श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. ........ जी येथें येके ठिकाणीं अशी आहे कीं .... समंई आपल्यासीं बिगाड करतील ........ पुरत नाहीं. ज्या समंई नमुद होतील. तेव्हां मुष्कीले पडेल हें समजोन, टिपु बहुत सावधपणें आतां पासोन बंदोबस्तास लागला. पाहाडी दरोबस्त किले येथील यजबुती ज्याबज्या करावयास लाविली. पाहाडी किले जातील सरंजाम पोक्त ठेऊन बंदोबस्त करविला. व, जमीदोन किले इंग्रजाचें लढाईंत परिच्छिन्न राहावयाचै नाहींत. हें जाणून जितका जमीदोन किला कोयते पाडून साफ करावा यैसा विध्यार केला आहे. पटणचे पूर्वेकडे किला मजबूत करावयास आरंभ केला आहे. जातीनें रोज तेथें जाऊन किल्याची दुरुस्ती होत असती. नित्याचा दरबारही त्याच जागीं होतो. याप्रो वर्तमान शोध लागला, त्याची विनंती लिहिली असे. रा छ, १७ सफर हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)