Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
अखबार ई। छ. २ ता छ, ६ सफर पर्यंत रा। छ. ८ सफरी
छ, ११ सफरी डाकेवर पुण्यास.
श्री.
भाद्रपद शु १३. बुधवार शके १७१५.
श्रीमंत राजश्री------- रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं-----
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंती बिज्ञापना. ता छ.११ माहे सफर पर्येंत मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान छ. १ माहे मारीं। लेखन करून पत्राची रवानगी डांकेवर सेवेसी केली आहे त्यावरून ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमानाची विनंती अलाहिदा पुरवणीपत्रीं लि। आहे. अवलोकनें सविस्तर ध्यानांत येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. राजश्री बाबाराव गोविंद यांस मध्यस्तांनीं सांगितलें कीं तुह्मीं पुणियास जाण्याची आपली तयारी करणें, पांच सात दिवसांत हजुरची रुखसत येक महिन्याची घेऊन जावें. बायका मुलें येथें आहेत; तसीच असो द्यावी. सडे जाऊन राव सिंदे यांजपासी पोंहचावें. तेथुनही निंरोप सत्वरच घेऊन येके महिन्यांत येथें यावें. याप्रा सांगितल्यावरून मारनिलेनीं पुण्यास जावयाची तयारी आपली केली आहे. नवाबाची रुखसत व मध्यस्ताचा निरोप घेउन येथून निधाले, म्हणजे विनंती लिहिण्यांत येईल. रा छ. ८ सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२९ ] श्री. १७३१.
रा. रघुनाथ देवासी उपरि. तुह्मीं नारो दीक्षितास व उभयतांस पत्रें पाठविलीं ते पावलीं. तर तुह्मीं आह्मांपाशीं आलियावर तुमची मजमू व तुमचा जिल्हा व तुमचें मानमहत्व चालवूं. यास अंतर करूं यांस श्रीची व आबाची आण असे. तुह्मीं वडील आहां. सही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. मध्यस्तानीं आपल्याकडील रिसाल्याचें व पागेचे लोकांस सर्वीस ताकीद केली आहे कीं
“तुम्ही आपले सरंजामसहित तयार असावें खाविंदाचा हुकुम कोणे समई कसा होईल याचा कांही नेम नाही याजकरितां अगाऊ तुम्हांस इतला केली आहे. बेफाम न राहतां आपले जमियतीची सरंजामानसी तयारी करून सावध राहावे. हुकुम होतांच तेसमई तयारीचा जिकीर न राहतां हुशारीनें असावे.” याप्रा ताकीद केली. वरकडही अतराफ सिलेदार वगैरे लोकांस याचप्रा ताकीद आहे. नव निगादास्तीचे लोक मसादा घेऊन गेले. त्याप्रो कितेक आले; व येणार तेही वरचेवर जमा होत आहे. दाग चेहरे करून रोजमरे कितेकांचे ज्यारी जाले. शिवाय नवीन फुटकर लोक येतात, तेही ठेवितात, रा छ ८ माहे सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. पागेकडील तालुक्याच्या दोन टुकड्या नबाबांनीं ठराऊन वांटणी जाली. सरबुलंदजंगाकडे महमदअजीमखान यांजकडील तालुक्या पो कलबर्गे व चितापुर, अबजलपुर, मणुरमाषम, हुमणाबाद, बेंबली, हे वांटणीत गेले; व अजमखान यांजकडे सरबुलंदजंगाकडील हसनाबाद व हतमुरें, नारायेणखेड हे लागलें. घासीमियां यांजकडील देगळूर, सारबाड व खालखंदार, आदिकरून पहिले माहाल होते तेच बाहाल राहिले. त्यांपैकीं कांहीं गेला नाहीं, व त्यांस आला नाहीं. याप्रा दोन टुकड्यांत महालची वांटणी मध्यस्ताचे संमते, नबाबाचे हुकमा प्रा राज्याजी यांनीं केली. या उपरी सरबुलंदजंग व महंमद अजीमखां यांजकडून अमील ठरून आपलाले माहालीं रवाना होणार. येकंदर पागा तालुकियाचा आकार बतीस लाखाचा होता; त्याची बेरीज साठ लाखावर इजाफ्यासहीत कायम करून माहालाची वांटणी जाली. सरबुलंदजंगाकडून सर अमील व्यंकटराव सुरापुरकर व अजमखानाकडील सिदीइमाम व घासीमियांकडींल फदुलाखान व तिमाराव हरी याप्रा अमील रवाना होण्याचा बेत आहे. रा छ ८ माहे सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५,
विनंती विज्ञापना. पागेकडील तालुकियाचे तगीरी बाहलीचा जाबसाल घोळाखालीं पडला. येविषीची विनंती ता पेशजी लिहिण्यांत आली, त्यावरून ध्यानांत आलें असेल. तीन दिवस नित्य सरबुलंदजंग, व घासी भिया, व महमदअजीमखां वगैरे पागेकडील इसमें व राज्याजी याप्रा। नबाबाचे दिवाणखान्यांत प्रातःकालापासोन प्रहररात्रपर्येत जलसा व्हावा. कुलपागेकडील महाल येथील सन १२०२ ( फसली ) साल गुदस्तचा आकार याचे हिसेब पाहून, त्या आकारावर इजाफा हिसेरसीद प्रा बसऊन साठ लाखाची बेरीज यैन व इजाफा मिळोन सिद्ध केली. पैकीं दोन टुकडे अलाहिदा तीस तीस लाखाचे केले. येक टुकडी सरबुलंदजंग यांचे निसबतीची, त्यांत साहेब जादे ज्याहांदरज्याहा पहिलेंच सरबुलंदजंगाकडे नेमणुक होती. ते व शमषुलउमरा यांचे पुत्र यांचे खासगीचा तालुका केला, व कारभार महमदअजीमखां यांजकडे होता. तोही सांप्रत 'सरबुलंदजंग, याजकडे ठरला. त्यासुधां तीस लाखाचा तालुका सरबुलंदजंगाकडे मुकररजाला. दुसरी टुकड़ी महमदअजीमखां व घासीमियां मिळोन उभयतांकडे तीस लक्षांचा तालुका. या प्रा ठराव जाला. रा छ ८ माहे सफर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२८ ] श्री पुरवणी. १७३१.
