चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. लस्करांत धारण माहाग सा पेशजी नवाबांनी दौलांस ताकीद केल्यावरून सांप्रत दौलांनी नुरमहंमदखान करोडगिरी देऊन महसुल व पंचत्रा मुकरर करून दिल्हा. बेपारी बणजारे यांस कौल देऊन गल्याची अमदनी करणे याची तजवीज केली आहे. पंनास हजार बैल सरकारची कोठी आसपास वीस कोसपर्यत तालुकियांतील गला किफायत वारं खरेदी करून वैलावर लस्करांत आणून कोटींत जमा व्हावा. बाजारात विकरी वेपारी उदमी यांनी काठांपैकीं खरेदी करुन करावी, यैसी तरतुद केली आहे. रा छ ११ सावान हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)