[ १४९ ] श्री. १७३६.
राजश्री भगवतराव अमात्य हुकुमतपन्हा गोसावी यासी - सकलगुणालकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। संभाजी आंगरे सरखेल रामराम विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष आपला आमचा हर्शामर्श बसला आहे. त्यास आपली आमची गोडी होऊन पूर्व स्नेहाप्रमाणें आपण आह्मी वर्तावें हेविषयी राजश्री गोविंद शेट याणीं विनति केली, त्यावरून आपणास हें पत्र लिहिले आहे. तरी प्रेमाची अभिवृद्धि होऊन दिन प्रतिदिन स्नेह चाले तो अर्थ चित्तास आला तरी करावा. चित्तास न ये तरी तसेंच उत्तर पाठवावें. श्रीकृपेनें होतां होईल तें होईल. चित्तास न ये तरी तसेच उत्तर पाठवावें. श्रीकृपेनें होता होईल तें होईल जाणिजे रा। छ २९ माहे जमादिलावल. बहुत काय लिहिणें लोभ असो देणें., हे विनंति.
मोर्तबसूद. ˜ श्री °
श्रीमत्कान्होजी
संभूतशंभोः शत्रू
ज्जिगीषतःll वर्धिष्णू
राजरेखेव मुद्रा भद्रा
विराजते ll