Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४.
विनंती विज्ञापना. नवाबाचे सरकारांतुन सवाई नाईक पुण्यास पेशज। पुण्यास गेला होता. तो तिकडुन येथे छ. ३० रजबी आला. राजश्री कल्याणराव व बाबाराव गोविंद यांची पत्रे समागमें घेऊन आला ती दौलास देऊन दौलाचे व सवाई नाइकाचे बोलणे च्यार साहा घटका जालें. त्याजवर दलांनी नवाबास अर्जी पाठविली त्याजवरुन सवाई नाइकास घेऊन येणे ऐसा हुकुम जाल्या बमोजीव दौला नाइकास आपले बराबर घेऊन नवाबाकडे गेले. नवाबांनी सवाइ नाइकास वर्तमान विच्यारिलें. याने अर्ज केला. कल्याण राव व बाबाराव यांची पत्रे दौलांनी दाखविली. त्याजवर दोन घटका दौलास खिलवत जालें, सवाई नाइक नासिक प्रांताकडे गेला होता ह्मणोन ऐकण्यांत. राा छ, ४ घाबान हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४.
विनंती विज्ञापना, सिकंदर ज्याहा मीर पोलाद अली यांची षादी व्हाव. याची याचा समारंभ भारी होणार, जनवाडा येथे जागा प्रशस्त नाहीं. सबब । बेदर येथे मंगळवार पेठेत जाऊन राहावे. तेथे षादी व्हावी ऐसा बेत ठरला । आहे. येथुन छ, ६ साबानी कुच करून मौजे चिलरगी पो कारमुगी येथे पांच सात दिवस राहावे; तेथुन मंगळवार पेठेत जाऊन राहावें ऐसे घाटत आहे. ठरेल त्याप्रमाणे विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा ० ४ माहे 'बान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२९ १५९२ मार्गशीर्ष वद्य २
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय
मौजे पसर्णी सा। मौजे वोझर्डे सा। हवेली
हवेली चावर .॥. चावर नीम .॥.
मौजे एकसर सा। मुर्हे बिघे ।२
पा। मजकूर सु॥सन इहिदे सबैन अलफ दा। बा। इनाम बो। नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ जुनारदारसो कसबे मजकूर यासी इनाम जमीन चावर १।२ सवा चावर दोनी बिघे दर सवाद देहाय पा। मा।र
मौजे पसर्णी सा। मौजे वोझर्डे सा। हवेली
हवेली चावर नीम .॥. चावर नीम .॥.
मौजे एकसर सा। मुर्हे बिघे .।२
येणेप्रमाणे दो। माहसूल व नखतयाती बाजे उजु (हा) ती बरहुकूम खुर्दखते वजीरानी व मोकासाइयानी माजी व खुर्दखत साबीका बा। ठाणा मिसेली दर सालगु॥ छ १४ रजब जैसे चालिले आहे तेणेप्रमाणे सालमजकुरास सदरहू इनाम दो। बाबहाय दुमाला केले असे भोगवटा तसरुफाती पाहून ता। सालगु॥ चालिले प्रमाणे दुमाले कीजे तालीक लेहून घेउनु असल मिसेली इनामदार मजकुरासी परतून दीजे मोर्तबु सूद
तेरीख १५ माहे रजब
रजब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४७ ] श्री.
˜ श्री °
श्रीमत्कान्होजीसंभूत
शंभो. शत्रूज्जिगीषत. ।
वर्धिष्णू राजरेखेव मुद्रा
भद्रा विराजते ।।
राजश्री नारो पंडित गोसावी यांसीः - सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी राजामन्य स्ने।। संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. रा। भास्करराऊ याजबराबरी पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणें समाधान जाहालें. सारांश वर्षासनपत्राविशीं लेख केला तरी पत्र तें अगोदरच लिहून ठेविलें होतें. आपणाकडेस पाठवावें तों भास्करराऊ कागद घेऊन आले. याजवळ हल्लीं पत्र पाठविलें असे. केल्या वचनास अंतर सर्वथैव होणार नाहीं. वरकड श्रीस मंदिल व देवीस सोंवळ्याविशीं लि।। तरी प्रस्तुत तें अनुकूल न पडें. पुढें अनुकूल करणार श्री समर्थ असे बराबरील समुदायास वस्त्राविशीं लि।। तरी पांच श्रीवेष्टेनें व साडीचोळी पाठविली असे. श्रीच्या देवळास फणसाचीं झाडें देविलीं असेत. धान्याविशीं लि।। तरी प्रस्तुत धान्याची चणचण बहुतच असे. मासपक्षानें अनुकूलता खामखा करून पाठविली जाईल. कळलें पाहिजे रा। छ ७ माहे सफर. हे विनंती.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४६ ] श्री. १७३६.
