Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४५ ] श्री. तालीक
२ ६ जुलै १७३३.
राजश्री बाळाजी खडेराव मुतालिक सरदेसाई ता। साळसी गोसावी यांसीः -अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। संभाजी आगरे सरखेल रामराम सु।। सित सलासिन गया अलफ राजश्री भगवतराऊ अमात्य याणीं तुह्मांस आचरे येथें येऊन वतनी अमलाची सेवा तुमचे हाते घ्यावी ह्मणून लिहून पाठविलें. त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी आचरे यास कबिलासुद्धां येऊन राहणे आणि पूर्ववत् वतनी अंमल चालवीत जाणें माहालास ताकीदपत्र सादर केलें असे जाणिजे. रा। छ २४ रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२३ १५८९ आश्विन शुध्द ८
अज रखतखाने खुदायवंद सैद मखदुम शर्जाखान खलद अयाम दौलतहू बजानीब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा। वाई बिदानद सु॥ समान सितैन अलफ दरीविला बो। गिरमाजी त्रिंबक जुनारदार सो। का। मजकूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद का। मजकूर देखील महसूल व नकदयाती व खा। गला व तूप व बाजू कुलबाब बा। खुर्दखत मुकासाइयानी माजी सालाबाद चालत आले आहे हाली कारकून पा। मजकूर ताजा खुर्दखताचा उजूर करिताती साहेबी नजर इनायत करून दुंबाले खुर्दखत मरहामत कराव्या रजा होय ह्मणउन तरी बराय मालुमाती खातिरेस आणुउन सदरहू सदर इनाम जमीन चावर १ एक दर सवाद मौजे मजकूर देखील महसूल व नखतयाती व बाबहाय सदरहू प्रमाणे बिमोजीब खुर्दखत मुकासाइयानी माजी कारकीर्दी भोगवटा व तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे चालवीजे अहवलाद अहफवाद चालवीजे दर हर साला ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे ता। लेहून घेऊन असल खु॥ परतून दीजे पा। हुजूर मोर्तब सूद
रुजु सुरु-
निवीस
रंवा सूद
तेरीख ६ माहे रबिलाखर सुरु सूद
रबिलाखर
गिर्माजी त्रींबक पौ छ २६ जमादिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२२ १५८९ आश्विन शुध्द ८
अज रखतखाने खुदायवंद सैद मखदुम अर्जाखान खलदयामदौलतहू बजानेब कारकुनानी व हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा। वाई बिदानंद सु॥ समान सितैन अलफ दरीविळा बो। नरसींहभट बिन रंगभट चित्राउ हुजूर येऊन मालूम केळे जे आपणासि इनाम व धर्मादाउ बिता।
धर्मादाउ सालाबाद होन इनाम जमीन चावर ॥ नीम
१०० दाहा दर सवाद दर सवाद मौजे पररणी थल
पा। मजकूर वाकेब (।) डी नजीक सिदनाथ
वाडी वाट मामलेस्वर
एणेप्रमाणे देखील महसूल नखयाती व खरीदी गला व सारा व वेठी बेगारी फर्मायसी व बैलकटी व मोहीमपटी व धीउ ता। ठाणा व ता। देहाय बा। खुर्दखते वजीरानी मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफात सालाबाद चालिला आसे हाली कारकून पा। मजकूर ताजा खुर्दखताचा उजूर करिताती तरी साहेबी नजर एनायत फर्मान ताजा खु॥ मर्हामत होय बराय मालुमाती इनामदार मा।रुनइले खातिरेस आणौनु सदरहू इनाम धर्मादाउ सालाबाद होनु दाहा व जमीन चावर .॥. नीम दर सवाद पा। मजकूर व मौजे पसरणी सा। हवेली दो। महसूल नखतयाती व बाबहाय सदरहू प्रमाणे बा। खुर्दखते वजीरानी मुकासाइयानी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ कैसे चाळिले असेल तेणेप्रमाणे दुमाले केळे असे दुमाले कीजे औलियाद अफलियाद चालवीजे दर हर साल ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लिहून घेऊन असल खुर्दखत इनामदार मजकुरास परतोन दीजे पा। हुजूर मोर्तब सूद
रुजु सुरु-
निवीस
रवा सूद
तेरीख ६ माहे रबिलाखर सुरु सूद
रबिलाखर
पौ छ ३ जमादिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४४ ] श्री. २६ जुलै १७३३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६० प्रमादी नाम सवत्सरे आषाढ बहुल द्वादशी गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शभुछत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवतराऊ अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
