Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक व. ४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग प्रकर्णी भारमल यांचीं पत्रें दौलांस आलीं. व उमरखेडकरांनी दस्तायैबज भारामलास दिल्हा, येविषीची तपसीलें विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. हलीं शिवराम बाबूराव व गंगाधर काशी यांचे पत्र उमरखेंडाहून आह्मांस आलें कीं, “ शंकरराव निधोन कोसंबदे तालुकयाचें गावी प्रथम राहून तेथून मुलें माणसें सुधां मौजे सोईट पा उमरखेड येथें आला. मावजी नाईक यानें राहूं नको ह्मटलें परंतु येकरोज मुकाम करून माहूर परगण्याकडे गेला. मागाहून नवाबाकडील जमातदार सोइटास आले. त्यांस तेथें शंकरराव नाहीं हें समजल्यावर ह्मशाकडे गेले. भारामल फौज तोफा सुधां सोइटास उतरून पायमालीकडे गाजीखान च्यारसें लोकांसहित मौजे चिली पण माहूर येथें जाऊन वेढा दिल्हा. तेथील नाईक भेटला. नऊ दोहा घोडीं भोंगांचीं सांपडलीं. फुलसांगवींत मुले माणसें आहेत यैसें नाईकानें सांगितलें. फुलसांगवीहून भाड्याचे बैल करून उमरखेडा पासोन कोंसावर गांव आंबवानें येथील तळ्यावर भाडेकरी सोडोन फुल सांगवीस आले, या सांगितल्यावरून गाजीखान उमरखेड्यास आला. ‘माग लाऊन देणें’ यैसें बोलणें पडलें. मावजी नाइक फौज येतांच गैर हाजर जाला. भोंग कोठें गेला असेल तो असो, भारामलाकडे येतो यैसें ह्मटल्यास गाजीखानानें न यैकुन मुकाम करून जिराइत व बागाइताची खराबी केली. भारामलाकडे कारकून पाठविला. त्यांणीं सुलतान खानास पाठविलें. तो व गाजीखान मिळोन वेशी पावेतों बंदी केली. आह्मीं भेटीस गेलों. त्यांणीं अटकाव केला. त्यानंतर भारामलाकडे शिवराम बाबूराव व भगवंतराव गंगाधर व रामराव दादाजी त्रिवर्ग गेलों. त्यांनीं पता लाऊन देण्याचें लिहिलें, मागितल्यावरून दिल्हें. न द्यावें तरी हांगामाचे दिवस. परगण्याची खराबी होंऊं लागली, सवब पत्र लेहुन दिल्हे. शिवरामबाबुराव यांस निरोप देऊन उभयतांस त्यांनीं समागमें ह्मशाकडे नेलें. " या अन्वयें पत्रीं मजकूर आहे. त्यास उत्तर खेडकरांनीं भारामल यांस दस्तैवज ‘ शंकरराव याचा पता लाऊन देऊं.' यैसा द्यावयाचा नवता. भारामल फौज सुधां तालुकियाची नुकसानी व पायेमलीकरितां तरी हा जाबसाल सरकारचा नवाबासीं. तालुक्याची नुकसानी होइल ह्मणोंन शंकरराव यांचा पत्ता लाऊन देऊं यैसें लिहिलें काये झणोन दिल्हें ?” ये विषंई निषेध करून उत्तर खेडकरास जबाब लिहिला. परंतु दस्तैवज बजीनस लिहून दिल्हा. तेव्हां पुढें यांचें कसें पडते पाहावें. ये विसीं सरकारांतुन आज्ञा येईल त्याप्रों यांसीं बोलण्यांत येईल रा छ. १६ राखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक व . ४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. दौलाचे हवेलीस सुलेमानषाह साहेबजादे त्यांचे दतकपुत्रकांचे सालगिरेचा समारंभ वीस बावीस दिवसपर्यंत नित्य किंवा दिसा आड रात्रीं नाच राग रंग नवाबानीं जनान्यासहित येऊन दोन प्रहर रात्र पावेतों राहून मग आपले हवेलीस जावें. याप्रा होऊन सेवटी रंग करविला सरगष्त व मेहंदी ही निघाली. सालगिरेची समाप्ति जाली. दौलाची सालगिरेही यांतच येके दिवशीं जाली. रंगाचे दिवशीं आह्मांस बोलविल्यावरून गेलों होतो. रा। छ, १६ साखर हे विज्ञापना.
