श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.
.......इंग्रज कलकत्त्यास ........ ( गलबतां .... ) त सवार होऊन चेनापटणास छ, माहे सफरी दाखल जाला. याचें वर्तमान नबाबांचे सरकारांत छ. १४ माहे मारीं चेनापटणचे अखबारींत आलें. रा छ, १७ माहे सफर हे विज्ञापना.
श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. व्यंकटराम दिला याजकडून चेनापटणाहून अखवार आली, ती येथून रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करतील, त्याजवरून वर्तमान ध्यानांत येईल, रा छ. १७ माहे सफर हे विज्ञापना,