श्रीशाहूनृपहर्षेण
कान्होजीतनुजन्मन. ।
आंगरेसरखेलस्यशंभो -
र्मुद्रा विराजते ।।
राजश्री भगवंतराव अमात्य हुकमतपन्हा गोसावी यासीः -
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने ।। संभाजी आंगरे सरखेल रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष आपण रा। एस ठाकूर व मल्हारजी सूर्यवंशी यांजबरोबर पत्रें पाठवलीं व रा । सुभानजी गाटे व उभयता मानिल्हे यांणीं कितेक आपल्या स्नेहभावाचा अर्थ निवेदन केला. ऐशास, आपला आमचा स्नेह अविनाभावें पूर्वार्जित चालत आला होता त्याची दृढता होऊन परस्पर कार्यप्रयोजनप्रसंगीं यश जय रास. सर्व साहित्यानिशी अनुकूल होऊन योजिले मनोरथ सिद्धीते पावे हा चित्तापासून संकल्प करून सुभानजी गाटे यास आपल्याकडेस पाठविला. तदनुरूप गोसावी याहीं मान्य करून विजयदुर्ग तैसाच बावडा ऐसें मानावें, ह्मणून कित्येक विशदें लेख केला व मुखवचनीं सांगोन पाठविलें, तेणेंकरून समाधान जाहालें. प्रस्तुतच कार्यभाग योजावा तरी राजश्री स्वामीचा आमचा विवेक होऊन येत असे. त्याची दृढता होऊन आलियानंतर कार्यभाग सिद्धीतें पाववून ह्मणून. तरी राजश्री स्वामीचा विवेक होऊन येणें तो होऊन आलाच असेल किंबहुना सत्वर कालेंच उरकून घ्यावा. तदोत्तर इकडील मजकूर पेशजीपासून आपण मान्य केला आहे त्याचें समर्पक उत्तर द्यावें आह्मीं त्याजप्रमाणें तरतूद करून उत्तर पाठवून देऊं याचें उत्तर शीघ्र कालेंच पाठवून द्यावें. याउपरि दुसरा विचार किमपि नाहीं, हा आपला निशा असों द्यावा, व आह्मीं आपल्या पत्राचा मार्ग लक्षून बेफिकिर असों. रा। छ ५ रजब. बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२८ १५९१ मार्गशीर्ष शुध्द १४
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय
मौजे पसर्णी सा। हवेली मौजे वोझर्डे सा। हवेली
मौजे एकसर सा। मुर्हे
पा। मजकूर सु॥ सबैन अलफ बा। इनाम + + + + जुनारदर सो। कसबे मजकूर यास इनाम जमीन चावर १।२ सवा चावर दोनी बिघे दर सवाद देहाय पा। मा।
मौजे पसर्णी सा। हवेली चावर मौजे वोझर्डे सा। हवेली चावर
नीम .॥. नीम .॥.
