श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. तेगबंगाचा पुत्र शमसुल उमरा यांस नवाबांनी आपली नात, नक्षाबंदी बेगम मोहबतजंग यस दिल्ही तिची कन्या, देण्याची योजना केली, व तेगजंगाची कन्या ज्याहांदार ज्याहासाहेब जादे यांस करावी ऐसा बेत ठरऊन अजमनुलमुलुक सरबुलंदजंग यांस सांगितले. त्यांनी अर्ज केला की ‘ हाजरतीस शरीरसंबंध करणे आमची काय योग्यता आहे ! नवाबांनी सांगितलें "दोन्ही माझींच! चित्तास येईल तसे करीन. तुम्हांकडे काय आहे !' याप्रों होऊन दोन्हीं षाद्या कराव्या ऐसे आहे. परंतु तेगजंग यांची बायको. मुलाची मातुश्री–हें कबुल करणार नाही, असे वाटते. मग पाहावे, रा छ ११ साबान हे विज्ञापना.
दफे अलाहिदी.