श्री.
कार्तिक व. ४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. सालगिरेसंमंधीं दौलानीं पोषाग मिस्तर किनवी दि. लावरजंग यांस साहा पारचे व इष्टवट लपटन यां दोघांस तीन तीन पारचे,याप्रा त्यांजकडे चोपदार समागमें पाठऊन दिल्हे. रा। छ, १६ रावर हे विज्ञापना.
१ मयूर. २ जन्मदिवस
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ पत्र. २ सडें. ३ हरकत. ४ मुकाम.
“कमठाण्यावरील वीस दिवस राहण्याचा बेत मला समजला. विसा दिवसानंतर पुढें इरादा कसा हें हाजरतीचें विचारें ठरेल तसें.” या प्रा बोलले. त्यास दौलानीं असें मोहगम बोलणें यांतील चिन्ह विच्यार करून ताडून पाहतां लोक तर्क करितात यास ताळा मिलतो. लोकवार्ता याचे प्रमाणें ही वाटत नाहीं. परंतु बाहेर निघोन फौजा जमा करण्यास निमित्त समर्पक आहे. पुढें जसा मनसुबा तसें करावयास प्रतिपं ( बं )ध नाहीं. फौजा जमा करण्याची आणि बाहेर डेरे दाखल होण्याचा मोठी शोहरत गोष्ट लपून राहावयाची नाहीं. त्या विषई षिकारगाहची सलाह काढून बाहेर निधणार असें आहे. रा छ.१६ राखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ तंबू र स्फोट होंतो; गवगवा होतो. ३ तंबु, डेरे ४ बरोबर.
बोलण्यांत रुख भोंसले सेना साहेब सुभा याजवरील. कोणी ह्मणतात आतां फिरोन नवाब बेदरास येत नाहींत. परभारी हैदराबादेकडे जाणार. या प्रो अनेक तर्क करून बोलतात. वास्तविक कोणतें काय असेल तें असो. परंतु, षिकार गाहाचे बाहाण्यानें जमियत सरंजामाची मजबुती करून पुढें कर्तव्य तें नमुदांत आणावयाचें लक्षण या चालीवरून दिसण्यांत येतें. यास येक दाखला मिळतो कीं छ १४ रोजीं रात्रीं दौलांनीं चोपदारासमागमें येक रुका अह्मांकडे पाठविला कीं “ हाजरत बंदगानआली कमठाणें येथें षिकारी। करितां खैम दाखल होणार. तुह्मीं समागमें निघोन तेथेंच येऊन राहावें, या प्रा हाजरतीची आज्ञा,” याचें उत्तर दौलांकडे आह्मीं सांगोन पाठविलें कीं “.हाजरत जेथें राहतील तेथें आह्मीं समागमें येऊन राहावें हें यैन सलाह वलाजम. परंतु उंटें वगैरे भारबरदारी सरंजाम आमचा येथें हजर नाहीं. जरिदें तेथें येऊन राहिल्यास कुल सरंजाम येथें राहातो. चौकी पाहरा तेथील व येथील दोन ताण पडतात. चोरांचा उपद्रव असा कीं सारे रात्र मनुष्यें जागत आहेत, तथापि चो-या होतात. यास्तव कमठाणें येथेंच षिकारीची सैर येंके जागीं असल्यास तेथें राहोटया पालें जूज सरंजाम देऊन दिवसां राहत जाऊं. रात्रीं येथें येऊं या प्रा जाणें येणें होईल, अथवा फिरतीं शिकार असल्यास समागमें येऊन राहणें जरूर. सरंजाम आणवावा लागेल. याची सलाह आपण जसी सांगाल तसें करूं." याजवर दौलाचे बोलण्यांत आलें कीं “कमठाणें येथें षिकारीस हजरत राहणार याचा एक महिनियाचा सरंजाम तेथील केला आहे. परंतु महिनाभर तेथें राहावयाचा बेत नाहीं. वीस दिवस कमठाणें येथें राहाण्याचा निश्चय, व सरंजाम येक महिन्याचा. वीस दिवसांत येथें येणें जाणें हा बेत मुजाक नाहीं, येथें सर्व खटला ठेऊन सडें येत जावें. तों पावेतों सरंजामही येईल. वीस दिवस कमठाण्यावर व कर्फी" यैसे बोलले, याजवर दौलास विचारिलें कीं “ वीस दिवसानंतर कसे षिकार कोणाकडे होईल ? " दौलाचें ह्म (ण) णें कीं
