Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
आश्विन शु.३ मंगळवार शके १७१५,


विनंती विज्ञापना. माहाराव निंबालकर यांची रदबदल दौलापासीं बाबाराव यांनी केली. दौलांनीं सांगितलें कीं माहाराव यांची चाल दुरुस्त नाहीं. मगर, त्यांचे पुत्रास हाजुर येण्याविषयी अर्ज करतों. त्यावरून दौलांनीं नवाबास अर्ज करून माहाराव यांचे पुत्र जानोजी निंबाळकर यांस येण्याविषईं नवाबाचा इनायतनामा व आपले पत्र बाबाराव यांचें समागमें तयार करून दिल्हें, जानोजी निंबाळकर करमाळें तालुकियांत आहेत. तेथुन येथें येणार, येथें आल्यानंतर जागीर वगैरे कांहीं पोटापुरती करून देणार. याप्रो आहे. रा छ, २ माहे वल हे विज्ञापनां.

लेखांक १०४                                                                                                                                    १५८० चैत्र शुध्द १४
                                                                                                               
                                 86                                63     

                                                                                          (फारसी मजकूर)

अज रखतखाने खोदायवंद खान आलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानी हाल वा इस्तकबाल व देसमुखान पा। वाई बिदानंद सु॥सन समान खमसैन अलफ दरीविले गिरमाजी त्रियंबक जुनारदार सेकिना कसबे पा। मजकूर हुजूर मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर १ दर सवादे कसबे मजकूर देखील माहसूल नकदयाती व खा। गला व तूप व बेठबेगारी व फर्माइसी कुलबाब बा। खुर्दखत मोकासाइयानि माजी व खुर्दखत साबीका दुंबाला होऊनु चालत आहे हाली कुली इनाम अमानत फर्माउनु हुजरू रसद पाठवणे ह्मणुनु व मुलाहिजाबदल इनामदारासी खुर्दखत दिल्हेया दुंबाला न कीजे ह्मणुनु माहालासी खुर्दखत सादीर आहे ह्मणुनु कारकुनानि इस्कील करून दुंबाला करीत नाही साहेबी नजर इनायत फर्माउनु सदरहू इस्कील दूर करून दुंबाला फर्माव्या रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत साबीकाप्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत सालगुदस्ता जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुंबाला करून चालवीजे बरहुकुम सदरहू इनाम अमानत जाहले त्याचे उजूर न कीजे ब औलाद अहफवाद ऊ दुंबाला कीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर कीजे तालीक लेहून घेउनु असल परतूनु दीजे पा। हुजरु मोर्तब सूद

                                                        86      
                                रुजु सुरु - 
                                निवीस

तेरीख १२ 
रजब                                                                               सुरु सूद                                                                                      

                                                                                     पौ। छ २९ रजब

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. घासीमियां यांजकडे पहिली पागेपैकीं जागीर व लोकनेमा प्रा आहेत. या सिवाय त्यांचे पुत्राचे नांवें नवा पांचसे लोकांचा करार जाला. पांचसे लोक नवे ठेवण्याचे मियांस सांगितलें, त्यावरून ते लोक ठेवाववयास लागले. सदरहु पांचसे लोकांचा यैवज इतलासी अगर जागीर हें कांहीं अद्याप ठरलें नाहीं. ठरल्यानंतर विनंती लिहिण्यांत येईल. रा छ. २ माहे रावल हे विज्ञापना.

