चैत्र शु. १२ गुरुवार शके १७१५.
श्रीमंत राजश्री-------------------------------रावसाहेब
स्वामीचे सेवेसी
विनंति सेवक. गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंति विज्ञापन ता छ ११ माहे घाबानपर्यंत स्वामीचे कृपेंकरून मुा बेदर येथे सेवकाचे वर्तमान ययास्थित असे विशेष. कितेक मार राजश्री गोविंदराव भगवंत यांचे पत्रांत लिा आहे. स्वामीसेवेत विनंति करतील त्याजवरून ध्यानांस येईल. अधिक उणे शब्द असतील त्याविषई क्षमा असावी. पत्रांतील मार मनन होउन उत्तराविषुषी आज्ञा जाली पाहिजे. सेवेसीं श्रुत होय है विज्ञापना.
विनंति विज्ञापना येसीजे. नवाब निजामली खान यांनी सवाई नाईक ह्मणन येक जासुदीचा नाइके पुण्यास व नाशकास पाठविला, येविर्षीची विनंति पेशजी सेवेत लिा आहे. नाईक मार तिकडे येऊन अजिमुदौला यांचा शोध लाऊन येथे आला. त्याने मुधीरुलमुलुक व नवाब यांस सांगिसलें कीं अजिमुदौला यांस श्रीमंतांनीं आश्रय दिल्हा आहे. गोविंदराव कृष्णही या कामांत आहेत. कोणी कारकुन व हुजरे गुण्याहून गेले होते. याप्री त्याने सांगितले त्याजवरुन नवाब व कारभारी मला पुसणार आहेत सणोन येक खबर यैकिली. पुस्तील असा निश्चय नाही. परंतु कदाचित पुसल्यास याविषीं काय उत्तर करावें याविषी आज्ञा जाली पाहिजे. स्वामी ह्मणतील तुम्ही या गोष्टीची समजुत नसतां सरकारांत लिहिलें याचे कारण काय ? त्यास सरकारविषई तर माझी खातरजमा. परंतु पुर्वी येक गोष्ट माझे वैकण्यांत आली की अजिमुदौला यांनी राव शिंदे यांसी साधन केले. त्याजवरून त्यांनी अंगिकार कदाचित केला असेल. राव सिंदे याचा काल जाला. त्यांनी ज्यांस आश्वासन दिले ते त्यांचे पाठीमागें सरकारांतून पाठ थोपटून पार पाडणें प्राप्त. + + + + +. ( पुढील पुठे गहाळ ) झाली आहेत. सं.) + + + + पृष्ट ३३८.
४ पापड.
२ मुगाचे
तळे १ भाजलें १.
--------
२
२ उडदाचे तळीव व भाजले.
-----
४
१ काढी ताकाची.
१ सांबारें चाकवताचे.
१ मठा.
५ भाज्या.
१ वांगी सगळी मसालेदार,
१ सुरणाची.
१ पांढरा भोंपळा.
१ मेथीची.
१ अंबाड्याची.
---------
५
११ दफे चटप्या.
१ कोथिंबिर, लमण, ३४.
१ तिळाची,
१ जवसाची.
१ कारल्याची.
१ अंबसलाची.
१ हरभरे याचे डाळीची
१ उडदाच डाळाचा.
१ आल्याची.
१ फक्त भिरच्याची लाल,
१ निवे,
१ पंच्यामृत मिरच्याचे.
-------
११
१ आंब्याचे लोणचे,
१ दूध.
१ साखर.
--------
५३
सदर प्रमाणे सरंजाम नवाबांकडे व दौलांस व आषजाउलमुलुक यांस
छ २० षाबान,