राजश्री सदाशिव बावा उपाध्ये यासी तुह्मीं पत्र पाठविलें तें त्याणीं विदित केलें त्यावरून सविस्तर कळों आलें. ऐशास, तुह्मीं स्वामीचे यख्तयारी ममतेचे तुह्मांवरी कृपा करून तुमचें विषेशें विशेष चालवणें हें स्वामीस आवश्यक आहे. कोंकणचे महालची पत्रे तुह्मीं आणविलेप्रमाणें पाठविलीं आहेत. स्वामीची सेवा करून स्वामीस संतोष पावणे. पक्ष व नवरात्र उत्साह समीप येणार. व श्रावण मासींचा खर्च आहे. येविशी स्वामींनी लिहावेसे काय आहे ? येप्रसंगीं पोख्ती अनुकूलता करून पाठवून स्वामीस संतोषी करणें. वरकड सदाशिव बावा उपाध्ये यांजवळ आज्ञा केली आहे तुह्मांस लिहितील त्यावरून कळेल. बहुत लिहिणें तर तुह्मीं सुज्ञ असा,
मर्यादेयं
विराजते.
बार बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२१ १५८९ आश्विन शुध्द ८
अज रखतखाने खुदायवंद सैद मखदुम सर्जाखान खलदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देशमुखानी पा। वाई बिदानद सु॥ समान सितैन अलफ दरीविळा नरसींहभट बिन रंगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ तबीब सो। का। मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणासि इनाम जमीन चावर १॥ दीड दर सवादे देहाय बि॥ ता॥
मौजे बोरखल जमीन मौजे किण्ही थळ वैदीक
चावर एक १ चावर नीम .॥.
येणेप्रमाणे दो। महसूल व नखतयाती व बाजे उजुहाती तुटपटी व सेल बैल व बैलेकटी मोहीमखर्च व पायपोसी व ईद सुबराती व सराहू मुशाहिरा व काल गुजारी सर समत स ता। रणभेरी व खुसी मेजवानी व उट आबे व खा। गला व तूप पटीया हाल व पेस्तर कुलबाब कुलकानूसी बा। खु॥ मुकासाइयानि माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा तसरुफाति सालाबाद चालत आहे हाली माहाली कारकून ताजा खुर्दखताचा उजूर करिताती साहेबी नजर इनायत फर्माऊन ताजा खु॥ मर्हामत होय बराय अर्ज खातिरेस आणौनु इनाम वैद मजकूर जमीन चावर दीड दर सवाद दुदेह पा। मा। कुलबाब कुलकानु बा। खु॥ वजीरानि मुकासाई माजी भोगवटा व तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले केले असे दुमाले कीजे औलाद अफलियाद चालवीजे दर हर साल ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लिहून घेऊन असल खु॥ इनामदार मजकुरास परतोन दीजे पा। हुजूर मोर्तब सूद
रुजु सुरु-
निवीस
रवा सूद
तेरीख ६ माहे रबिलाखर सुरु सूद बार
रबिलाखर
पौ छ २८ रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४३ ] श्री. १९ नोव्हेंबर १७३२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५९ परिधावीनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराज्यकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहले खर्चाची अनुकूलता नाहीं, वरकड कितेक कसलियाचा अर्थ जमाव पाठविला आहे, ह्मणून लिहिलें तें विदित जाहालें. स्वार व जमाव पाठविला उत्तम केलें. तुमचा अस्तिनास्तीचा प्रसंग लिहिला तो यथार्थच आहे. स्वामीस नकळेसें काय आहे ? राजश्री बाळाजी महादेव व राजश्री नारो हणमंत वरचेवर स्वामीस विनति करावयाची ते करीतच आहेत. स्वामीस तुमचें अगत्य आहे समाधान असो देणें, वरकड वर्तमान तर राजश्री फत्तेसिंग भोंसलेदादा व राजश्री श्रीनिवास पंडित प्रतिनिधि आले. काल त्रयोदशी मंदवारीं त्याणीं स्वामींचें दर्शन घेतले पौर्णिमा जाहल्यावर तृतिय गुरुवारी स्वामीस करविराहून निघावयास मुहूर्त आहे या मुहूर्ते स्वामी तीर्थरूप राजश्री आबासाहेब याच्या दर्शनास सातारियास जात आहेत हें वर्तमान तुह्मांस कळावें ह्मणून लिहिलें असे. मागाहून तुह्मीं आणखी प्यादे पाठविले तेहि पावले वरकड उभयतां मशारनिले तुह्मांस लिहितील त्यावरून कळेल. जाणिजे. बहुत लिहिणे तर तुह्मी सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते
बार बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
छ २९ रजबीं संक्रमणाचे तिळाचा जाब निंबाजी ना यापासी जिल्हा,
श्री
फाल्गुन शु. १ रविवार शके १७१५ ता. २ मार्च १७९४.
