जाले ह्मणजे मागाहून विनंति लिहिण्यांत येईल. रा॥ छ. १० माहे रावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. सरकारचें पत्र छ. २९ माहे जिल्हेजचें राजश्री गणपतराव माधव यांजकडून आलें तें छ, १४ सफरी पावलें. त्यांत“मौजे वाघोली बु।। पा कजे धारूर हा गांव जागीर राजश्री गणपतराव माधव यांजकडे सरकारांतून आहे, त्यास भारमल नवाबाकडील याचा उपसर्ग लागतो. येविषीं नवाबा निजाम अलीखां बहादुर यांसी बोलोन बंदोबस्त करणें” ह्मणोन आज्ञा सादर जाली. त्यास मौजे मजकुरास भारामलीकडील नायबाचा उपसर्ग येविषईचें वर्तमान समजल्यावरून सरकारचे पत्रापूर्वीही हा मार दौलासी तीन च्यार वेळां बोलण्यांत आला. सांप्रत सरकार आज्ञे वरुन निकड करून दौलांसीं बोलणें जालें कीं पेशजीपासोन श्रीमंताचे सरकारांत------ ( येथें येक सबंद पृष्ठ गहाळ झालें आहे. पृष्ठांक १२२ ) सं ........ (ठ )राऊन हरादो परगण्याची जागीर रुकनुदौला यांस दिल्ही. त्यांत हे दोन गांव वजा आहेत. रुकनु दौला यांस दिल्हे नाहींत. येविषीं दौलांस सांगोन हरदु गांवास तोसीस लागों न देणे. याप्रा सरकारी पत्रें. त्याच्या नकलां ह्या. त्या पक्षीं वाघोली व अरणी दोन्हीही गांव वजा आहेत. याजवर दौलाचें बोलणें कीं “आमचे सनदेंत अथवा दप्तरीं पाहतां कोठेंही वाघोली हा गांव वजा नाहीं. याचाही जबाब इकडुन जाला कीं सनदेंत अंदुरे तालुक्याची तनखा लिहिला, तो वाघोली गांव अलाहिदा वजा देऊन बाकी तालुक्याचा तनखा लाऊन सनद दिल्ही, यैसाही अर्थ सिद्ध होतो. तर्फेनचे जें पहिलें दिल्हें तें जिकडील तिकडे चालावें असा करार असतां वाघोलीस हरकत करूं नये. श्रीमंतांचें सरकारचे जाबसालास सदरील हा सवाल आमचा आहे. याचा जाबसाल सरकारी येकंदर जाबसालांत उगवावयाचा. वाघोलीस भारामलानीं लोक पो ते माघारे आणवावे दौलाचें म्हणणें कीं वाघोलीचा जाबसाल पुढें जसा ठरेल व जिकडे गांव वाजवी होईल तिकडे द्यावा. तों पावेतों वाघोली गांव अमानत, यैसा जिमा तुम्हीं आपला करून दस्त यैवज दिल्ह्यास लोक माघारे आणऊं'' आह्मी उत्तर केलें कीं “ यैसे दस्तयैवज कोठवर म्हणोन द्यावे ? गांव आमचे जिमे आहे. परंतु दस्तयैवज सिवाये लोक तेथुन आणऊं नयेत, यैसे ध्यान दिसण्यांत आलें,व कालहरणावर टाकुन बोलतात. मंटे व मालेगांव हे दोन ठाणीं रोशनखानानें घेतली. ते पोटी पडले. हुलीं वाघालीस शुरुवात केली. त्यास, वाघोली हा गांव सरकारचे दप्तरचे रुइनें वजाईत आहे किंवा कसें येविषीं यांसीं बोलण्यास आज्ञा होईल त्याप्रो बोलेन, येविषीचे उत्तरास आज्ञा सत्वर जाली पाहिजे. रा छ. २ माहे रावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. छ. २७ सफरीं सैर करण्याकरितां नवाबाची स्वारी सिध जाली, पागेवाल्याकडील लोक वगैरे बाहेर दाटी फार जाली. सैद उमरखां यांचे चौत्र्यावर भावसिंग चौधरी बसला असतां घांसी मियांकडील घौड्याची लाथ चौधरी यास लागोन दांत पडले. घोड्याची लात बेजरब बसली. दोन घटिका मुर्छित चौधरी पडला. माणसांनीं उठवून त्याचे घरास नेलें, “ होट तुटला, त्यास टांके देऊन नीट करणें” याप्रा नवाबांनी ताकीद केली. फिरंगी हाकीमास चौध-याकडे पाठवून टांके व मलम देत असतात. चांगले होण्यास पांच च्यार महिने पाहिजेत. अशी अवस्था चौधरी याची जाली. रा छ. २ माहे रावल है विज्ञापना.