[ १४८ ] श्री.
˜ श्री °
श्रीमत्कान्होजीसंभूत
शंभो. शत्रूज्जिगीषत. ।
वर्धिष्णू राजरेखेव मुद्रा
भद्रा विराजते ।
राजश्री नारो पंडित गोसावी यांसीः - सकलगुणालंकरण अखडितलक्ष्मी अलंकृत राजामन्य स्ने।। सभाजी आंगरे सरसुभेदार आरमार रामराम विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष स्वामीनी पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन संतोष जाला बहुमानयुक्त आपला गौरव करावा आणि तसेंच सौरस्य चालवणे असेल तरी शिबिका पाठवावी ह्मणून लेख केला तरी आपला पैशारोख्याचा विषय काय आहे ? याउपरि चित्तात काहींएक न आणितां यावयाचें करणें. पालखी घोडे पाच पाठविले आहेत पत्र पावतांच स्वार होऊन यावें. अनमान न करावा. आपली आमची भेटी झालियावरी इष्टापूर्तीची भाषणें होऊन परस्पर संतोष होईल. बहुत ल्याहावें तों आपण सर्वज्ञ आहेत कृपा वर्धमान करावी हे विनंति रा। कृष्णाजी अनत पाठविले आहेत जबानी सांगतील. लौकर आलें पाहिजे हे विनति.
मोर्तबसूद.