श्रीमंत राजश्री-------राव साहेब
-स्वामीचे सेवेसीं
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंती विज्ञापना. ता। २९ माहे रजब पर्यंत मा जनवाडा येथे स्वामीचे कृपावलोकने करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष सरकारांतून छ. १० माहे जाखिरचे पत्र सादर जालें तें छ. ११ माहे माारी पावले. “त्यांत मकर संक्रमणाचे तिळ शर्करायुक्त पाा आहेत, घेणे " ह्मणन आज्ञा, यैसीयास पत्र व संक्रमणाची थैली सिरसा वंदन करून स्वामीरीवामृतसंतोषसंपन्न सेवक सनाथ जाला, सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
या छ ४ माहे शाबान रवानगी डाकेवरुन,
श्री.
फागुन शु. शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४,
श्रीमंत रावसाहेब यार: मामुली हवाल्याचे पत्र,
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४. | विनं: विज्ञापना. दौलाची नात सैफनमुलुक यांची कन्या गफुरजंगाचे लेकीपार ने जाली ती मीर पोलादअली सिकंदर ज्याहा बाहादुर साहेब जादे यांस देण्याचा निश्चय होऊन छ, ३० माहे रजबीं पखतखोरी जाली. नवाब दौलाचे घरास आले. जनानाही समागमें होता. सारबतखारीचा समारंभ । दौलांनी नवाबास व महालांत नजरा केल्या. सिकंदर ज्याहा यांस चढाबापाचे खाने पोषाग व जवाहीर सरपेच जिगी कंठी व तुरा भुजबंद या प्रो मीर आलम व अर्जबेगी या समागमें पाठविला. षादी छ. १९ माहे धाबानापासून सुरु होणार. सैफनमुलुक यांची दुसरी कन्या हरम अणजे राखीचे पोटची ते असद अलीखानाचे पूत्रास देण्याचा नेम धरुन याचीही शरबतखोरी व चढावा छ माारीच जाला. । छ. ४ माहे घोबान है। विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२० १५८८ पौष शुध्द २
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि देहाय पा। मजकूर सु॥सन सबा सितैन अलफ बदल धर्मादाउ बो। अउभट बिन नारायणभट जुनारदार सा। का। मजकूर ऐवज तूटपटी सादिलवार होन ५ पाच दर सवाद देहाय
सा। हवेली मौजे सा। वाघोली
पसर्णी होन १। .॥. मौजे पलसी
.१।. तलिये
---------
सा। कोरगाउ १॥।
सा। मुर्हे अज + पुरी होन .॥. सा। नींब मौजे बोरखल होन १
येणेप्रमाणे देहाय मजकुरी बा। भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ बा। मिसेली ठाणा छ ४ सफर दर साल सन सीत सितैन अलफ जैसे चालिले प्रमाणे भोगवटा व तसरुफाती पाहोन दुमाले कीजे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे मोरतब
तेरीख ३० माहे जमादिलाखर
जमादिलाखर बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
छ २९ रजबीं संक्रमणाचे तिळाचा जाब निंबाजी ना यापासी जिल्हा,
श्री
फाल्गुन शु. १ रविवार शके १७१५ ता. २ मार्च १७९४.