मौजे एकसर सा। मुर्हे बिघे .।२
एणेप्रमाणे दो। महसूल व नखतयाती व बाजे उजुहाती बरहुकुम खुर्दखत वजीरानी मोकासाइयानी माजी खुर्दखत साबिका बा। भोगवटे मिसेली दर सालगु। छ २४ मोहरम जैसे चालिले आहे तेणेप्रमाणे सन तल मजकूर सदरहू इनाम दो। बाबहाय दुमाले केले असे भोगवटा व तसरुफाती पाहून ता। सालगु॥ चालिलेप्रमाणे दुमाल कीजे तालीक लेहून घेउनु असल मिसेली इनामदार मजकुरासी परतून दीजे मोर्तब
तेरीख १२ माहे रजब
रजबू
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२७ १५९० कार्तिक शुध्द १०
श्री
शके १५९० किलक संवत्सरे कार्तिक शुध्द १० तद्दीनी नरशीभट्ट व नारायणभट्ट व शकरभट्ट चित्राव हे त्रीवर्ग वडीलाचा यीनाम चावर १॥ दीढ ता।
बोरखळ चावर येक १ कीणय आर्ध चावर ॥
गला व महसूल
ऐसे यथाशे भक्षीत तीन पिढ्या आले त्याउपरी नरशीभट्टी स्वसामर्थ्ये ठाणेपटीया व तूप बाद केल्या त्याउपेरी नारायणभट्ट व शंकरभट्ट नरशीभट्टास पट्याचा यथाशे मागो लागले मग त्रीवर्ग ब्रह्मसभेश अले मग समस्त वैदीक व समस्त पंडीत व गृहस्त ऐसे मीळोन त्रीवर्गाचे तकरीरा लेहून घेऊन धर्मशास्त्र पाहून नीर्णय जहाला जे नर्शीभट्टी साधिले त्यास दोनी अंश व समस्तास येक अंश ऐसा नीर्णय जहाला मग वरदी बोलिले जे आपणास मानत नाही मग सभानायकी सोडी केली मग त्रीवर्गी मत्सर टाकुन समजले सभासदाची प्रार्थना त्रिवर्गी करून स्वमुख नेम केला जे येक अश नरशीभट्टास द्यावा दोनी अंश त्रिवर्गास द्यावे ऐसे सभासदाप्रति त्रीवर्गी बोलोन नेमस्त केले मग सभासदी त्रिवर्गाच्या मुखे सदरहु अश केले नर्शीभट्टास येक अंश त्रीवर्गास दोनी अश याप्रमाणे वाटुन दीधले असे या वेगळे नारायणभट्टास नरशीभट्टी अपुले वीभा (गा)मधुन प्रतिवर्षी पधरा सण्या किणयीस द्याव्या उस लावला पोटखर्च व त्रिवर्गी वाट बदलुन गावे बद(ल)ली तरि जो गाव नारायणभट्टाचे विभागास ययील त्याच गावात नरशीभट्टी अपुले अशात प्रतिवर्षी पधरा सण्या देत जाव्या १॥।६ सारी रकम बेरीजेचे वाटणीप्रमाणे पधरा सण्याची वाटणी द्यावी याप्रमाणे लेकुराचे लेकुरी खाउन सुखी असावे यास त्रिवर्गामध्ये जो अन्यथा करील तो देवा ब्राह्मणाचा अन्यायी
यावेगळे नारायणभटांचा विभागामध्ये नरशिभटांस नूतनार्जिताचा जो तृतीय विभाग आणून द्यावयानिमित्त अपल्या विभागाचा चतुर्थांश पुत्रपौत्री दिल्हा असे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२६ १५९० श्रावण वद्य ८
स्वस्ती श्रीशके १५९० कीलक संवत्सरे श्रावण वदी अस्टमी बुधवार तदीनी बीहुजूर राजश्री केसवजी नाईक देसमुख पा। वाई सु॥ तिसा सितैन अलफ कारणे लिहिले निर्णयपत्र ऐसे जे वेदमूर्ती नरसीहभट चित्राउ यामधे व वेदमूर्ती नारायणभट बिन एकनाथभट व शकरभट चित्राउ सो। का। वाई यामधे इनामाचा गरगशा होता यावरी नरसीहभटा +++ येउनु ++++ वर्तमान सागितले की आह्मास वडीलाचे कस्टे करून जमीन चावर दीड बि॥
मौजे बोरखल सा। मौजे किण्हई सा। कोरागाउ
नीब चावर १ चावर .॥.