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक व.४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. नवाबांनीं बाहेर निघावयाची तजवीज दौलाचे विच्यारें ठरलीं. त्यास डेरे दाखल होऊन फौज जमा करण्यांत षोहरते पडती,याजकरितां शिकारगाचे निमित्यानें कमठाणें येथें डेरे दाखल होऊन सैर शिकार करावी; इतक्यांत फौज सरंजाम कुल जमा होतो. सिकारगाचे मकानावर वाडाही मोठा देण्याची योजना जाली आहे. कारण कीं बाडयाचे रखवालीस फौज गाडद सभोंवतीं ठेवावी. येणेकरून फौज तयारी वगैरे दोष दिसण्यात नाहीं. यैसा बेत ठरून दौला जागा पाहावयास गेले. तेथून आल्यानंतर नवाब कुच करून जाणार. खैम दाखल होणार. येथें फौज गाडद जे जमियत आहे, ते हमराह कुच करते दिवसीं बाड्याचे बंदोबस्तास राहावी, आसपास दाहापंधरा कोसीं जमाव चराई वगैरेस आहे, त्यांजला ताकीद आंतून निक्षूण जाली आहे कीं जलद येऊन जमा होणे, पंधरा वीस दिवसांत कुल जमाव येकत्र करावा. यैसी धुन दिसत. येथील लोकमुखें वर्तमान कोणाचें ह्म (ण) णे नवाब बाहेर निघोन फोंज समवेत औरंगाबादेस जाणार. कोणाचे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वः ४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापमा कमठाणें येथें शिकरागाहा करितां नवाब जाऊन राहणार, डेरे वगैरे फरास खान्याचा सरंजाम रवाना व्हावयाचा. तेथील लोकांचीं घरेंही खाली' करविली: कामाठीं बेलदार लाऊन मरामत होत आहे. दौला जागा पाहावयाकारितां गेले आहेत. ते आल्यानंतर नवाब तीन च्यार दिवसांत कुचः करून कमठाण्यास जाणार. रा छ. १६ रा। खर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०५ १५८० कार्तिक वद्य ८
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवंद खाने अलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल वा इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानंद सु॥सन समान खमसैन अलफ दरीविले नरसींव्हभट बिन रंगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट
चावर दीड १॥ दर सवाद देहाय
मौजे बोरखल जमीन मौजे किणही जमीन चावर
चावर १ नीम .॥.
देखील महसूल नकदयाती बिमोजीब खुर्दखत मोकासाइयानी माजी व खुर्दखत साबीका प्रमाणे दुंबाला होउनु चालत आहे हाली हुजरून कुल इनाम अमानत फर्माउनु हुजरु रसद पाठवणे व मुलाहिजाबदल इनामदारासी खुर्दखत दिल्हेया दुंबाला न करणे ह्मणुनु माहालासी हुजरून खुर्दखत सादीर आहे ह्मणुनु माहली कारकुनानि इस्कील करून दुंबाला करीत नाही साहेबी नजर इनायत फर्माउनु इस्कील दूर करून दुंबाला फर्मावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबादय के सदरहू इनाम बिमोजीब खुर्दखत साबीका प्रमाणे दुंबाला होउनु भोगवटा व तसरुफती सालाबाद तागाईत सालगु॥ जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुंबाला करून चालवीजे सदरहूप्रमाणे इनाम अमानत फर्माविले आहे त्याचा उजूर न कीजे बऔलाद व अहफवादे ऊ दुबाला कीजे दर हर साला ताजा खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउन असल परतुनु दीजे पा। हुजरु रा। शहमलीक गोरी मोर्तब सूद
रुजु सुरु तेरीख २१ रुजु सुरु सूद
निवीस सफर पौ। छ १३ रबिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक व. ४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
१ श्रीमंत रावसाहेब पेशवे यांस नेहमी प्रमाणें हवाल्याचें पत्र *
श्री.