श्रीमंत राजश्री-------राव साहेब
-स्वामीचे सेवेसीं
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंती विज्ञापना. ता। २९ माहे रजब पर्यंत मा जनवाडा येथे स्वामीचे कृपावलोकने करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष सरकारांतून छ. १० माहे जाखिरचे पत्र सादर जालें तें छ. ११ माहे माारी पावले. “त्यांत मकर संक्रमणाचे तिळ शर्करायुक्त पाा आहेत, घेणे " ह्मणन आज्ञा, यैसीयास पत्र व संक्रमणाची थैली सिरसा वंदन करून स्वामीरीवामृतसंतोषसंपन्न सेवक सनाथ जाला, सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
या छ ४ माहे शाबान रवानगी डाकेवरुन,
श्री.
फागुन शु. ६:फवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४,
श्रीमंत रावसाहेब यार: मामुली हवाल्याचे पत्र,
फाल्गुन शु. ६ बुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४. | विनं: विज्ञापना. दौलाची नात सैफनमुलुक यांची कन्या गफुरजंगाचे लेकीपार ने जाली ती मीर पोलादअली सिकंदर ज्याहा बाहादुर साहेब जादे यांस देण्याचा निश्चय होऊन छ, ३० माहे रजबीं पखतखोरी जाली. नवाब दौलाचे घरास आले. जनानाही समागमें होता. सारबतखारीचा समारंभ । दौलांनी नवाबास व महालांत नजरा केल्या. सिकंदर ज्याहा यांस चढाबापाचे खाने पोषाग व जवाहीर सरपेच जिगी कंठी व तुरा भुजबंद या
प्रो मीर आलम व अर्जबेगी या समागमें पाठविला. षादी छ. १९ माहे धाबानापासून सुरु होणार. सैफनमुलुक यांची दुसरी कन्या हरम अणजे राखीचे पोटची ते असद अलीखानाचे पूत्रास देण्याचा नेम धरुन याचीही शरबतखोरी व चढावा छ माारीच जाला. । छ. ४ माहे घोबान है। विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११९ १५८७ कार्तिक वद्य ३
अज रखतखाने मा। अनाम राजश्री खंडोजी अंबाजी राजे घोरपडे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानि व मोकदमानि मौजे निगडी किले सातारे सु॥ सीत सितैन अलफ बो कमलनयन मानभाव सो समत नीब पा। वाई यासि इनाम जमीन बिघे
१५ पंधरा मौजे मजकुरी मर्हामत करून दिल्हे असता बरहुकूम खुर्दखत प्रमाणे भोगवटा होउ देत नाही दरम्याने इस्कील करून गोसावी मजकूरयासि रजीस करिता ह्मणोन हुजरु मालूम जाहाले तुमचे खुर्दखत काय असे आता रसीदने खुर्दखत देखता चि गोसावी मजुकराचे इनामतीचे वाटे न जाणे बरहुकूम खुर्दखत प्रमाणे विलाकुसूर चालवीजे दुसरेने हुजरू फिर्याद हुजरू आलिया बवाजीब बरजोर ताकीद होईल सालगुदस्ता कुलकर्णी मौजे मजकूर यानी गोसावियापासून इनामतीचे पैके घेतले आहे ह्मणे तरी हे खुर्दखत देखता दर हाल पैके फिराऊन दीजे येबाबे दराज लिहिणे नलगे तालीक लिहून घेऊन असल खुर्दखत गोसावी मजकुराजवली फिराऊन दीजे गोसावी आपले इनाम ज्या कुलास लावितो त्यास तुह्मी पैकेबदल तगादा करिता ह्मणे हे काय माना आहे आता गोसावीयाचे कुलाचे वाटे गेलिया तुह्मी जाणे मागती हुजरु फिरीयाद येऊ न दीजे मो।
तेरीख १६ माहे जमादिलोवल