श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. गजींद्रगड तालुकियांत घोरपडे यांचा हंगामा भारी. दखल नाहीं. सबब वलीहसनखान यांस पेशजी येथून जमियतसुधां खाना केले. त्याची पत्रे यांस आली की घोरपडे याजपास जमियत चांगले हाजुरांतून कुमक जमियतीची मजपास असल्याशिवाय तालुक्यांत दखल बोलेत नाही. त्याजवरून गजदगडीकडे फौज व गडद मिळोन येक हजार जमाव येथून मांजी रवाना केला. इंग्रजी दोन पलटणे गजदगडी सुमारे कनकगिरीचे आसपास होती ती रायचुराकडे आणविली ती येणार आहेत. राा छ ११ साबान हे विज्ञापना.