एणेप्रमाणे चालत असे त्याचे विभाग होउनु सदरहु जण यथा अशे खात आलो हाली अवघे जण वेगळाले नादत असता आपण अपुले कस्टे करून इनाम सदरहू दीड चावराचे पटीया + + + बपेसजी दस्तीबाद नव्हत्या ते बाद करून घेतले ह्मणौन बापभाउ करकर करून पटी बाद कली आहे त्याचे तकसीर सागताती तरी याचे निरणय केला पाहिजे + + + + + + + + + + + + का। माडोगणीचे समस्त + + बोलाउनु ब्रह्मसभा करून निवाडा धर्मता पाहाता धर्मशासत्र विज्ञानेस्वर ग्रथ आणुन पाहाता वडीलाचे वृत्ती जे आहे ते वाटून घेउनु वेगलाले नादताती आणि तीही वृत्तीवरी आपुल्या कस्टे करून जे मेलवीले असेल त्यास वरकडावाटे करायासी समध नाही ते ज्याने मेलविले असेल त्याणे च घेवे ऐसे लिहिले आहे व हिसेबी गोतरी तिही विचारून पाहाता वेगलाले नादताती त्यास अपुल्या कस्टे मेलवितील त्यास दुसरीयास वाटा द्यावयास काय गरज आहे ऐसी धर्मशास्त्रीची हि आज्ञा + + + की नरसीहभटानी अपुले + + ज्या पटिया इनामास बाद केल्या आहेती त्यास नरसीहभटाचे + + अगर चुलत्यास अगर पुतण्यास व गोत्रजास वाटा मागावयास समध नाही नरसीहभटी च अपुले पुत्रपौत्री खाउनु सुखे असावे ऐसा निरणय जाहाला हे पत्र सत्य
खंडपत्र पसर्णी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२५ १५९० अधिक आषाढ शुध्द ३
अज रखतखाने खुदायवंद सैद मखदुम शर्जाखान खलदअयामदौलतहू बजानीब कारकुनानी हाल इस्तकबाल व देसमुखानी पा। वाई बिदानद सुहूरसन तिसा सितैन अलफ दरीविला बो। नारायणभट बिन गोपिनाथभट चित्राउ जुनारदार सो। का। मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आप (णासी) इनाम जमीन चावर १।२ सवा चावर दोनी बिघे दर सवाद देहाय पा। मा।र बितपसील
मौजे पसर्णी मौजे उझर्डे मौजे एकसर सा।
सा। हवेली सा। हवेली मुर्हे चावर .।२
चावर नीम .॥. चावर नीम .॥.
येणेप्रमाणे दो। महसूल नखतयाती व बाजे उजुहाती बरहुकूम खुर्दखत मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ चालिले आहे हाली कारकून पा। मा।र खुर्दखताचा उजूर करिताती नजर एनायत फर्मा दरीबाब सरंजाम होय ह्मणउन तरी बराय मालुमाती खातिरेस आणुन सदरहू इनाम बरहुकूम खुर्दखत मुकासाइयानी माजी भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले आसे तेणे प्रमाणे दुमाले केले असे इनामदार मजकुराचे दुमाले करून औलाद अहफाद चालवीजे दर-हर-साला ताजा खुर्दखताचा उजून न कीजे तालीक लेहून घेऊन असल खुर्दखत इनामदार मजकुरास परतून दीजे पा। हुजूर
तेरीख १
मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२४ १५८९ मार्गशीर्ष वद्य ४
.॥. अज रखतखाने मसुरुल अनाम राजश्री नरसोजी राजे घोरपडे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे निगडी किले सातारे सु॥ समान सितैन अलफ दरीविले बो। राजश्री जोगीद्रगिरी मानभाऊ भारती कमलानयन सा। नीब हुजूर येऊन मालूम केले जे मौजे निगडीस आपले इनाम जमीन बिघे
१५ पधर अहे ऐसीयासी मौजे मजकुरीचे मोकदम खुर्दखताचे उजूर करिताती तरी बा। भोगवटा सालाबाद प्रमाणे दुमाले केले पाहिजे ह्मणउन तरी मानभाउ मजकूर याचे इनाम त्याचे दुमाले केले आहे बा। सालाबाद दुमाले कीजे उजूर न कीजे मोर्तबु
तेरीख १७ माहे जमादिलाखर
जमादिलाखर