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. रणदुलाखान यांस रुखसत जाल्यावरून दौलास आह्मीं विच्यारिलें कीं करनुल संस्थान प्रकर्णी आपले सरकारचा जाबसाल नजराणा वगैर फैसला आला असेल. रणदुलाखान यांस रुखसत जाली, त्यास श्रीमंताचे सरकारचा जाबसाल करनुलकराकडून ईनफिसाल होणे याचें आपण सांगितल्या बमेजिब सरकारांत लिहीन. याचें उत्तर दौलांनीं केलें कीं “करनुलकरांकडून हजरतीचे सरकारचा जाबसाल अद्याप फैसला नाहीं. कारण कीं, टिपुकडींल पेषकसीबाबत तगादा करनुलकरास आहे. त्याचा फैसला जाल्याशिवाय करनुलकरास सनदापत्रेंही करून देण्याचें मवकुफ जालें. बाहालीच्या सनदा होतील ते समइ नजराणा वगैरे जाबसाल अवल मुजका करून मग सनदा द्यावयाच्या. हजरतीचे सरकारचा जाबसाल ठरावांत आला ह्मणजे त्या समंई श्रीमंताचे सरकारचें ठराऊन घ्यावें. तूर्त टिपूकडील पेषकसीचे मझेल्यामुळें करनुलकराकडील जाबसाल मुलतवी. त्यास टिपुचे पेषकसीचे बाबत लचांड तोडून टाकलें पाहिजे. येविषईं लाडबाहादुर यांस हाजरतीचीं व श्रीमंताचीं पत्रें जरूर जाऊन बंदोबस्त जाला पाहिजे. पटणावर तह जाला. ते समंई रणमस्तखान यांचे मोहरी दस्तयैवजा वरील शर्त बालण्यांत असतां आज पर्यंत दस्तयैवज निघत नाहीं, आणि पेषकसीचा तगादाही मना होत नाहीं. याजकरितां लाड साहेबांस पत्रें दोन्हीं सरकारचीं जाऊन हा मझेला रफा व्हावा. सबब कीं करनुल संस्थान हरदों सरकारचे पेषकसीचें. या संस्थानची यांस खातर जरूर, इत्यादिक दौलाचे बोलण्यांतील भाव. त्यास लाडबाहादुर यांस येविषईं हे आपले सरकारचीं पत्रें कशीं देतात व सरकारचीं पत्रें कोण्या अन्वयें लाडास जाण्याचीं. यांचें सांगतील त्या प्रो मागाहून विनंती लिहीन. सारांश, टिपूकडील पेषकसीचे जाबसालाकरितां करनुलकराकडील नजराणा वगैरे जाबसाल व सनदापत्रें मुलतवी या प्रो दौलाचें बोलणें. रा छ. २ माहे रावल हे विज्ञापना.

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. रणदुलाखान करनुलकर यांस नवाबांनीं छ. २६ सफरी रुखसत दिल्ही. अलफखान यांजकडे करनुल आदिकरून रणमस्तखानाचा तालुका बाहाल जाला. तुह्मीं व आलफखान येक विच्यारें आपले दौलसीचा बंदोबस्त करावा यैसी रणदुलाखानास ईर्षाद जाली. बाहादुरीचा खिताब व जेगा सरपेंच पानदान दिल्हें. अलफखान यांचें नांवें बहालीच्या सनदा यांचे सरकारच्या व्हावयाच्या होत्या, त्या तुर्त जाल्या नाहींत. कारण कीं टिपुकडील पेषकसीबाबत दरसाल दोनलाखप्रा आठ नऊ वर्षाचा जाबसाल याचा भाग तुटल्यासिवाय सनदापत्रें होत नाहींत. याप्रा सांगोन प्रस्तुत सनदा पत्रें दिल्हीं नाहींत. पुढें ठरेल तसें होईल. रा छ २ माहे रावल हे विज्ञापना.

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग यांजकडे निर्मळ, इंदुर, बोधन, बालकुंडा आदिकरून नफरुदौला बाबत माहालाची अमीली होती. ताहुदाची बेरीज होऊन पराकाष्ठा सालोसाल बेरजे अन्वयें हिसेब कागदी पत्रीं व्हावें. त्यांत माहालातीचा यैवज कस्त मेहनतीनें वसूल होईल, त्यापैकीं खर्चवेंच वजा जाऊन बाकी सरकारदाखल होत आला. तो वसूली पोंहचून बाकी येकंदर व्याणव लाख निघाली. त्याची किस्तबंदी पांच लाख दरमाहा दाखल करावे. शिवाय सालमारचा यैवज. याप्रा नक्षा दौलांनीं ठराऊन शंकरराव यांस रुखसत केलें, च्यार महिने जाले. तीन लाख मात्र सरकारांत आले. वरकड यैवजास ठिकाण नाहीं. यामुळें शंकरराव यांजवर दौलाची मर्जी खफा होऊन तालुकियाची नफी करविली. येथून स्वार शंभर व कांहीं गाडद सुध्धां जप्तीस अमील खाना केला. याप्रा। वर्तमान आहे. या छ. २ माहे। रावल हे विज्ञापना.