कार्तिक व.४ गुरुवार शके १७९५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. सिकारगा कारितां नवाबांनी बाहेर निघावयाचा बेत दौलाचे विच्यारें ठरून तमाम लोकांस तयारीची ताकीद जाली. बेदराहून तीन कोस मौजे कमठाणें हवेली तालुकियाचा गांव चिटगोप्याचे मार्गावरील येथें शिकारग्याचे डेरे देण्याचें ठरलें. तेथील जागा मैदान, पाणी चांगलें. पूर्वी बेदरी पातशाहा राहात गेले, त्यांचे शिकारीस जाण्याचें मकान कमठाणें, याचाही बयान होउन जागा पाहून येण्याकारतां छ. १५ रा खरीं दौला प्रथम च्यार घटिका दिवसां स्वार होऊन कमठाण्यास गेले. तेथें जागा पाहून येणार, ते आल्यानंतर नवाबांनीं छ. १९ अथवा छ, २१ या दोन तारिखा पैकीं येके तारिखेस निघोन खैम दाखल व्हावें यैसा बेत आहे. नवाब निघाल्याचें वर्तमान मागाहून विनंती लिहिण्यांत येईल. या छ. १६ रा खर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ संक्षिप्त २ तहकुब ३ शंका, किंतु ४शामियाना, कचरीचा तंबु.
अर्ज जाला. त्यास इस्तकबाल बादषाही बक्षीस पो. त्याजला तीन पारचे, दुषाला व स ( सि ? ) र पेंच दिल्हा. रात्रीं दौलाचेथें तयारी होऊन अर्जी गुजरली. च्यार घटिका रात्रीं नबाब जनान्या समवेत दौलाचे हावेलीस आले. मामुला इसमांचा सलाम जाला. मुजाहिदुदौला यांची मुलाजमत होउन नजर जाली. कंचन्याचा नाच होता. दोन प्रहर रात्रीं बरखास जाले. छ. ५ रोज रविवारीं तीन घटिकां प्रथम दिवसां नबाब बेदार जाले. दौलाची अर्जी ब दोन खाने व मेवा गुजरला. दिवसां दरबार जाला नाहीं रात्रीं मामुली इसमें हाजर होतीं. त्यास जबाब जाला. छ. ६ रोज सोमवारीं येक प्रहर येक घटिका दिवसां खाबगामध्यें नबाब बरामद जाले. जंगु व मुधा व मनवाचा सलाम जाला. लालन हजामाची याद केली. तो हजर जाला. हजामत होऊन येक प्रहर च्यार घटिकेत बरखास जाले. रात्रीं दौलाचे दिवाणखान्यांत बंदोबस्त होऊन सात घटिकेस जनान्यासहित नवाब तेथें आले, दौला व मीरआलम व सरबुलंदजंग व घासीमिया व अजमखां वगैरे इसमांचा सलाम जाला, प्रथम कंचनाचा नाच. त्यानंतर पना भांडाचा नाच होता. रावजीची याद केली. ते दरबारास आले. फुलाचे हार येक रावजीस व येक दौलास नबाबांनीं दिल्हे. दोन प्रहरास बरखास जाली. छ ७ रोज मंगळवारी प्रात:कालीं दौलाची अर्जी व दोन खानें मेवा गुजरला. लंगर हवदाचे फकीरानें पांच टोपली अनार गुजराणिणे ( ले ? ) दौलाचे घरीं रंगाची तयारी करऊन यक प्रहर यक घटिका दिवसां नबाब जनान्या सहित तेथें आले. बंदोबस्त जाला. कंचन्याचा नाच होता. रंगाच्या पिचका-या घेऊन मारगिरी जाली, यक प्रहर सात घटिकेस नवाब आपले हवे लीस आले. रात्रीं दौलाचे हवेलींत तयारी जाली, नबाबही येणार होते. परंतु, झुलकारअली साहेबजादे यांची मातुश्री हैदराबादेंत बेआराम होती, तिचा वाका जाल्याचें वर्तमान शुतरस्वारासमागमें आलें. सा नबाबाचें येणें न जालें. छ. ८ रोजीं बुधवारीं प्रातःकालीं दौलाची अर्जी गुजरली. रंगाची तयारी करण्याचा हुकुम त्यांजला जाला. साहेबजादे मीरपोलादअली वगैरे यांची १ शय्यागृह २ सांडणीस्वार.
