श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७४।१७९४ |
विज्ञापना यैसीजे, नवाबाची प्रकृत बेंदरास आलियापासुन ठीक नाहीं. शरीराची भावना हैदराबादेस होती त्यापेक्षां बहुत क्षीण, शरीर फार रोड जाले. वृद्धापकाळ पहिल्या प्रों भक्षणही होत नाही. दरबार करुन बसतात शिकार करतात हे सर्व शोभार्थ लौकिक. हवा येथील मानत नाहीं. मनांत हुरहुर फार, चित्त येक ठिकाणी लागत नाहीं. दौलाचे आग्रहामुळे आजपयँत राहिले. अलीकडे प्रकृतीस क्रोध बहुत जाला आहे. हैदराबादेस जायें हे मनांत भरले. बेगम आदिकरून सर्वांनी निकड केली, चित्त उदास जालें. तेव्हां निश्चय केला की हैदराबादेस रमजानचा महिना जाला ह्मणजे जावें. दौलांनीं येक दोन वेळ अर्ज केला की कुलयांत बिघडती. याजकरितां च्यार महिने छावणी येथेच व्हावी. त्यास झिडकारुन उत्तर केले की “ माझी कुलयात बिघडावयाची नाही. माझी मी संभाळून घेईन. रुकनुदौलापासून जी दोस्ती त्याची बेहदी आमची आहेच. तुह्मांस अदल जो जातीचे येऊन पडेल त्यास मदारुल महाला व तुह्मी उभयत समजाऊन घेणे व बेदरास राहणे असल्यास राहावे. तुम्ही आपलें साठी आमचे कुलयातीत खलेल करणे मुनासब नाहीं. आम्ही हैदराबादेस जाउं.' या प्रों दोन वेळ बो( ५ ) त्यावरून दौला बोलले की ' हजरती वेगळ मी कवडीचा माल, मला कोण पुसतो ? जैसी मर्जी असेल तसेच करीन.' या प्रों बालणे उभयतांचें जालें, मध्ये असीला जवळ होत्या, त्यांनी मात्र हे वर्तमान यैकलें. कारखानेदार यास तयारीची ताकीदही जाली. त्यावरुन गोष्ट फायद्यांत आली. छ १३ तेरखेस मुषरुलुक नवाबाकडे गेले होते. खलबतही जाले. काही प्रकारच्या गोष्टी । सांगून मर्जी हम ( ला) वर करुन हैदराबादचे जाण्याचे राहविले. कारखाने चराईस जावे अशी वार्ता निघाली त्यास शहरास जाण्याचा गुल फार जाला हे मसलतीस ठीक नाहीं, जाण्याची मर्जी असल्यास जावे. परंतु षौहरत आली ही मौडेल पैसे समजाऊन रहावयाची घोहरत मात्र घातली हा येक प्रकार दुसरा प्रकार छावणी येथेच करावी हा निछय. दोहातून कोणता प्रकार निश्चयाची हे समजल्यावर मागाहुन लिहीन. राा छ १६ रमजान हे विज्ञापना,
रा. छ १७ खानी टपालावरून.
श्रीमंत रावसाहेबसि छ, १७ च्या डांकेनें हवाल्याचे पत्र.