राजमान्य राजश्री रघुनाथ देव यास आज्ञा केली ऐसी जेः -
कागलास परिघ पडला आहे त्यास अस्मादिकांस हेंच आवश्यक आहे कीं, कागलकरास उपसर्ग न लागावा, टकापैका त्यास न पडावा, सुखरूप असावा ऐसे जरूर आहे तरी तुह्मीं एक करणें कीं, तेथील परिघ निघेल व टकापैका न पडे तें करणें येविशी अनमान न करणे लिहिल्याप्रमाणे वर्तन करणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९९ १५७९ कार्तिक वद्य १०
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवंद खान अलीशान खान अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानब कारकुनानि हाल वा इस्तकबाल व देसमुखान पा। वाई बिदानंद सु॥सन समान खमसैन अलफ दरीविले आपदेभट बिन-विष्णुभट चित्राउ जुनारदार सेकीन का। मजकूर हुजरु येउनु मालूम केले जे अपणासी इनाम जमीन चावर १ दर सवाद मौजे दोनी पा। मजकूरु असल
दर सवाद मौजे खेड दर सवाद मौजे तडवले बु॥
नीम चावर .॥. नीम चावर .॥.
देखील माहसूल नकदयाती बा। खुर्दखत मोकासाइयानी माजी व खुर्दखत साबीका प्रमाणे दुबाला होउनु चालत आहे हाली कुल इनाम अमानत फर्माउनु हुजरू रसद ह्मणुनु व मुलाहिजाबदल इनामदारसी खुर्दखत दिल्हेया दुबाला न करणे ह्मणुनु माहलासी खुर्दखत सादरी आहे ह्मणुनु माहलीचे कारकुनानि इस्कील करून दुबाला करीत नाही साहेबी नजर इनायती फर्माउनु सदरहु इस्कील दूर करून दुंबाला फर्मावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजिब खुर्दखत साबीकाप्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत साल गुदस्त जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुंबाला करून चालवीजे सदरहू इनाम अमानत फर्माविलेयाचे उजूर न कीजे बऔलाद अहफवाद दुंबाला कीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतुनु दीजे पा। हुजरु रा। शहमलीक गोरी मोर्तब सूद
रुजु सुरु निवीस
तेरीख २३
सफर रुजु सुरु सूद
पौ। छ १३ रबिलौल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२७ ] श्रीशंकर प्रसन्न. १७३१.
राजमान्य राजश्री भगवतराव पंडित यास आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मांकडे राजश्री रामाजीपंत व विठ्ठलपत पाठविले आहेत. ते जें सांगतील तें स्वामीची वचनें जाणोन त्याप्रमाणें मान करून स्वामीच्या दर्शनास मजल दरमजल येणे. नारिंग व केळें पाठविलीं आहेत तें घेणें बहुत काय लिहीन सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. चेनापटणाहुन व्यंकटरामदीला याजकडील अखबार सांप्रत आली ती येथून र॥ केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करतील, त्यावरून वर्तमान अवलोकनांत येईल. उत्तर रवाना होण्यास आज्ञा जाली पाहिजे. रा छ ६ माहे सफर हे विज्ञापना.
श्री.
अखबार ई छ. २५ मोहरम ता छ ९ माहे सफरपर्यंत. रा छ ६ सफर
छ ८ सफरी टप्यावर पुण्यास.
श्री.
भाद्रपद शु. १० रविवार शके १७१५.
----श्रीमंत राजश्री-----रावसाहेब-----
----स्वामीचे सेवेसीं------
विनंती. सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार, विनंती विज्ञापना. ता छ ८ माहे सफर मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी छ. ६ माहे मारी लेखन करून पत्राची रवानगी डांकेवर केली तीं पत्रें सेवेसीं प्रविष्ट होऊन ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान अलाहिदा पुरवणीपत्रीं विनंती लि आहे. अलोकनें ध्यानास येईल. उत्तरें रवाना करावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ सेवसीं श्रुत होय हे बिज्ञापना.