याद केली. ते हजर जाले, येक प्रहर साहा घटिका दिवसा नबाब दोलाचे हवेलीस आले. दौला व सरबुलंदजंग व घासीमियां व अजमखा व रावरंभा तमाम सरदार मनसबदार मुतसदी लोकांचा सलाम जाला. रावजीकडे चोपदार पाठविला. तेही दरबारास आले. कुर्सीवर नबाब बरामद जाले. संर्वाचे हातीं पिचका-या देऊन रंग टाकिला. कंचन्याचा व भांडाचा नाच होतां.. दोन प्रहर च्यार घटिकेस बरखास होऊन नबाब आपले हवेलीस गेलें. रा छ, ११ रा खर हे विज्ञापना.
कार्तिक शु. १४ शनिवार कशे १७१५. ता०१६ नोव्हेंबर १७९३. छ १६ रोज टप्यावर रवाना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ एक मताने २ इच्छा ३ स्टुअर्ट ४ उजीर, दिरंगाई ५ चांगलें.
अद्याप प्रथम दिवस. येक वेंळ मुजमिला फर्द आली, त्याजवर इकडून लिहिलें गेलें. हली नवीन कितेक कलमें व कितेक पहिले दफेंतील मवकुफ अशी याद ठरली तेही अद्याप तुम्हांपासीं आली नाहीं. ते याद तुम्हांकडे येणार. त्याजवर शाके बेशाक होय नव्हे होऊन सलाह जाणार. मागतीं तिकडून आणीक काय ठराऊन येणार ? या खालेच दिवस गुजरले, व पुढें किती दिवस लागावयाचे याचा नेम कशावरून समजावा ? लाडस इतकी निकड, त्यापक्षीं इतक्यावर त्याचें रहाणें होण्याचें चिन्ह दिसत नाहीं. लाड बाहादुर विलायेतीस गेल्या नंतर नवा जनरल कलकत्त्यास आला आहे, त्यासी जाबसाल, त्याची चाल कशी हें समजत नाहीं. तेव्हां करारी कोणे प्रकारच्या व कशा याचा आसळूब काय त-हेचा? हें दुरदेशीनें मनांत यावें. ठरली गोष्ट ते लांबणीवर पडून पुडें कसें ठरतें ? याचें अनुमान होत नाहीं. इतके प्रकार विच्याराचे मार्गे ध्यानात आणुन लाड बहादुर .... .... ( मधील पृष्टें कसरीनें गहाळ झाली आहेत. पृष्टांकं १४७ ते १७९ सं) (पृष्टांकं १८०) ........ करऊन सायेवाना मध्य नबाब बरामद जालें. सरबुलंदजंग व घांसीमियां व अजमखां व मुनषी वगैरे इसमांचा सलाम जाला. मिस्तर किनवी दिलावरजंग यांची मुलाजमत नजर जाली. सलाबतखान यांस मोत्याचा तुरा, भुजबंद व त्याचे तीन पुत्रास खानीचे किताब दिल्हा. दौला ब मीरअलम व किनवी यांसीं खलाबत जाली. चंदा कंचनीचा नाच पाहिला. येक प्रहर सात घटिकेस बरखास जालें. आपले हवेलीस आले. छ. २ रोजी गुरुवारीं दिवसां दरबरा जाला नाहीं. असद अलीखां यांनीं सालगिरेचे ज्याफतीची तयारि करून तीन प्रहरास दौलाचे हवेलीस पोषाग वगैरे सरंजाम घेऊन आले. येक घटिका रात्रीं नवाब जनान्या सहित दौलाचे हवेलिस आले. मामुली लोकांचा सलाम जाला, पंना भांडाचा व कंचन्याचा नाच होता. दौलांसीं बोलणें ही होतें. दोन प्रहर रात्री आपले हवेलीस गेले. छ ३ रोज शुक्रवारी दिवसां खैर सला. रात्रीं दौलाचीं अर्जी व धारणीचा निरखबंद गुजरला. छ, ४ रोज मंदवारीं प्रातःकालीं दोन खाने लावले. अडीच प्रहर दिवसां मुजाहिदुदौला येऊन उतरल्याचा