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. जागीरदार व ईतलाखी व पागा व रिसालदार फौजेस ज्याबज्या पंधरा वीस कोसी चराईस राहाणें बोलाऊं ते समंई येणें, याप्रो पहिले हुकूम होऊन रवाना केले. त्याप्रा बेदराहून पंधरा वीस कोसीं आसपास चराईकरितां लोक राहिले. सांप्रत सरंजामासुधां येऊन हाजर होणें या प्रा ज्याबज्या ताकिदी गेल्या. नवनिगादास्तीचे लोकांपैकींही वरचेवर येऊन कांहीं जमले व बाकी येणें त्यांचाही निकड मोठी आहे. यासिवाये आणिकही लोक मिळतील ते जमा करावे यैसाही कितेक सरदारास हुकूम जाला आहे. नवनिगादास्तीपैकीं कितेक लोकांच्या हज-या आजपर्यंत नवत्या, त्या जारी जाल्या. रोजम-याचा यैवजही हाजरीचे अन्वयें देण्याची सुरुवात केली. मुसा रेहमुस हुकूम कीं आपली गाडद सारी तयार ठेवावी. नवीन पांच हजार गाडद सजऊन गाडदचा सरंजाम मजबुत करणें यैसें सांगितलें. सारांश, फौज व गाडद जमा करण्याची तुर्त गडबड फार आहे. या छ. २ माहे रावल हे विज्ञापना.

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. या प्रांतीं सालमारीं पर्जन्याची अतिवृष्टी जाली. हस्त नक्षत्राचे पाऊस आठ पंधरा दिवस उघडला तर रबीच्या पेरण्या होतील, असाच पडूं लागल्यास पेरण्या होण्याचे संकट. हैदराबादेकडेंही पर्जन्य भारी जाला, मुसा नदीस पूर आला, व जलपलींचें तळें फुटुन दोन्हीं पाणी येकत्र जाली. बेगम बाजार अगदीं वाहून गेला. च्यार माहालापासीं पाण्याचा डोहो होऊन फतेदरवाज्यांत देंखील पाणी शिरलें. नदीचे आसपास गरीब गुरबाचीं घरें बहुतेक वाहुन गेलीं. येकायेकींच पाण्याची अमद जाल्यामुळें कितेक माणसें असावधपणें मेलीं, गलीं, व जिंदगीस तर ठिकाणाच नाहीं. याप्रा नदीचे पुरानें वर्तमान जालें. यांची अखबार नवाबाकडे आलीं. जलपलीचा तलाव फुटला होता, त्यास हजार पांचसें माणसें च्यार पांच दिवस नेहमीं लाऊन तलावाचा बंदोबस्त केली ( ला? ). हलीं धारण येथें जोरी तेरा सेर व तांदूळ नउ
१ पोषाख. २ वस्त्रें. ३ वेलबटीदार .

साडेनउ सेर या अन्वयें आहे. पंचोळ्याचे दिमतीमुळें धारण तालुकियांत आसपास आहे त्याहून येथें कमी. रा छ २ माहे रावल हे विज्ञापना.

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. ईसामियां यांजकडील पहिले तालुके गुतीसरकारचे ताडपत्री वगैरे तगीर करून दुसरें काम नलगुंडा व देवरकुंडा हैदराबाद सुभ्यापैकीं दोन माहाल खाजे मुनीमखां कुदरतजंग किलेदार कलबर्गेकर याजकडे होते, ते त्याजकडून काढून ईसामियां यांस अमीली दिल्हे. छ. २६ नबाबाची रुखसत होऊन खिलंत पांच पारचे कारैचोबी दिल्हा. इतक्यावर दौलाकडील निरोप घेऊन ईसामियां नलगुंडा व देवरकुंड्यास जाणार, ताडपत्री वगैरे काम मवकुफ होण्याचें कारण याची तपसीलें विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल ती छ. २ माहे रावल हे विज्ञापना

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. येथुन शुक्लतीर्थ ह्मणोन जागा कोस दीड कोसावर आहे. त्याचे आसपास मकेचे फड व ऊंस ज्याचा होता, त्यापासोन सरकारांत खरीदी करून त्या जाग्यावर बाडा बसऊन डेरे दिल्हे. वाड्याचे चौकीस मुसा रहेमु व अबदुल करीम कुमदान यांचे रिसाल्यापैकीं गाडद ठेऊन बंदोबस्त केला. छ. २१ व छ, २२ सफर दोन दिवस प्रात:कालींच नबाब सवार होऊन त्या जाग्यास गेले. प्रथम दिवसीं दौलासही समागमें नेलें. दहिहड्या वगैरे सरंजाम आणऊन मकेचीं कणसें व खानाही तेथेंच जाला. दुसरे दिवसीं जनाना बरोबर होता. पागेवाल्याकडील लोक बराबर. याप्रा दोन दिवस मका व उंसाची सैर जाली. रा॥ छ, २ माहे रावल हे विज्ञापना.